मायबोलीचे " विकीपेज " का नाही????

Submitted by सिंथेटिक जिनियस on 29 May, 2016 - 10:35

मायबोली हे मराठीतले पहीले संकेतस्थळ आहे असे मानले जाते.जगभरातले मराठी लोक मायबोलीवर आहेत .१९९६ च्या गणेशचतुर्थीदिवशी हे संस्थळ स्थापन झाले.गुगल किंवा इतर सर्च इंजिनवर maayboli असे सर्च केले असता मायबोलीचे होमपेज दिसते,परंतु मायबोली या संस्थळाचा जन्म व त्या संस्थळाची झालेली वाढ याविषयी संपुर्ण माहीती देणारे विकिपीडीयावरचे पेज दिसत नाही.
असे विकीपेज सुरु करावे काय?
मायबोलीशी संबंधीत व्यक्ती विकीपेडीयावर मेंबर असु शकतात, ते असे पेज सुरु करु शकतात .
असे पेज सुरु केल्याने संस्थाळाची लोकप्रियताही वाढीस लागेल.
मायबोलीच्या धुरीणांनी जरुर विचार करावा....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यातला काही भाग सि.जि. यांनाही अद्यावत करता येईल, जसे इथे चालणारे उपक्रम इत्यादी.

काही भाग फक्त अ‍ॅडमिनचा भाग असलेले लोकच अद्यावत करु शकतात जसे सदस्यसंख्या, रोजचे हिट्स इत्यादी.