चार मित्रांचा ट्रेक- ढाकबहिरीच्या नजरेने

Submitted by शुभम एडेकर on 24 May, 2016 - 08:37

ढाकची बहिरी
रायगड जिल्ह्यात असलेल्या ढाकची बहिरी ट्रेक साठी फारच प्रसिध्द आहे. भल्या मोठ्या कातळात खोदलेली गुहा म्हणजे तिथे असलेली ढाकची बहिरी. 2 ते 3 महिने घरी बसल्यानंतर कुठे तरी ट्रेकला जाव अस मनात होतच आणि त्यात उन्हाळा चालु असल्याने बाकीचे ग्रुप पण शांत होते. पण आपल्याला उन्हाची सवय आहे असे मनात धरून आमचे तीन जणांचे ढाक बहिरीला जाण्याचे ठरले. निघता निघता आमच्या एका मित्राला लहर आली आणि तोही आमच्या सोबतीला निघाला.
DSC01918.JPG
आपल्या सर्वांचा जीवलग मित्र म्हणजे इंटरनेट...त्यावरून आम्ही थोडीफार माहिती घेत प्रवासाला निघालो. DSC01920.JPG
रात्री 12 वा. आम्ही कर्जत बसस्टॉप वर रात्रीचा निवारा शाेधला.बसस्टॉप अगदी स्वच्छ व हवेशीर होते. रात्र असुनही गावाकडची हिंडण्याची सवय असल्याने बसस्टॉपचा परिसर सुध्दा आमच्या पायाखालुन जायचा राहिला नाही. थोडासा टाईमपास करून निद्रासन घेतले पण आपल्या सर्वांचा साथ न सोडणारे डास इथे पण साथ सोडायला तयार नव्हते. आम्ही सुखात झापु हे काय डासांना मंजुर नव्हते. मग काय आमच्यातलाच एक आदिमानव तिथल्या जांभळाच्या झाडावर चढला आणि तेही रात्री 3 वाजता. ह्या वर्षीची पहिली जांभळ आम्ही कर्जतच्या बसस्टॉप वर खाल्ली (बघाव ते नवलच).
DSC01933.JPG
सकाळी 6 ची बस 7.30 ला आल्याने थोडीशी निराशा झाली पण गणपती बाप्पा मोरया करत आम्ही गडाच्या पायथ्याशी असलेल्या सांडशी गावात पोचलो.
DSC01937.JPG
लोकांना मांजर आडवी जाते तशी तिथल्या गावची माणस आमच्या आडवी जात होती म्हणजे आम्हाला घाबरवत होती. कदाचित त्यांच्या मनात असे काही नसेल पण आमच्या मनाचे खच्चीकरण करणे बाकी त्यांना चोख जमले. मुद्दा फक्त एवढाच की आम्हाला गडावर जायचा रस्ता माहित नव्हता. त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून आम्ही पुढे निघालो.
DSC01939.JPG
चारही बाजुला मोठ मोठे डोंगर आणि त्यात ढगाळ वातावरण त्यात गावातल्या माणसांनी दिलेले संदेश! आम्ही थोडे का होईना पण घाबरलो होतो. शेवटी आम्ही रस्ता चुकलेलो आहोत हे लक्षात आले. अनेक रस्ते असल्याने आम्ही रस्ता चुकलो होतो. गडावर जाण्याचा रस्ता आम्हाला मिळतच नव्हता.
DSC01945.JPG
अखेर एका ठिकाणी विश्रांती घेतली. आता डोक्यात घरी पळायचे नियोजन चालु होते. पण बहिरीला ही आमचे परत जाणे स्विकार नव्हते. आम्ही आमच्यातल्या एकाला रस्ता शोधायला पाठवले. त्यानी आम्हाला न सांगता 70 ते 80 फुट उभ्या कातळ भिंतीची चढाई करून रस्ता शोधुन काढला. आता मित्रांच्यात आपले नाक कापले जाणार नाही असा निर्मळ आनंद आम्हाला झाला.
DSC01953.JPG
वाट फार अवघड नव्हती पण आम्हाला उशीर झाला होता, उन्हाचा तडाखा वाढला होता.
DSC01972.JPGDSC01974.JPGगडाच्या मध्यावर पोहचल्यावर आम्हाला घनदाट जंगल लागले. करवंद, चुफी आंबे, कोसबा अशा रसाळ फळांचा अमर्याद अस्वाद घ्यायला मिळाला. पाण्याची कमतरता होतीच पण बहिरीत पाण्याची सोय असल्याने मन शांत होते.
DSC02019.JPGDSC02023.JPG
आता आमची थोडीफार अवघड चढाई सुरू झाली. ही चढाई सुध्दा अलगद पार करून आम्ही अखेर बहिरीत पोहचलो. तिथे पोहचण्याचा आनंद मी तरी शब्दात सांगु शकत नाही.
DSC02044.JPG
तिथे जाउन पहिल्यांदा मंदिराची घंटा वाजवली आणि मनसोक्त पाणीद्पिपिउन तिथुन दिसणा-या निसर्गरौम्य सौदर्याचा आनंद घेतला.
DSC02036.JPG देवपुजा करून पोटपुजे साठी जागा ठरवली आणि पोटपुजा करून घेतली. इथे थोडीशी निद्रा भेटेल अशी दुर्मीळ अपेेक्षा होती पण तिथल्या माश्यांनी आम्हाला काही झोपुन दिले नाही. बहिरीमध्ये दोन पाण्याचे टाके आहेत. WhatsApp-Image-20160524 (1).jpg
एका टाक्यात पिण्याचे पाणी व दुसऱ्या टाक्यात जेवणाची भांडी होती.
WhatsApp-Image-20160524.jpg
पलीकडच्या गुहेत मात्र खुप घाण होती. ती घाण आपण पुढच्या वेळेला 5 पटीने येऊन साफ करू असे ठरवले. 3.30 च्या आसपास आम्ही परतीच्या वाटेला निघालो. करवंद, आंबे आमच्या वाटेला होतीच. 6.50 च्या बसने आम्ही कर्जत रेल्वेस्थानकावर 7.30 वा. पोचलो. मग आपल्या लाईफ लाईनने प्रवास करत खडवलीला म्हणजे आमच्या घरी आलो आणि तेही ढाक बहिरीच्या प्रेमात पडून........
-शुभम एडेकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! फोटो हवेतत म्हणजे वाचणार्‍याल अगदी गेल्यासारखे वाटते! Happy

