क्वीक हील मधल्या अलाऊड साईट्स डिसअलाऊ करणे

Submitted by पियू on 31 May, 2016 - 03:59

सैराटमधल्या 'पप्पा तिरु तिरु' रिंगटोनचं कौतुक वाचून मी त्या रिंगटोनसाठी गुगल केलं आणि पहिली साईट आली तिच्यावर क्लीक केलं. तर एक पॉर्न साईट उघडली. मी ती बंद केली आणि दुसरी उघडली तर तिथेही तेच..तिसर्‍या साईटवरही तेच.

अनफॉर्च्युनेटली.. मला पहिल्या साईटच्यावेळी क्वीकहीलने विचारलं होतं.. अलाऊ करु का म्हणून.. मी अलाऊ म्हटले. नंतर एक टॅब येतो.. "जर तुम्ही राँगली साईट अलाऊ केली असेल तर इथे रिपोर्ट करा". मी तिथे जाऊन रिपोर्ट केले. पण इट इज सॉर्ट ऑफ फिडबॅक फॉर्म. क्वीकहील ने ती साईट परत उघडण्यापासून ब्लॉक करायला हवे ना खरं तर? मी क्वीकहीलच्या अलाऊड लीस्ट मधून ही साईट कशी काढू? ही मी माझ्या सिस्टीमसाठी अलाऊड केलेल्या साईटिंची लिस्ट कुठे दिसते?

बाय चान्स माझ्या सिस्टीममध्ये त्या साईटने काही कॅचे ठेवले असतील किंवा व्हायरस पाठवला/ साठवला असेल तर तो कसा ओळखू नी काढू? मी क्रोमच्या हिस्टीमध्ये जाऊन संपुर्ण हिस्टरी नी कुकीज नी एव्हरीथिंग क्लीअर केले आहे. तसेच क्वीक हीलने टोटल सिस्टीम स्कॅनिंगला लावली आहे. अजून काही?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडब्लॉक क्रोम मधे वापर त्याने तशा साईट्स ओपेन होत नाही

आणि ती सैराटची रिंगटोन पप्पा तिरु तिरू नव्हे तर "Papa duru duru vap Elmir." या नावाने आहे. युट्युब वर सर्च केल्यावर येते

धन्यवाद. मुलीला तिच्या फोनवरून करायला सांगते मग शेअर करते. तिच्या कडे तो कन्वर्टर आहे बहुतेक. ऑफिसात अ‍ॅक्सेस नाही.