पाळला नाही अबोला रुसुनसुध्दा

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 June, 2016 - 02:17

भोवती फिरते रवीच्या अजुनसुध्दा
प्रेम करते प्रेम त्याचे नसुनसुध्दा

माणसाचे एकटेपण जात नाही
दूरवर घनदाट वस्ती वसुनसुध्दा

संशयाची पाल चुकचुकते मनाशी
निरसनाचे पेस्टकंट्रोल हुनसुध्दा

चातकासम वाट बघते पावसाची
बेभरवश्याचा असामी कळुनसुध्दा

नाइलाजास्तव असावी शांत ती ही
बोलण्यास्तव जीभ सक्षम असुनसुध्दा

जन्मभर आत्मीयतेचे पेरले बी
पीक हाती लागले ना कसुनसुध्दा

फक्त वारंवार चुकले हेच माझे
पाळला नाही अबोला रुसुनसुध्दा

(टिप - हुनसुध्दा ह्या मिसर्यात सुट घेतलेली आहे.)

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओढून ताणून यमक जुळवल्यासारखी वाटली...>>>>>>

अहो यालाच तर गझल म्हणतात!
शीर्षके फार फार सुंदर असतात. आतला कंटेंट त्याच्या उलट.

असो.

शीर्षक छान वाटले म्हणून वाचायचा मोह आवरला नाही... आणि बरे वाटले नाही म्हणून प्रतिसाद देण्यास विसरलो नाही...

चुकले असल्यास क्षमा असावी...

तिसऱ्या शेरातील सूट आणि इंग्लीश शब्द टाळता येईल की काय म्हणून सहज एक ओळ सुचली!अर्थच्छटाही बऱ्या वाटल्या मलाच,म्हणून देतो आहे इथे!

'निरसनाची औषधी'ही 'खलुन'सुध्दा!

ख़याल उमदा !

ही भरीचा वाटतो आहे असे वाटून गेले.... जरूर विचार करते आपल्या सुचवणीचा !

धन्यवाद !

>>>ही भरीचा वाटतो आहे असे वाटून गेले....>>मलाही वाटला होताच!:-)
त्याऐवजी,

'निरसनाची औषधी मी खलुनसुध्दा!'असाही पर्याय असू शकेल!

'निरसनाची औषधी'ही 'खलुन'सुध्दा!<<

आहे तितका कसनुसेपणा पुरे आहे अजून कशाला वाढवायचा ???

ही गझल अनयुज्युअल भाषा व्याकरण आणि लहेजा बघता कसनुशी झालेली आहे असे व्यक्तिगत मत . राग नसावा लोभ असावा

बाकी खयाल नेहमीसारखेच शैलीदार .
पुलेशु !

>>>आहे तितका कसनुसेपणा पुरे आहे अजून कशाला वाढवायचा ???>>>मला नाही जाणवला! आणि काही वाढवायचे,कमी करायचे किंवा कसे?हा अर्थातच कवीचा अधिकार!मी ओळ लिहिण्याआधी स्पष्टीकरण त्यासाठीच लिहिलेलं खरंतर!
राग नसावाच!लोभ वृद्धिंगत व्हावा!