स्वप्नात रोज येते ती उर्वशी असावी ...

Submitted by बाळ पाटील on 28 May, 2016 - 00:27

ही आस मृगजळाची दरमाणशी असावी
स्वप्नात रोज येते ती उर्वशी असावी

मी भेटल्या जनाची तिरकीच चाल होती
माझीच भाग्यरेषा बहुधा तशी असावी

ती पाळणाघरे अन दिमतीस दक्ष दाया
श्रीमंत ती मुले पण बेवारशी असावी

मिष्टान्न भोग ऐसा का घमघमाट तेथे
बहुतेक आज त्यांना एकादशी असावी

भटकून विश्व झाले हाती तुरी मिळाल्या
आता मनात त्यांच्या वाराणशी असावी
-- बाळ पाटील , उस्मानाबाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भटकून विश्व झाले हाती तुरी मिळाल्या
आता मनात त्यांच्या वाराणशी असावी<<<

Proud गझलेतही मोदीविरोध आला का!!

खयाल अधिक गहिरे व्हावेत अशी नम्र अपेक्षा!

गझलेतही मोदीविरोध आला का!! >>>>>>>

............ अजिबात नाही . उलटपक्षी मी माझ्या गझलेत राजकारणासारखा फालतू विषय टाळण्याचा प्रयन्न करतो .आता त्या शेराचे स्पष्टीकरण देतो....... माणूस सुखाच्या शोधात जगभर फिरतो, पण त्याला कळून चुकते की कशातच सूख नाही, मग तो अध्यात्माकडे वळतो ( वाराणशी ) , या अर्थाने. मजबुरी म्हणून उहापोह करतो आहे. बेफिकीर सारख्या जाणकाराने असा समज करून घ्यावा हे मी माझ्या व्यक्त होण्याचे अपयश समजतो !

अहो तसे काही नाही. मला तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ केव्हाच कळलेला होता. ते जामोप्या खिदळले म्हणून मला हसू आले. आता तुम्हाला जामोप्या कोण हे माहीत नसले तर जाऊदेत.

अहो तसे काही नाही. मला तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ केव्हाच कळलेला होता. ते जामोप्या खिदळले म्हणून मला हसू आले. आता तुम्हाला जामोप्या कोण हे माहीत नसले तर जाऊदेत. .......>>>>
..... बेफिकीरजी, माझ्या लक्षात आला नाही विनोद , असो !!