Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2016 - 03:01
तुझा मृदगंध रुसलेला पुन्हा येईल ताळ्यावर
ऋतूंना सांग आता ....राज्य आणा पावसाळ्यावर
तिने केसांतुनी बोटे फिरवली की गझल सुचते
कवी निर्माण करते ती खुळ्या शालीन चाळयावर
पसारा खिन्न शेरांचा .... तिच्यावाचून फसलेल्या
तिला सोडून बाकी भाळलेले ह्या गबाळ्यावर
मला माझ्या घरामध्ये नको मानूस आनंदी
व्यथा खच्चून भरलेल्या वह्या आहेत माळ्यावर
तुला माहीत नाही काय जादूगार आहे मी
खरी मैफील गाजवतो तुझ्या खोट्या उमाळ्यावर
दिलासा जाउदे, साधा उसासाही पुरे झाला
अखिल ब्रह्माण्ड हे कुर्बान थोड्याश्या जिव्हाळ्यावर
नव्याने काजळी धरली अश्या त्रासून बघण्याने
स्मृतींना जो दिला होता तुझ्या मी त्या उजाळ्यावर
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोनवरून टायपली आहे. चू भू दया
फोनवरून टायपली आहे. चू भू दया घ्या
मला माझ्या घरामध्ये नको मानूस
मला माझ्या घरामध्ये नको मानूस आनंदी
व्यथा खच्चून भरलेल्या वह्या आहेत माळ्यावर>>व्वा
अप्रतिम बेफिकिर
अप्रतिम बेफिकिर
खूपच छान !
खूपच छान !
वाहवा बहोत खुब !
वाहवा बहोत खुब !
वाह वाह वाह क्या बात है !!
वाह वाह वाह क्या बात है !!
आवडली गझल
आवडली गझल
सहीच, आवडली गझल.
सहीच, आवडली गझल.
वाह,
वाह,
वाह, मतला आणि माळ्यावर सर्वात
वाह, मतला आणि माळ्यावर सर्वात जास्त आवडले
व्वा दुसरा,चौथा,पाचवा शेर ...
व्वा
दुसरा,चौथा,पाचवा शेर ... क्या बात !!!
गझल आवडली पहिला शेर पुर्ण
गझल आवडली पहिला शेर पुर्ण नाही समजला !
मस्तय !
मस्तय !
वा वा .... व्यथा मस्तच..
वा वा .... व्यथा मस्तच.. मतलाहि अप्रतिम!!
सुन्दर गझल..
जमिनीचा मोह होतो आहे.
तिने केसांतुनी बोटे फिरवली की
तिने केसांतुनी बोटे फिरवली की गझल सुचते
कवी निर्माण करते ती खुळ्या शालीन चाळयावर
पसारा खिन्न शेरांचा .... तिच्यावाचून फसलेल्या
तिला सोडून बाकी भाळलेले ह्या गबाळ्यावर
मला माझ्या घरामध्ये नको मानूस आनंदी
व्यथा खच्चून भरलेल्या वह्या आहेत माळ्यावर
तुला माहीत नाही काय जादूगार आहे मी
खरी मैफील गाजवतो तुझ्या खोट्या उमाळ्यावर
सुंदर शेर…. आवडले.
मला माझ्या घरामध्ये नको मानूस
मला माझ्या घरामध्ये नको मानूस आनंदी
व्यथा खच्चून भरलेल्या वह्या आहेत माळ्यावर>>
छान!