राडा २०१६

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 June, 2016 - 06:20

विषय वाचून जरा वेगळच वाटल असेल ना? बर आता थोड स्पष्टीकरण.

आमच्याइथे आठवड्यातून एकदा तरी हा राड्याचा सीन होत असतो. राडा चालतो तो आमच्या परीसरात फिरणार्‍या सापांच्या जातींवर. एखादा साप दिसला की त्यांच्यावर हल्ला चढविण्यासाठी कर्कश्य आवाजात पहिला साळुंखी पक्षी आपल्या कर्कश्य आवाजात पुढाकार घेतात मग बाकीचे सैन्य जमते. ह्यात एक दोन कावळे , दयाळ, खार असे हे टोळके असते.

बर्‍याचदा धामण जातीचा साप असतो. हा झाडावर चढून पक्षांनी घातलेली अंडी, पिल्ल वगैरे खायला जातो म्हणून हे सगळे सैन्य त्याला हुसकावण्याच्या प्रयत्नात असतात. ह्यात सगळ्यात धिट असतात ते साळुंखी पक्षी तडक त्या धामणीवर चोचीने वार करतात.

मी खाली फोटो देत आहे त्यात धामण काही मला पुर्ण टिपता आली नाही पण त्या नाट्याच्यावेळी ज्या पक्ष्यांच्या, प्राण्यंच्या हालचाली होत्या त्या दाखवण्याचा मी खाली थोडक्यात प्रयत्न करते.

(वरील माहीती मी माझ्या मागच्याच राड्याच्या धाग्यावरून पुन्हा इथे टाकत आहे. ) http://www.maayboli.com/node/54663

१) राड्याचे महत्वाचे पात्र आंब्याच्या फांदीवरून नारळाच्या दिशेने.

२)

३) साहेब तरबेज नारळकाढ्णार्‍या माणसाप्रमाणे वेटोळे घालत वर चढताहेत.

४)

५)

६) राड्यासाठी आलेले हल्लेखोर की सैनीक? जे समजाल ते.

७) ह्या फोटोत पहा मुख्य पात्र नारळात आहे आणि शिपाई/हल्लेखोर त्याच्यावर हल्ला करण्याचा चान्स पहाताहेत.

८) सध्या खालूनच पाहू बाकीचे सैन्य काय करतेय ते.

९) नारळ पाण्याची मजाच काही और. Lol

१०) या हू पाहूया कोण मला पकडतय. इमॅजीका पेक्षा भारी वाटतय राव.

११) पकडा मला पकडा.

१२) यहां से वहां वहां से यहां

१३)

१४) खारूताई मोठ्या धाडसी आहेत. चालल्यात धामणीशी युद्ध करायला.

१५) हिम्मत असेल तर ये बाहेर झावळ्यांखाली काय लपतोस?

१६) साळुंखी बाई सगळ्यात लढवैय्या कर्कश्य आवाज काढत डायरेक्ट वार करतात.

१७)

१८) आता काय म्हणाव ह्या खारुटलीला? डायरेक्ट आमने सामने करतेय. आपला जीव काय तो.

१९) साहेबांनी काहितरी बहुतेक गिळल आणि मॉडेलिंगसाठी माझ्या कॅमेर्‍यासमोर.

२०)

२१)

२२) काढ ग फोटो

२३) माबोकरांना वेडावून दाखवताना फोटो टाक ग माझा.

ह्यावेळी धामण जास्त जखमी न होता पसार झाली.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे ! खतरनाक आहे .

माहेरी आम्ही तळमजल्याला रहायचो . बेडरूमच्या खिडकी बाहेर एक छोटसं ग्राउन्ड होतं आणि काही झाडं होती , कम्पाउडमध्येच .
दूपारच्या वेळी कर्कश आवाज येउ लागला की आम्ही खिडकीत जमायचो आणि शोधायचो .
८०% वेळा एखाद तरी जनावर दिसायचं , झाडांमध्ये .

तो आवाज ईतका डोक्यात बसलाय, सध्या ८व्या मजल्यावर रहातो , गेल्या आठवड्यात असाच आवाज आला तर मी खिडकीबाहेर बघणार होते. Wink

वाह काय मस्त आहे हा सगळा प्रकार !
कॅमेर्‍यात टिपलाय देखिल अगदी मस्त तपशीलवार, एखाद्या पाककॄती साठी प्रत्येक टप्प्याचे फोटो काढावे तसे.

खूप आवडला हा लेख Happy

सही..
अंगणाबाहेर करंजीच्या झाडावर एक दिवस एक खारुताई खुप अस्वस्थ होउन ओरडत होती.. तिच्याबरोबर आम्ही पण खुप शोधल पण या कंच्याएवढ्या मोठाल्या डोळ्यांना काही दिसेल तर शप्पथ.. शेवटी जे काय होत ते निघुन गेल असावं न ती माता शांत झाली.. अधिक आमचापन जी भांड्यात..

जागुले.. कसले क्षण टिपलेयस.. धामण ने तर क्लोजप दिलाय तुला..बघूनच काटे आलेत..

ऐन पावसाळ्यात काय होत असेल.. तुझ्याकडच्या थरार नाट्यांना भर येत असणार..

थरथराट एकदम, तुमच्या धाडसाचे कौतुक. क्लोजप खतरनाक.
प्रत्येक साप हा अस्सल नाग किंवा ब्लॅक मंबाच असतो अशी ठाम समजूत असल्याने साप दिसताच त्याच्या आणि माझ्यात मैलभर अंतर तरी रहावे असाच माझा प्रयत्न असतो. कॅमेरा वगैरे दूरच्या बाबी!

शोभा, मनिमोहोर स्वस्ति, हर्पेन, चनस, भाऊ, मानुषी, उमेष, दिनेशदा, साति, मॅगी, जो एस, यो, निधी, शांकली, टिना, अमित, वर्षूताई, अमेय, सायो, शशांकदा, मित, संजीव धन्यवाद.

बाप रे !!!!!!!!!!!!!!!
जागुताई हे सगळे तु टिपलेस??? ग्रेट आहेस

Pages