एकच धागा

Submitted by बेफ़िकीर on 4 June, 2016 - 12:43

कुत्रा जोरजोरात भुंकतो (कोणाशी तरी बोलायचंय)

अवलोकन
संपादन

मी आणि माझा मित्र एका लेडीज होस्टेलच्या शेजारी राहतो. माझी गफ्रे त्या होस्टेलला नाही हे आधीच क्लीअर करतो. शिवाय, तुमचे कितवेही असले तरी माझे दुसरे कोणतेही क्रश नाही. मुलगी असतो तर शाखाचे पोस्टर भिंतीवर लावून आयुष्यभर अनिमीष लोचनांनी ते बघत राहिलो असतो. पण मी कुठली मुलगी व्हायला? एवढा सुपिरियर नाही मी! माझे टी शर्ट खोलीतल्या खोलीत फूटबॉल खेळल्यानंतर घामाने भिजतात. पण हे काही मला गफ्रे मिळण्याचे कारण असू शकत नाही असे मध्यंतरी काही मायबोलीकरांनी सांगितले. मग ती मलाच का मिळाली ह्यावर वेगळा धागा काढेन! तसेच, ती इतर कोणालाही का मिळाली नाही ह्यावर दुसरा धागा काढेन. माझी मायबोलीवरील धाग्यांची टक्केवारी १.८७ % एवढीच आहे. तिला दुसरा कोणीही मिळू शकला असता पण काही जण माझेही फॅन होऊ शकतात. फॅन्स मिळवणे हे काही सईचेच काम आहे असे नव्हे.

तर मुद्दा असा की शेजारच्या लेडिज होस्टेलमधील एकही मुलगी शनी शिंगणापूरला हक्क किंवा हट्ट म्हणूनही गेलेली नाही. तरीही त्यांनी एक गोंडस कुत्रे पाळलेले आहे. त्या कुत्र्याचे अवगुण सांगण्याआधी त्याचे प्लस पॉईंट्स सांगणे हेही मी माझे काम समजतो. ते कुत्रे मेल आहे की फिमेल इतका माझा अभ्यास नाही. पण ओरडण्याच्या फ्रिक्वेन्सीवरून फिमेल वाटते. ते तांबुस कम तपकीरी कम बर्गंडी कम राणी कलरचे कुत्रे असून भगव्या रंगाशी त्याचे दोन वर्षांपासून वाकडे असावे. कारण एकदा एक मुलगी केशरी टॉप घालून निघाली तेव्हा 'विजय मल्ल्या आणि भगव्या टॉप्सचे काय करायचे' ह्यावर आळीतल्या कुत्र्यांची मीटिंग ठेवली होती. त्याचे डोळे आणि त्यामुळे नजर तेवढी हिरवी आहे. तेथील काही तामसी मुली त्याला चिकनची हाडे टाकतात. मध्यंतरी एका जिवंत गायीकडेही ते कुत्रे लालसावलेल्या नजरेने पाहताना मला दिसलेले होते. नवीन कायद्याबाबत त्याला कल्पना नसावी.

तर सांगायचा मुद्दा हा की हे कुत्रे चोवीस तास भुंकत असते. त्यामुळे मला लॉग इन केलेले नसतानाही मायबोलीवरच असल्यासारखे वाटते. श्वानमानसोपचार तज्ञ असायला हवेत का हा प्रश्न मला काही वाहती पाने पाहून आधीही पडत होताच, आता तर अधिकच प्रकर्षाने पडत आहे. तसेच, कोणाशी तरी बोलायचंय ह्या धर्तीवर 'कोणावर तरी भुंकायचंय' असेही एक सदर निर्माण केले जावे असे अलीकडे वाटू लागले आहे. भीती एकच आहे की बाकीची सगळी पाने ओस पडतील आणि हे एकच पान ब्लॉगसारखे सुरू राहील.

मला कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होत नाही. पण तो कधी? जेव्हा ते कुत्रे एक चेंज म्हणून भुंकते तेव्हा! आगा न पीछा अश्या अवस्थेत एखादे कुत्रे जेव्हा अव्याहतपणे भुंकत राहते तेव्हा मी लोकल ट्रेनमध्ये असतानापेक्षा अधिक घुसमटतो. तंटा नाय तर घंटा नाय स्वभावाचे हे 'क क क क क क कुत्रे' आपण तोंडाने पुच पुच केले तरी वर बघून भुंकते. कोल्हा हा लबाड प्राणी असतो. उंदरांना घालवण्यासाठी कोल्ह्याचे मूत्र शिंपडण्याचा जुना प्रघात आहे. कोल्ह्यासारख्या नगण्य प्राण्याच्या मूत्राचाही इतका उपयोग असताना माणसाच्या कोणत्याच गोष्टीचा उंदरावर परिणाम न होणे ही एक गंभीर समस्या आहे मानवजातीपुढील!

मी त्या कुत्र्याला व्हेज चाऊ मेन टाकून पाहिले तर ड्यु आय डी कडे करतात तसे त्याने दुर्लक्ष केले. हे कुत्रे रात्रीबेरात्रीसुद्धा भुंकत असते. त्यामुळे माझ्या साधनेत व्यत्यय येतो. साधना हे मुलीचे नांव नाही. मी जी जगाला उल्लू बनवण्याची साधना यशस्वीरीत्या करत असतो त्यात व्यत्यय येतो. मला माझी स्वतःची हक्काची गफ्रे आहे. पण मुंबईकरांचे अच्छे दिन कधी येणार?

आणि हे कुत्रे नेमके आमच्या इमारतीकडे तोंड करून भुंकते. पलीकडच्या मुली खिदळतात. व्हाय शूड गर्ल्स हॅव ऑल द फन? भारतीय महिला राजकारणात कमी रस घेत नाहीत तर त्या फक्त राजकारणातच रस घेतात असे आता मला वाटू लागले आहे.

ह्या कुत्र्याचा बंदोबस्त कसा करावा?
-----------------------------------------

कसाही करा, इथे सांगू नका!
-------------------------------

लेडिज होस्टेलच्या शेजारी? पहिल्यांदा जागा बदल.
-------------------------------

श्शी:! शाखाचे काय पोस्टर?
------------------------------

अरे मुली भुंकत असतील
------------------------------

काहीही हं!
------------------------------

मुली सुपिरियर असतात हे बरीक खरे बोललास
------------------------------

दुसरा, तिसरा धागा नको काढू रे बाबा! पकलोय.
------------------------------

जिवंत गाय Proud
-------------------------------

जिवंत गाय ह्यात हसण्यासारखे काय आहे?
--------------------------------

जाऊदेहो, तुम्ही लक्ष देऊ नका
--------------------------------

तू पण आरडाओरडा कर वरून
--------------------------------

बर्गंडी? ह्या कलरचे कुत्रे आयुष्यात पाहिलेले नाही
--------------------------------

अहो, तुम्ही आयुष्यात काय पाहिले आहेत ते आधी सांगा
--------------------------------

राणी कलर पण म्हंटलाय तो
--------------------------------

कुत्रा आहे का इंद्रधनुष्य?
---------------------------------

सरळ तक्रार करा
---------------------------------

वाकडी तक्रार कशी करतात? Lol
----------------------------------

तुम्ही अ‍ॅडमीनकडे करता तशी
----------------------------------

मिसळपाववरची सॉल्लिड चर्चा बघा इथे ह्या विषयावरची
----------------------------------

जो लोग कुत्तेको कोसते है वो इमानदार होही नही सकते
----------------------------------

फेबूवरचे नका हो चिकटवत जाऊ
----------------------------------

ही ठार गंडलीये Lol
----------------------------------

घोटाळेबाज आणि भ्रष्ट काँग्रेजी कुत्तरडं असेल, तरीच भुंकतंय
----------------------------------

चोवीस तास भुंकणारे कुत्रे २००३ पासून दिसून येतात. ही लिंक बघा. अजून प्रचाराच्याच मोडमध्ये आहेत.
----------------------------------

मेल, फिमेल ओळखता येत नाही? ऐतेन! त्यामुळेच भुंकत नसेल ना?
----------------------------------

सई आणि शाखाचा काही सुतराम संबंध आहे का इथे?
----------------------------------

अग वेडाबाई धागा कुणाचा आहे बघ की?
----------------------------------

ए, कुरडया झाल्या का गं तुझ्या?
----------------------------------

धागा वाहता झालाय का?
----------------------------------

नाही अजून, ए, हे इथे काय विचारतेस
----------------------------------

Lol सॉरी सॉरी, मला वाटले इथे काहीही चालेल
----------------------------------

बरोबर वाटले
----------------------------------

व्हेज चाऊमेन? कुत्र्याला काय टाकावे हे कळते का? कुत्रा आहे तो कुत्रा!
----------------------------------

अहो, कुत्रा आहे की कुत्री हे ठरलेले नाही
-----------------------------------

तुम्ही गपा हो
-----------------------------------

>>>ते तांबुस कम तपकीरी कम बर्गंडी कम राणी कलरचे कुत्रे असून भगव्या रंगाशी त्याचे दोन वर्षांपासून वाकडे असावे. कारण एकदा एक मुलगी केशरी टॉप घालून निघाली तेव्हा 'विजय मल्ल्या आणि भगव्या टॉप्सचे काय करायचे' ह्यावर आळीतल्या कुत्र्यांची मीटिंग ठेवली होती. <<<

विजय मल्ल्या आणि टॉप ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत
------------------------------------

थांबलं का भुंकायचं?
------------------------------------

कोण?
------------------------------------

अय्यो काल आणि आज ओपीडीमुळे वेळच नाही मिळाला. आज पाहिले तर हा धागा आलेला. त्या ह्यांना सांगा ते हे द्यायला म्हणजे मग तिचे ते हे थांबेल.
------------------------------------

