रोहा परीसरातील दुर्गभ्रमंती

Submitted by जिप्सी on 20 June, 2016 - 12:12

गेल्या वर्षी जुलै महिन्यात मायबोलीकर इंद्रधनुष्य, गिरीविहार, नविन आणि यो रॉक्स सोबत रोहा परीसरातील तळगड, घोसाळगड, कुडा लेणी आणि बिरवाडीचा किल्ला अशी दुर्गभ्रमंती केली त्याची हि चित्रझलक. Happy

तळगड
रोह्याच्या आजुबाजुला अनेक डोंगररांगा पसरलेल्या आहेत. या डोंगररांगावर अनेक किल्ले ठाण मांडून बसलेले आहेत. त्यापैंकी तळागड हा किल्ला कुंडलिका नदी समुद्राला जेथे मिळते त्या मांदाड खाडीवर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. प्राचीन काळी कुंडलिका नदी मार्गे कोकणातील बंदरात उतरणारा माल घाटावर जात असे. या व्यापारी मार्गावर बांधलेली कुडा लेणी आणि तळागड , घोसाळगड, अवचितगड हे किल्ले या मार्गाच्या प्राचीनत्वाची साक्ष देत अजूनही उभे आहेत. इ.स.१६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळगड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते.
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात.......
कुडा लेणी
तळा-मांदाड रस्त्यावर कुडा गावातील एका टेकडीवर हि लेणी कोरलेली आहे. तळागावाहुन मांदाड गावाच्या थोडे अलीकडे कुडा लेण्यांकडे जाणारा कच्चा रस्ता जातो. काही अंतरावर कुडा लेण्यांचे सुखद दर्शन होते. गर्द झाडीमध्ये लपलेली ही लेणी फारच सुंदर आहेत.

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२
कुंडलिका नदी
घोसाळगड
रोहा शहराजवळ, अवचितगड व घोसाळगड हे किल्ले आहेत. घोसाळगड हा किल्ला डोंगरावर वसलेला आहे. शिवपूर्वकाळात अस्तित्वात असलेला हा किल्ला ताम्हण घाटमार्गे होणार्याा व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. जंजिरा, तळगड, घोसाळगड, ताम्हणघाट, घनगड असा तो व्यापारी मार्ग होता. या मार्गे कोकणातील बंदरावर उतरणारा माल घाटमाथ्यावर नेला जात असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतल्यावर त्याचे नाव बदलून ‘वीरगड’ असे ठेवले. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर केलेल्या तहाप्रमाणे शिवरायांनी जे १२ किल्ले स्वत:कडे ठेवले त्यात ‘ घोसाळगड’ हा किल्ला होता, त्यावरुन या गडाचे तत्कालीन महत्व लक्षात येते.
घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ‘‘रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालिले त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला’’ असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव ‘वीरगड’ ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला.
प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
बिरवाडी
रोह्याच्या अवचितगडा पासून सुरू झालेल्या डोंगररांगेत घोसाळगड, तळगड, मानगड, कुर्डुगड, बिरवाडी असे अनेक छोटे किल्ले आहेत. इतिहासात कुठेही फारसा उल्लेख नसलेला बिरवाडीचा किल्ला रोह्यापासून १८ किमी अंतरावर आहे. इ.स. १६६१ मध्ये सिद्दी कडून दंडाराजापुरी जिंकून घेतल्यावर बिरवाडीचा किल्ला बांधला.
गावातून किल्ल्यावर जातांना वाटेतच भवानी मातेचे प्रशस्त मंदिर लागते. मंदिरापर्यंत जाण्यास सुमारे १०० पायर्यात बांधलेल्या आहेत .देवळाच्या प्रांगणात तोफ ठेवलेली आहे. मंदिराच्या मागील बाजूस शिवरायांचा ६ फुटी पुतळा उभा आहे. येथून थोडे वर चढल्यावर आपण एका सुटावलेला बुरूजापाशी येऊन पोहचतो. बुरुजापासून एक वाट उजवीकडे वळते ,ही वाट संपूर्ण किल्ल्याला वळसा घालुन गडावर पोहचते. वाटेत एका ठिकणी खडकात खोदलेले पाण्याचे टाके आहे. त्याला ‘घोड्याचे टाके’ म्हणतात. किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, किल्ल्याच्या चहुबाजूस तटबंदी विरहीत ७ बुरुज आहेत. गडाच्या या मागील बाजूस गडाचे सुबक असे पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे.आजही हे बर्या पैकी शाबूत आहे. प्रवेशद्वारातुन आत गेल्यावर डावीकडे पाण्याची ३ टाकी आहेत. येथुन पुढे गेल्यावर एक दगडी भांड दिसते.त्याच्या पुढे अजून एक टाक आहे.या ठिकाणाहून परत ३ टाक्यांपाशी येऊन, येथून थोडे वरच्या बाजुस गेल्यावर आपण थेट बालेकिल्ल्यातच प्रवेश करतो. गडमाथ्यावर पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. गड छोटा असल्याने तो फिरण्यास अर्धा-एक तास पुरतो.