मनसोक्त पाणी ग्रहण केले >>.

ते पाणी ग्रहण चा अर्थ जरा वेगळा होतो तेवढा शब्द प्रयोग बदला! Wink

Chuk lakshat ananyabadda krusha saheb mi apla aabhari ahe....

Prasada saheb mi navin aslyamule photo kashe takayche te kalat navhte...
pan tumchya mhananya nusar mi photo upload kele ahet...dhanyavaad

अवघड जागा आहे पण तुम्ही फारच सोपी केलीत.तुम्हाला दुसरी सांडशी बस मिळाली.फोटोंतून किती अवघड आहे हे कळलेच नसते.पुढच्या ट्रेकचे पण लिहा नक्की.

मस्त लिहिलंय आणि फोटोही टाकायला जमले की !
अजूनही लिहित रहा.

आणि ते तेवढं मथळा मराठीतून द्यायचं बघा की.

लेख छान लिहिलाय आणि फोटो ही छान आलेत.

पण, असे दुर्गभ्रमणावरिल लेख लिहिताना फेसबुक प्रमाणे स्वत:चे बरेच फोटो टाकून स्वत:लाच प्रोजेक्ट करणे योग्य नव्हे. ज्या ठीकाणाला/गड-किल्ल्यांना भेट दिलीत त्या ठिकाणाचे वर्णन व त्या वर्णनाला लागू होतील असे फोटो लेखात टाकलेत तर ठिकाणाची, अवघड वाटांची जास्तीत जास्त माहिती वाचकांना मिळते.

मायबोलीवर स्वागत मित्रा !!

छान लिहिलं आहेस. एक अनुभवाचा सल्ला देतो. पुढच्या वेळी कोणत्याही अनोळखी ठिकाणी जाताना…भले नेट वरून पूर्ण माहिती काढली असलीस तरी किल्ल्याची वाट माहित नसताना गावातील माहितगार माणूस बरोबर घेत जा. प्रत्येक वेळीच गावकरी लुटायलाच बघतात असं नसतं. अनेकदा त्यांचे अनुभवाचे बोल असतात. त्यामुळे थोडे चार पैसे गेले तरी चालतील पण वाट चुकून अनर्थ ओढवू देऊ नये याची काळजी घ्या.

त्यामुळे नेट वर एखाद्या ग्रुपने वाटाड्या घेतलेला नसूनसुद्धा ते त्या विशिष्ट ठिकाणी / किल्ल्यावर व्यवस्थित पोचले याचा अर्थ असा नाही की आपणही प्रत्येक वेळी बरोबरच असू. अनुभव कितीही असला तरी सह्याद्री त्याचे भीषण रंगसुद्धा दाखवतो हे फक्त समजून घे. कोणताही कमीपणा न बाळगता माहितगार वाटाड्या घेतल्यास ते आपल्याच सुरक्षिततेसाठी आणि वेळ वाचण्याच्या दृष्टीने सोयीस्कर असतं.

फिरत रहा आणि लिहित रहा

dhayavaad sir.....pudhchya veli rasta mahit naslyas nakki vatdya neu....
apla nav kalel ka sir???

जुन्या ट्रेकरसनी नवीन लोकांना प्रोत्साहन द्या,प्रतिसादतरी द्या.इथे पन्नासजण वेगवेगळ्या स्तरातील ट्रेकरस नक्कीच आहेत.

छान शुभम. सह्याद्रीमित्रने सांगितलेल्या गोष्टी खुप मोलाच्या आहेत. असेही तुला घरातच ट्रेकरभाऊ भेटलाय. पुढील वेळेस दर्शन कडे माहीती करुन घेत जा. इंटरनेवर पण खुप माहीती सापडेल. आपल्या मायबोलीवर सुद्धा माहीती उपलब्ध आहे.