तुझ्या कसल्या साधनेत व्यत्यय येतो रे? घंट्याची साधना तुझी!
------------------------------------

वरील स्क्रीनशॉट योग्य जागी पोचवण्यात आलेला आहे.
-------------------------------------

हाड
--------------------------------------

मला आश्चर्य वाटते. माणसांनी एकमेकांना दिलेल्या प्रतिसादांमधून कुत्र्यांवरील धाग्यांमध्ये मांडलेले प्रश्न आपोआप सुटू शकतात ह्याचे. हे जे हाड म्हणाले तेच ह्या सगळ्याचे उत्तर आहे. त्या कुत्र्याला / कुत्रीला हाड म्हणण्यात आले किंवा हाड टाकण्यात आले तर प्रश्न मिटेल.
--------------------------------------

ऑन अ सिरियस नोट, कुत्र्याच्या भुंकण्याची जर मानसशास्त्रीय मीमांसा केली तर असे समजून येईल की असमाधान हे ध्वनीनिर्मीतीस कारणीभूत होणारे पहिले कारण आहे. ब्ला ब्ला ब्ला ब्ला
---------------------------------------

Rofl
---------------------------------------

Rofl
----------------------------------------

Rofl
---------------------------------------

>>>मला कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होत नाही. <<<

धागा कशाला काढला?
---------------------------------------

>>>तर मुद्दा असा की शेजारच्या लेडिज होस्टेलमधील एकही मुलगी शनी शिंगणापूरला हक्क किंवा हट्ट म्हणूनही गेलेली नाही. तरीही त्यांनी एक गोंडस कुत्रे पाळलेले आहे.<<<

ह्या दोन वाक्यांचा संबंध जो जोडून दाखवेल त्याला दहा गावे इनाम!
----------------------------------------

तुम्ही कवडीची अक्कल नसताना इथे पोपटपंची करताय

(संपादन - सॉरी, गल्ली चुकली)
----------------------------------------

छे छे, अहो योग्य गल्लीत आलात Lol
----------------------------------------

कुत्र्याच्या पेकाटात एक लाथ हाणा
----------------------------------------

ते अमानवी ठरेल
---------------------------------------

भुंकणं मानवी आहे का?
---------------------------------------

येथे चर्चा अशक्य आहे. दंभ आहे नुसता!
---------------------------------------

दुसरा धागा आला
---------------------------------------

कश्यावर?
---------------------------------------

कुत्रे का भुंकत नाही ह्या विषयावर
---------------------------------------

चालतंय आपल्याला काहीही
----------------------------------------

=================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+१
Rofl

:O

मस्त

एक नंबर Lol

मी एवढ्या रात्री इथे 'एक धागा'च काढायला आलेलो. त्या आधी हा एक'च धागा बघूया म्हटले तर वसूल झाले येणे Proud

सही Lol

शीशे के घर मे रहनेवाले अपने घर मे कपडे नही बदला करते..

महिला सक्षमीकरणाचे काय झाले पुढे ?
अशी वैचारीक उबळ येण्याचं प्रमाण कमी झालंय हे खरं आहे, पण पूर्वी लिखाणाचा बोटारीया कि भस्म्या झालेल्या आयडीकडून इतरांची टिंगल करण्याची जुनी खोड उसळी मारून आलेली दिसते... असं लिखाण करण्यापूर्वी जाओ उस आदमी का साईन लेके आव असं कुणी म्हणणार नाही असं रेकॉर्ड ठेवण्याची दक्षता घेतलेली असावी एव्हढीच अपेक्षा !

जबरा लिहिलेय बेफिजी.

Rofl
---------------------------------------
Rofl
---------------------------------------
Rofl
---------------------------------------

घोटाळेबाज आणि भ्रष्ट काँग्रेजी कुत्तरडं असेल, तरीच भुंकतंय
----------------------------------
<<

Lol

सहिच लिहिलेय, Rofl Lol

कुत्र्याच्या पेकाटात लाथ बसलेय कि नाही, हे माहित नाही. पण एका 'गाढवा'च्या पेकाटात नक्कीच लाथ बसलेय, हे वरिल एका प्रतिसादातून दिसून येतेय. Proud

अपरिचित | 5 June, 2016 - 14:05

काहीही कळालं नाही.... नक्की काय गौडबंगाल आहे हे

>>>>>

होणार सून मी या घरचीचा एकही एपिसोड न बघता किंवा बाहुबली चित्रपटाचा ट्रेलरही न बघता त्यातल्या जान्हवी आणि कटप्पाचे व्हॉटस्सपवर फिरणारे जोक्स वाचाल तर काहीच कळणार नाही किंवा अंदाज लागला तरी त्यातली मजा अनुभवता येणार नाही.

असो, मायबोलीवर नवीन असाल तर महिनाभर रोज हजेरी लावाल तर हळूहळू समजायला सुरुवात होईल.

तुर्तास संदर्भासाठी हे बघा

http://www.maayboli.com/user/57027/created

bhaari Happy

आई ग्ग Lol

Pages