प्राणिसंग्रहलयांवर (zoo) बंदी घालावी काय?

Submitted by सिंथेटिक जिनियस on 28 May, 2016 - 07:03

टोकीयोच्या प्राणी संग्रहलयामध्ये अत्यंत कमी जागेत आपले ६० वर्षांचे आयुष्य खर्ची घातलेल्या ट्राजिक हनाको या हत्तीणीचा एकाकीपणामुळे मृत्यु झाला आहे.
ही हत्तीण दोन वर्षांची असताना तिला थायलंड ने जपान सरकारला भेट म्हणून दिले होते.तेव्हापासून ति काँक्रीटच्या एका छोट्या जागेत आपले आयुष्य व्यतीत करत होती.मुक्या प्राण्यांना अशी क्रूर जम्नठेप देणं ती ही माणसांच्या करमणूकीसाठी हे घृणास्पद कृत्य आहे.
http://m.huffpost.com/us/entry/hanako-loneliest-elephant-dies_us_57475cb...
आपण आज पासून ही शपथ घेऊयात की कोणत्याही प्राणी संग्रहलयाला आपण भेट देनार नाही,
जिथे अत्यंत तोकड्या जागेत प्राणी डांबुण ठेवलेले दिसल्यास PETA वा तस्तम प्राणिमित्र संघटनांना निदर्शनास आणुन देऊ
प्राण्यांनाही मन असते ,या भावनेतून अशी वागणुक कुठल्याच प्राण्याला देऊ नये
फिशटॅंक मध्ये मासे पाळणे ,पिंजर्यात पक्षी पाळणे वा तत्सम क्रूर गोष्टी घरी आनू नयेत .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नुसती झुच नाही तर वाघ सिंह बघायला जंगलात जाण्यावरही बंदी घालायला हवी. स्वतः च्या खर्चाने निसर्गसंवर्धनासाठी प्रयत्न करणार्या अतुल कुलकर्णीच्या एका लेखात त्याने स्वतःपुरते असे जाणे बंद केलेय असे वाचलेले.

ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!

ह्या प्रश्नाचे काय झाले. मिळाले का आरक्षण? आरक्षणासाठी आंदोलन वगैरे तुम्ही करणार होतात काय झाले त्याचे? आता परत नविन प्रश्न विचारताय, मग "ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी" ह्या प्रश्नाचे काय होणार?

प्राणिसंग्रहलयांवर (zoo) बंदी घालावी काय?>>>>>जरुर घालावी.
खुप सार्‍या (ZOO) मधे हिच गत आहे प्राण्यांची भारत आणि इतर देशात पण
जपान च्या दुसर्‍या एका स्टेट मधे पण असेच दृश्य पाहैले होते.

प्रसाद वेळ कमी असल्याने जितके शक्य तितक्यांचे कल्याण करणे आवश्यक आहे. एकच मुद्दा धरून बसलात आणि त्यात अपयश आले तर वेळ फुकट जाणार.

हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. प्राणीसंग्रहालयात जाणे बंद करून प्राण्यांविषयीचे कुतुहल बंद होणार नाही. मग जंगलातील सहली वाढतील. त्यामुळे प्राण्यांच्या नैसर्गिक घरांवर गदा येईल.

सध्या संग्रहालयात बर्‍याचदा सोडवून आणलेले प्राणी, सर्कशीतून मुक्त केलेले प्राणी वगैरे असतात. त्यांना पुन्हा जंगलात सोडल्यास त्यांचे भाईबंद त्यांना पुन्हा स्वीकारत नाहीत. अश्या परिस्थितीत त्यांची खाण्या-पिण्याची आबाळ होते व ते लवकर मृत्यू पावतात. संग्रहालयात निदान त्यांना हक्काचे खाणे-पिणे मिळते. अश्या परिस्थितीत त्यांना येणारे मरण अगदी नैसर्गिक नाही, परन्तु जरा लांबवलेले असते.

बरं, मग जंगलात जाणे देखिल बंद कारावे काय? ह्याचेही उत्तर नाही असे आहे. जंगलात माणसाचा हस्तक्षेप किती असावा - ह्यावर नक्कीच मर्यादा असावी. पण माणूस हा देखिल निसर्गाचा एक भाग आहे हे समजून घ्यायला हवे. सध्या वन्य प्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते आणि त्याला पायबंद घालण्यासाठी अनेक उपाय योजिले जातात. त्यातला एक अतिशय परिणामकारक ठरलेला उपाय म्हणजे वनप्रेमींच्या जंगल-सफरी आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलेले प्राण्यांचे निरिक्षण हा आहे. अनेक आदिवासी आणि वनप्रेमी लोकांना अनेक वर्षांच्या अनुभवातून प्राणी 'नावानिशी' ओळखू येतात. ह्यात त्या प्राण्याचे सामान्य नाव नसून त्यांनी प्रत्येक वाघाला/ हत्तीला दिलेले विशेष नाम अभिप्रेत आहे. त्यांच्यामुळे सामान्य पर्यटकांना देखील विशिष्ट प्राणी माहिती होतात. अश्या वेळी कुणाची शिकार झाल्यास ह्या माणसांना त्या प्राण्याची अनुपस्थिती चटकन जाणवते आणि तपासास लवकर यश मिळू शकते. म्हणून अवैध शिकारी लोक शक्यतो प्रसिद्ध प्राण्यांच्या वाटेला चटकन जात नाहीत.

अति प्रमाणात वनसफरी पण चुकीच्याच आहेत. परंतु एका मर्यादेच्या आत मनुष्य संख्येला जंगलात जाऊ देणे हितावह आहे. प्रत्येक जंगलात केंद्रस्थानी मोठा भाग असा असतो जेथे केवळ वन्य अधिकारी, प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकृत व्यक्तिच जाऊ शकतात. येथे खर्‍या अर्थाने प्राण्यांना 'अभय' असते. आपण पर्यटक जातो ते केवळ वरवरच्या भागात फेर-फटका मारू शकतो.

प्राण्यांना भेडसावणारा मुख्य दुसरा प्रश्न (कदचित हाच जास्त महत्त्वाचा आहे) तो म्हणजे नॅचरल कॉरिडॉरचा अभाव. पूर्वी सर्व जंगले एकमेकांना हरित पट्ट्यांनी जोडली गेलेली होती. त्यामुळे प्राण्यांना एका जंगलातून दुसर्‍या जंगलात स्थलांतर करणे सहज शक्य होते. समजा दक्षिणेत दुष्काळ पडणार असेल तर त्याची कुणकुण प्राण्यांना आधीच लागून ते उत्तरेत जाऊ शकत असत. अगदी स्वातंत्र्यपूर्वकालापर्यंत हे शक्य होते. पुढे जशी मानवी वस्ती वाढत गेली तसे जंगलांना जोडणार्‍या हरीत पट्ट्यांमध्ये वृक्षतोड झाली. स्थलांतर बंद झाले. त्यामुळे वाईट परस्थिती आली असता प्राणी पटापट मरू लागले किंवा मानवी वस्तीवर आक्रमण करू लागले. जर प्राणी वाचवायचे असतील तर हे ग्रीन कॉरिडॉर्स पुन्हा निर्माण करणे गरजेचे आहे. त्या दिशेने सरकारने काही प्रयत्न देखिल केले आहेत.

एकंदरित वन आणि वन्यप्राणी संवर्धन व्हावे म्हणून त्यांचा अभ्यास आवश्यक आहे. मानवाला प्राण्यांच्या जीवनाचे प्रत्यक्ष एक्सपोजर मिळाले तरच त्यातून कुतुहल वाढेल, वनप्रेमी निर्माण होतील आणि संवर्धनास हातभार लावतील.

शंतनु छान विचार मांडले आहेत.

मूळ लेखात दिलेली टोक्यो झूमधल्या हत्तीणीची कथा खरच इतकी करुण आहे का? विकिपीडियाच्या माहितीनुसार
Lifespan: Asian elephant: 48 years, African bush elephant: 60 – 70 years, African forest elephant: 60 – 70 years
ती हत्तीण थायलंडमधून आणलेली म्हणजे प्रमाण आयुष्य ४८ वर्षे असायला हवे. झूमध्ये ती ६० वर्षे जगली.

