Submitted by सत्यजित... on 11 June, 2016 - 05:50
सर एक श्रावणाची बरसून काय गेली...
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!
आता कळून चुकले,पाण्यात पीठ होते...
आई मला म्हणाली,करपून साय गेली!
पिल्लू तरी जगावे,इतकीच आस होती...
जमले स्तनांत तितके,पाजून गाय..गेली!
वाचायचीच आहे,वाचू उद्या सकाळी...
चिठ्ठी कशी उश्याला,विसरुन माय गेली!
पेरुन जे उगवले वाहून जात होते...
जाईल बाप..आई,लागून हाय,गेली!
तो बापही जगाचा,निश्चल उभाच आहे...
भक्ती भुकेजलेली अन् ठाय-ठाय गेली!
—सत्यजित
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सगळेच शेर अप्रतिम! गझल आवडली
सगळेच शेर अप्रतिम! गझल आवडली सर!
छान.
छान.
खूप अर्थपूर्ण आहे गझल...
खूप अर्थपूर्ण आहे गझल...
Nice
Nice
बर्याच दिवसांनी चांगले
बर्याच दिवसांनी चांगले काहीतरी वाचायला मिळाले. सुंदर
सुंदर! अप्रतिम! खूप आवडली गजल
सुंदर! अप्रतिम! खूप आवडली गजल !
सर एक श्रावणाची बरसून काय
सर एक श्रावणाची बरसून काय गेली...
गळत्या घरी गरीबी पसरुन पाय गेली!<<< मस्त
व्वा, क्या बात है...
व्वा, क्या बात है...
मतला खूपच सुंदर
मतला खूपच सुंदर
भावली!
भावली!
सर्वांचे हार्दिक धन्यवाद!
सर्वांचे हार्दिक धन्यवाद!
वा ! आवडली गझल !
वा ! आवडली गझल !
उत्कृष्ट
उत्कृष्ट
मनःपूर्वक धन्यवाद!
मनःपूर्वक धन्यवाद!