रहस्य कथा लेखन

Submitted by अपरिचित on 11 June, 2016 - 04:40

रहस्य कथा म्हणजे अशी एक कथा ज्यात क्षणा क्षणाला उत्सुकता असते जाणण्याची.

पुढे काय होईल ? कसे होईल ? वगैरे वगैरे सर्व "क"वरून सुरु होणाऱ्या प्रश्नांची बाराखडी आ वासून उभी राहायला हवी.
प्रत्येक वाक्यागणिक, प्रत्येक प्रसंगामध्ये उत्सुकता तुटेपर्यंत ताण ताण ताणली गेली पाहिजे.
वाचक लेखाला खिळून राहिला पाहिजे.

साधारण पणे ह्या कथालेखणात प्रश्न जास्त आणी लिखाण कमी असते. किन्बहुना प्रश्न जितके जास्त वाचकास पडतील तितके जास्त लेखण त्यास भावले असेल असे समजावे. ज्यप्रमाणे दुपारच्या रण्रणत्या उन्हात रिक्षावाल्यास प्रवाश्यची प्रतिक्षा असते तशीच प्रतिक्षा वाचकास लेखणाच्या पुढिल भागास असायला हवी.

एक उदाहरन देतोय. प्रस्तुत उदाहरणात केवळ एकच वाक्य आहे पण त्या वाक्याने पड्लेले प्रश्न मात्र कैक आहेत.

गावातील पाटीलचे कुणा एक बाई बरोबर अनैतिक संबध होते. पाटलीन बाईला ह्याचा काहीच पत्ता नव्हता

[ बिच्चारी पाटलीन बाई, जेव्हा तिला कळेल तेव्हा काय वाटेल तिच्या जीवाला ?
रहस्यकथेत अधून-मधून भावनाप्रधान वाक्ये सहज खपली जातात म्हणून टाकायला काहीही हरकत नसावी]

वरकरणी वरील वाक्य साधे आणी विशेष असे काही जाणवत नाही पण रहस्य-कथाकार मात्र त्यातील रहस्य ताडकन ओळखतो.
आता ह्याच वाक्यात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांची यादी बघा:

  1. कोणाबरोबर संबध होते ?
  2. पाटलीन बाईला कसे माहिती नाही, तिचा नवरा कुठे अन काय दिवे लावतो ते ?
  3. पाटलीन बाईचे तर कुठे संबध नसावेत ना ?
  4. ती अनामिक, जिच्यासोबत संबध आहे, ती कदाचित पाटीलला ब्लैकमेल करत असावी ?
  5. जर ब्लैकमेल करत असावी तर का ? तिच्याकडे पाटीलचे कुठले गुपित असावे ?
  6. जर गुपित असेल म्हणजे पाटील ने काय जांगडगुत्ता केला होता ?
  7. त्या बाईला हे गुपित कळाले कसे काय ?

तर हे अस्स असत.

वरिल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजेच एक उपकथानक आहे,

तुम्हीही प्रयत्न करुन बघा. कथा पुढे सरकवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

1. कोणाबरोबर संबध होते ?
>>>>>>>देशमुखांच्या पत्नी शांताबरोबर
2. पाटलीन बाईला कसे माहिती
नाही, तिचा नवरा कुठे अन काय दिवे लावतो ते ?
>>>>>>>त्यांना माहीत होते, पण त्यांचेही देशमुखांशी संबंध असल्याने त्या गप्प होत्या!
3. पाटलीन बाईचे तर कुठे संबध नसावेत ना ?
>>>>>>>वर उत्तर दिले आहे
4. ती अनामिक, जिच्यासोबत संबध आहे,
ती कदाचित पाटीलला ब्लैकमेल
करत असावी ?
>>>>>>>उलट पाटीलच तिला BLACKMAIL करत होता.
5. जर ब्लैकमेल करत असावी तर का ?
तिच्याकडे पाटीलचे कुठले गुपित असावे ?
>>>>>>>देशमुखांच पोरगं पाटलांचं आहे.
6. जर गुपित असेल म्हणजे पाटील ने काय
जांगडगुत्ता केला होता ?
>>>>>>> पाटलालाच माहीत नव्हत की त्याच पोर देशमुखांचच आहे
7. त्या बाईला हे गुपित कळाले कसे काय ?
>>>>>>>तिनेच तर पोराला जन्म दिला

उदाहरण चुकिचे आणि निरर्थक वाटले.

उदाहरण हवे ' कट्टप्पा ने बाहुबली ला का मारले?'
...
काय उत्सुकता जागी झाली ना खाडकन....

गावातील पाटीलचे कुणा एक बाई बरोबर अनैतिक संबध होते. पाटलीन बाईला ह्याचा काहीच पत्ता नव्हता >>
पुढे....

पत्ता तरी असणार म्हणा! स्वत्: पाटलांना तरी कुठे पत्ता होता! पाटील बिचारे मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर ने ग्रासलेले होते. रात्र झाली की त्यांच्या आतला दुसरा पाटील जागा होई. त्यांचा अल्टर इगो! आणि जाई देशमुखांच्या घरी! त्यांची पत्नी शांताबरोबर ह्या दुसर्या पाटलाची प्रीत होती. देशमुख जायचा रात्रपाळीला बिडीच्या फॅक्टरीत्.

मुख्य पाटलाचे नाव सॅँडी होते आणि त्यांच्या अल्टर इगो चे नाव होते सुंडी.

...
...
ह्म्म्. कुणीतरी न्या अजून फुडं Lol

एका वाक्यात उत्तरे लिहा
कोणाबरोबर संबध होते ?>>>>>>>>>>>>>>>> शांताबाय
पाटलीन बाईला कसे माहिती नाही, तिचा नवरा कुठे अन काय दिवे लावतो ते ?>>>>> म्हायती हाय
पाटलीन बाईचे तर कुठे संबध नसावेत ना ?>>>>> शक्यता हाय
ती अनामिक, जिच्यासोबत संबध आहे, ती कदाचित पाटीलला ब्लैकमेल करत असावी ?>>>>> चतुर हाय
जर ब्लैकमेल करत असावी तर का ? तिच्याकडे पाटीलचे कुठले गुपित असावे ?>>>>>> गुपित हाय
जर गुपित असेल म्हणजे पाटील ने काय जांगडगुत्ता केला होता ?>>>>>> चंपाबाय
त्या बाईला हे गुपित कळाले कसे काय ?>>>>>> कळला हाय

बाईचा नखरा
पाटील बकरा
मारतोय मारतोय मारतोय मारतोय
रात्रीच्या चकरा
बकरा चकरा बकरा चकरा चकरा चकरा चकरा चकरा
शांताबाय

अरे प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात काय लिहिताय्. काय प्रश्नपत्रिका दिलीय का सोडवायला!

ते प्रश्न म्हणजे क्लू समजून पुढे कथा वाढवा. Wink