ह्या संदर्भात एक आठवण हल्लीचीच... ४-५ महिन्यांपूर्वी बोरीवलीच्या संजय गांधी उद्यानात लायन/टायगर सफारीला गेलेलो. काही कारणास्तव लायन सफारी बंद होती आणि दोनच टायगर होते. तिकीट खिडकीवरल्या माणसाने वाघ दिसतील की नाही खात्री नाही सांगितले. पण आम्ही आत गेलो तर तीन वाघ एका बंदिस्त भागात होते. बसचालकाला जणू माहीतच होते तिथे वाघ दिसणार. बस थांबल्यावर लोकांनी फोटो काढण्यासाठी एकच गलका केला. सुरुवातीची एक्साईटमेंट ओसरल्यावर अचानक मला का कोण जाणे वाटले की ते वाघ जाम वैतागलेले होते. अचानक मला फारच अपराधी वाटले. त्या क्षणी ती सफारी मला खूप क्रूर वाटली.

खूप मुद्दे निघतील चूक बरोबरचा विचार करायला गेल्यास.

मांसाहार करणे, अन्न म्हणून जनावर खाणे.. चूक की बरोबर
गळ्यात पट्टा टाकून कुत्रा फिरवणे, साखळीला बांधणे, त्यावर स्वताची मर्जी लादणे... चूक की बरोबर
बैलगाड्या, टांगे, ओझ्याचे गाढव, सर्कशीतील प्राणी व्यवसायासाठी त्यांना वापरणे .. चूक की बरोबर
गिनिपिग म्हणून प्राण्यांना वापरणे .. चूक की बरोबर
जनावरांच्या कातडीच्या वस्तू वापरणे ... चूक की बरोबर

जग माणसांचे आहे याचा स्विकार करा आणि पुढे जा ..
इथे एकीकडे माणसे माणसांना माणसांसारखी वागणूक देत नाहीत असे चित्र दिसते, तर एकीकडे काही जण जनावरांच्या हक्कासाठी लढतात असेही आढळते..
आपापले विचार ..

कोर्टही हरणाची शिकार केली तर शिक्षा ठोठावते ..
पण घरचा उंदीर पकडून आपण विष चारून मारतो त्याच्या जीवाची कोणी दखल घेत नाही..
का? उंदराला जीव नसतो का ???
का फक्त गणेशोत्सवात गणपतीचा वाहन म्हणून त्याला महत्व येते तेच पाच दिवस त्याचे सन्मानाने जगण्याचे असतात?

ऋन्मेश तुझा मुद्दा मान्य ,कामासाठी जे जनावर वापरतात त्याच्यावरही बंदी आली पाहीजे,बैल गाढव् वगैरेंना अमानुषपणे काम करायला लावतात ते बंद झाले पाहीजे.दूधासाठी जी जनावरे पाळातात् त्यांना दिवसातला काही काळ बाहेर चरायला सोडतात ते ठीक आहे.जिथे जनावरांना पुर्ण डांबुन ठेवतात, मग ते कोणतेही जनावर असो त्यावर बंदी आली पाहीजे.

घरात कुत्रा, मांजर पाळणे पण अयोग्यच आहे एक प्रकारे जन्मठेपच आहे .. या कुत्रे मांजरी पाळणार्यांना डांबून ठेवल पाहिजे वर्षभर जेलात Happy

शंतनु +१

शंतनु भट - पोस्ट आवडली.

कोर्टही हरणाची शिकार केली तर शिक्षा ठोठावते >>>> ते हरिण दुर्मीळ प्रकारचे होते. त्याला मारण्यावर बंदी आहे आणि म्हणून शिक्षा झाली.

मूळात माणुसच या पृथ्वीवर "उपरा" आहे, त्याने पृथ्वी सोडून निघुन जावे..... अशीही एक विचारधारा आहे Proud
(जशी ती भारतात आर्य बाहेरुन आले वगैरे बाबत आहे Wink )