अलगद कळी-कळीचा बदलून ढंग जावा...

Submitted by सत्यजित... on 15 June, 2016 - 18:15

पसरुन गंध सारा,उमलून रंग यावा...
अलगद कळी-कळीचा बदलून ढंग जावा!

माझ्या अबोलण्याने,गावून गीत जावे!!
त्याच्या सुरांत काही,असणार गोड कावा!

माझे अबोल गाणे,गावेस तू असे की...
अंदाज मैफिलीने उबदार पांघरावा!

कानांत बोलताना,छेडील केस वारा...
अंगातुनी शहारा,लयदार सर-सरावा!

प्रीती-फुलांत न्हावे,अगांग तारकांचे...
रात्रीस सापडावा,माझा-तुझा पुरावा!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कानांत बोलताना,छेडील केस वारा... >>> ही ओळ खूप आवडली

प्रीती-फुलांत न्हावे,अगांग तारकांचे...
रात्रीस सापडावा,माझा-तुझा पुरावा! >>> व्वा..!

मस्तच सत्या. Happy

माझ्या अबोलण्याने,गावून गीत जावे!!
त्याच्या सुरांत काही,असणार गोड कावा!

माझे अबोल गाणे,गावेस तू असे की...
अंदाज मैफिलीने उबदार पांघरावा!
>>
हे दोन्ही भारी आहे पण एका पाठोपाठ आल्याने मजा जाते आहे असे वाचताना वाटले.

छान