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
(किल्ल्यांबद्दलची माहिती ट्रेक क्षितिज.कॉम या संकेतस्थळाहुन साभार)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान फोटो..

गेल्या वर्षीचे आता का देतो आहेस ?
तरी म्हंटलं अजून पावसाचा पत्त्या नाही आणि गाव कसं हिरवं Happy

गेल्या वर्षीचे आता का देतो आहेस ?>>>>> खरंतर हे फोटोज पोस्ट करायचे राहुन गेले होते. यावर्षीच्या पावसाचा मुहुर्त शोधत होतो. Wink

सुंदर फोटोज!!!

हा तर माझ्या गावाच्या आजूबाजूचा परिसर. तळगळ, घोसाळगड आणि कुड्याच्या लेण्या गावी गेल्यावर आमची हक्काची भटकंतीची ठिकाणे. तो पुल आता बांधलाय पुर्वी तरीतून नदीपार करावी लागत होती. गावच्या आठवणींना उजाळा मिळाला.

छानच प्रचि !
[ अगणित वेळा रोहा परिसरात कामानिमित्त जाणं झालं. खूप ठीकाणं खुणवायचीं, विशेषतः पावसाळ्यात. पण कामाच्या गर्दींत नाहीं फिरतां आलं . << असतात बुवा काही लोक जाम लक्की >> हेंच खरं ! Wink ]

मस्तच!

तळागड आणि घोसाळगडाच्या माहितीत (चुकून) पुनुरावृत्ती झाली आहे की तशीच आहे माहिती?

२३, २६ फोटो बघून लगेच आपला काल्पनिक उडता गालिचा काढून खालच्या हिरवळीच्या वरून, १० च्या गालिचा-स्पीडने, थंड वारा पित, अगलद सैर करायची इच्छा उफाळून आली. Wink

२३, २६ फोटो बघून लगेच आपला काल्पनिक उडता गालिचा काढून खालच्या हिरवळीच्या वरून, १० च्या गालिचा-स्पीडने, थंड वारा पित, अगलद सैर करायची इच्छा उफाळून आली.>>> +1000

फोटो नेहमीप्रमाणेच उत्तम, लेखही छान जमलाय. पण काही संदर्भ चुकीचे लिहिले आहेत.
कुंडलिका नदी मांदाड खाडी (याला खाजणी म्हणतात) येथे समुद्राला मिळत नाही. ती रेवदंडा खाडीला 'साळाव' येथे समुद्रास मिळते.
शिवाजी महाराज जंजिराच्या सिद्दीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी तळागड व घोसाळगड ह्यांचा उपयोग करत असत.
रोह्यावरून (रोहा-मुरुड रस्ता) घोसाळा-भालगाव मार्गे गेले असता खाजणी गाव ते मांदाड असा ब्रिज आहे.
याच खाजणी गावात खूप जुने असे 'काळकाय' देवीचे मंदिर (मांदाड ब्रिज वरून समोर दिसते आहे ते) आहे. बाळासाहेब ठाकरे सह अनेक सी.के.पी. लोकांची हि कुलदेवी आहे.
घोसाळगड या मार्गावरील घोसाळे गावात डोंगरावर आहे. ताम्हणी घाट (कोलाड जवळ) इथून लांब आहे.
अजून काही बाबतीत (ऐतिहासिक संदर्भ) शंका आहेच पण मी त्याची स्वत: पुन्हा खात्री करेन आणि मगच लिहीन.

<< कुंडलिका नदी मांदाड खाडी (याला खाजणी म्हणतात) येथे समुद्राला मिळत नाही. ती रेवदंडा खाडीला 'साळाव' येथे समुद्रास मिळते. >> खरंय . या नदीच्या कांठावरून रोहा- रेवदंडा रस्ता जातो व तो अलिबाग - मुरुड रस्त्याला रेवदांड्याला खाडीवरील पुलाजवळ मिळतो.

सुरेख.

गारवा कधीचाही असाला तरीही (गत वर्षीचा असला तरीही) मनाला भावणारा आहे . सगळी प्रचि सुंदर आली आहेत

प्रचि ०८ (मारुतीरायाच्या पायाखालील दानव / राक्षस) आणि प्रचि १६ ( गज आकृती प्रमाणे खांब) ह्यावर थोडी माहिती दिलीत तर आवडेल).

वाह!!!!!!! सुंदर हिरवेगार फोटोज... आणी बरोबरचा इतिहास सांगतोस तो वाचायला खूप छान वाटते.. किती नवीन माहिती मिळाली.. Happy

Pages