येतो.

Submitted by जयदीप. on 29 May, 2016 - 14:27

पुरे झाली जरी असली प्रतीक्षा
विषाची घ्यायची नसते परीक्षा

जगाला हेलिकाॅप्टर वाटते; पण
तुला ती वाटते आकाशरिक्षा

तुला खाईल मन नंतर तुझे, बघ...
तुला नाहीच मी करणार शिक्षा

कसा गझलेत आणू 'मंत्र' माझ्या
मिळवले 'तंत्र' मी घेऊन दीक्षा

मला न्याहाळ अन् कर वाहवा तू
कुणाला पाहिजे आहे समीक्षा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा