क्रेप पेपरची फुलं

Submitted by मनीमोहोर on 22 May, 2016 - 13:00

मध्यंतरी एका समारंभाला जायच होत. काही ही भेट न आणण्याची यजमानांनी विनंती केली होती . मला मनातुन काही तरी द्यावे असे वाटत होते पण काय द्यावे हे सुचत नव्हते. त्याच्याच काही दिवस आधी क्रेपची फुलं करणार्‍या एका बाईंची मुलाखत वजा माहिती पेपरामध्ये वाचली होती तेव्हा पासून ती फुलं मनात भरली होती. त्यामुळे स्वतः केलेली क्रेपची फुल भेट देण्याचा विचार पक्का झाला. त्यामुळे मला त्यांना स्वतः काही तरी करुन भेट देण्याचा आनंद मिळाला आणि यजमानांच्या विनंतीचा मान ही राखला गेला. यजमान ही ही अनोखी भेट बघुन खुश झाले.

मग नेट वर शोधाशोध सुरु झाली आणि शिकायला प्रारंभ झाला. नेट वर भरपुर महिती आहे त्यामुळे एकच अशी लिंक सांगता येणार नाही. कुठे मी कागद कोणता आणायचा ते शिकले तर कुठे तो कसा धरुन कापायचा हे. . व्हिडिओ बघताना जेवढे सोपे वाटते तेवढे ते प्रत्यक्ष करताना नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच थोडा प्रयत्न केला तर कोणालाही नक्की जमेल हे ही खरे आहे. मला सुध्धा पहिल्या प्रयत्नात नाही जमलं पण हळू हळु लागल जमायला

टीपा :
१) कागद नेहमी डबल क्रेपचा वापरावा. तो महाग असतो साध्या क्रेप पेक्षा पण कागद वळवणे खूप सोपे जाते
२) कात्री थोडी लांब आणि बारीक पात्याची घ्यावी कागद कापताना.
३) पेन्सिल्ने मार्क करुन मगच कागद कापावा व्हिडीओ नीट फॉलो करावा. पहिल्यांदा व्हिडेओ नुसते बघावेत खूप वेळा आणि नंतर त्यातल्या त्यात सोप्या फुलांपासून सुरवात करावी
४) ही फुल घरात ठेवायला छान दिसतात तसेच भेट म्हणुन द्यायला ही सुंदरच वाटतात. स्वतः केलेली असल्याने देणार्‍याला आणि घेणार्‍याला ही खूप समाधान मिळते.
५) फुलं धुता येत नाहीत हे खरे आहे पण तसा त्यांना येणारा खर्च अगदीच नगण्य असल्याने खराब झाली की टाकुन देऊन दुसरी करायला ही काही वाटत नाही
६) शाळेतल्या मुलांना कातरकाम खूप आवडते. त्याच्यासाठी सुट्टीत हा खूप चांगला क्राफ्ट पर्याय आहे सोपे सोपे प्रकार त्यांना करता येतील आणि करायला आवडेल ही त्यांना.
हे मी केलेले पहिले काम

IMG_20160528_071935.jpg

हे मी केलेले काही नमुने

१)

From Drop Box

२)
From mayboli
३)

From Drop Box

४)

From mayboli

५)

From Drop Box

६)

From mayboli
७)
From mayboli

८)
IMG_20160528_074112.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रेपची फुल ऐवजी मी "केप्रची " फुलं अस वाचत होते सारख सारख, म्हणुन नावात बदल केला आहे. केप्र मसाले फार जवळचे आहेत ना म्हणून असेल ( स्मित) .

मनीमोहोर | 24 May, 2016 - 03:55
क्रेपची फुल ऐवजी मी "केप्रची " फुल अस वाचत होते सारख सारख
<<<, सेम पिंच, मीपण असच वाचत होते.. सांगनार होते नाव बदलायला, पण बहुतेक राग येईल म्हणुन नाही सांगितलं.

फार फार अप्रतिम केलीयेत फुलंं...
किती सुबक आणिप्रमाणबद्ध आहेत!!
तुमच्या हातात जादू आहे...
देखणे ते हात ज्यांंना निर्मितीचे डोहळे....

टीना, शाली धन्यवाद .

शाली, यू ट्युब वर खूप व्हिडीओ आहेत . ते बघून केलय.

सारिका धन्यवाद.

मी फोटो खाजगी जागा मध्ये जाऊन अपलोड करते.

पकाशचित्रे कशी अपलोड करावीत असा एक धागा आहे . तो पण उपयोगी होईल.

सुरेख!!
अबोली आणि सोनटक्का करता येतील का?

Srd धन्यवाद.

अबोली आणि सोनटक्का करता येतील का? >> मला व्हिडीओ बघितल्या शिवाय नाही येत करता. आपल्या भारतीय फुलांचे व्हिडीओ कमी आहेत.

Pages