Submitted by जयदीप. on 26 May, 2016 - 14:11
जागच्या जागीच होतो केवढा मी हरवलो
मी तुझ्या प्रोत्साहनाला दाद होतो समजलो
मी इथे हेतूपुरस्सर पोचलो आहे खरा
पण इथे आलो कशाला तेच आहे विसरलो
गोंद कुठल्या कंपनीचा लावला होतास तू
लागला धक्का जरासा आणि आपण विखुरलो
खूप दिवसांनी स्वतःशी बोललो अन् जाणले
फार वरवर बदललो पण आत नाही बदललो
बंद कुठल्याही क्षणी होईल इच्छांचा दिवा
जाणण्यासाठी स्वतःला खोल अाहे उतरलो
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा बदललो छान
वा
बदललो छान