वाद

Submitted by रेनी on 17 June, 2016 - 13:55

तुला मला विभागून जाते एक रेघ
कुणाच्या बाजूने बरसावे ह्या वादात निघून जातात मेघ

वाद येतात काही काळ आपल्यात पाहुणचार घ्यायला
मग शांत मन लागते आपलेच घर सोडून जायला

वाद असतो कि खोटा अहंकार
उरतो मग व्यवहार किती होकार किती नकार

आज आपलेच घर सांगतेय जगाला दुःखाचे कारण
काय सांगणार, वादाचे असते घराला रोज नवे तोरण

बरेच झाले वादा नंतर वाद
हवाय आता एक सवांदाचा नाद

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ला मला विभागून जाते एक रेघ
कुणाच्या बाजूने बरसावे ह्या वादात निघून जातात मेघ >>>>>> हे जबरा!!!