मंझिल से बेहतर ये रास्ते...

Submitted by जिप्सी on 22 May, 2016 - 11:23

"मुशाफिरी", दिवाळी अंक - २०१५ मध्ये प्रकाशित झालेले हे फोटोफीचर थोडे आणखी फोटो अ‍ॅड करून मायबोलीकरांसाठी.
छायाचित्र :- जिप्सी
शब्दः- मायबोलीकर ललिता प्रिती
========================================================================
========================================================================

सुट्ट्या आणि पर्यटन म्हटलं की लक्झरी बस, ट्रेन, विमान हि वाहनं आणि त्यांच्या बुकिंगची धांदल आलीच. पण महाराष्ट्रातल्या अंतर्भागातील्या एखाद्या किल्ल्याच्या किंवा जंगलाच्या भटकंतीला जाताना एका विशिष्ट टप्प्याच्या पुढी हि "आपली" वाहनं कामाची नसतात. तिथे त्यांची जागा घेतात ग्रामीण भागातील "हिट" वाहनं. फाईव्ह-स्टार हॉटेलमधलं जेवण आणि धाब्यावरचं जेवण यांच्यात जो फरक आहे, तोच या दोन्ही प्रकारच्या प्रवासांमध्ये आहे. शहरी थाटमाट आणि ऐषोआरामापासुन कोसो दूर असलेल्या या ग्रामीण वाहनांमधून केलेले प्रवास भटक्यांच्या कायम स्मरणात राहतील असेच असतात.

सुट्टीत कोकणातल्या गावी जायचे बेत आखले जातात आणि मग आठवते ती एस.टी! एस.टी.वरचा कोकणप्रवासाचा भार कोकण रेल्वेने हलका केलेला असला, तरी आजही कोकणातल्या अंतर्भागातली गावं गाठायची तर एस.टी.ला पर्याय नाही.
एस.टी.चा हा सुपरिचित लाल डब्बा म्हणजे आजही "गाववाल्या पावन्यां"साठीची जीवनवाहिनीच. या प्रवासात "झुकझुकु आगीनगाडी"ची मजा नसेल, पण पळती झाडही दाखवते आणि मामाच्या गावालाही नेऊन पोहोचवते.
जलदुर्ग पर्यटनला जाताय? मग शक्य तेव्हढं अंतर एस.टी. ने काटुन पुढे एखाद्या बैलगाडीतुन समुद्रकिनारा गाठण्याची आणि तिथुन पुढचा प्रवास मासेमारीच्या बोटीतुन किंवा शिडाच्या होडीतुन करण्याची कल्पना कशी वाटाते? अशी मजल-दरमजल करत इप्सित ठिकाण गाठण हि तर सह्याद्रीतल्या भटकंतीची खासियत.
"केवल मनुष्यप्राणियों के लिए" असं काही या ट्रकवर लिहिलेलं नाही. मग बैलाने हि संधी का सोडावी? त्या निमित्ताने टपावर बसलेल्या प्रवाशांसाठीही जरा वेगळा अनुभव....!
"पिटातले" प्रवासी भवतालचा निसर्ग मनमुरादपणे निरखत निघाले आहेत! मागे बसलेल्या (कि उभ्या?) मंडळींना हि लक्झरी नाही!
तालुक्याच्या गावास्न आपली वाडी आट-धा किलोमीट्रावर तर हाये! मंग कशाला पायचे बसायला जागान् बिगा?
या "प्रवरा-एक्सप्रेसची" सर राजधानी एक्सप्रेसलाही नाही!
जलवाहतुक आणि रस्तेवाहतुक यांच अस्सल "कंट्री-स्पेशल फ्युजन"! फ्युजन केवळ संगीतातच असतं म्हणुन कुणी सांगितलं?
खेडोपाड्यातील या वाहनांची सफर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मग लागा तयारीला आणि निघा प्रवासाला.......

पूर्वप्रसिद्धी - 'मुशाफिरी' (दिवाळी अंक, नोव्हेंबर २०१५)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! क्लास! अल्टिमेतली अमेझिंग! ललिताप्रितीचं डिस्क्रिपशन अगदीच चपलख!
पण जिप्या हे सगळे फोटो एक ना एक दिवस चोरीला जाणार आहेत. तयार रहा. एकाही फोटोवरचा तुझा वॉमा स्पष्ट दिसत नाहीये. अक्षरशः शोधावा लागतोय कुठे आहे ते. आणि काही काही फोटोज वर वॉमा इतक्या चुकीच्या जागी आहे की कोणीही क्रॉप करून तो काढून टाकू शकेल.
अर्थात तुला नावासाठी फोटोतलं सौंदर्य खराब करणं पटणार नाही हे माहीत आहे पण एक मैत्रिण म्हणून त्याबद्दल वाईट वाटलं म्हणुन बोलून दाखवलं गेलं इतकंच Happy

छान फोटो आणि ललिता-प्रीतींनी लिहलेलं ही छानच आहे!
शिडाची होडी आणि जेटी सोडली तर बाकी सगळ्यातून प्रवास झालाय ते सगळं आठवलं!

जिप्सी एकच शब्द.. अती देखणे फोटोज.. आणी लली चे शब्दांकन नेहमीप्रमाणेच अ‍ॅप्ट एक्दम!!! स्मित>>>>+११११

जिप्सी - अप्रतिम रे ..... लगे रहो .... Happy

मस्त फोटो, योगेश. कालच, खूप दिवसांत तुझे नवे फोटो पाहण्यात आले नाहीत, असे मनात आले होते.

लाल डबा कितीही जुना झालेला दिसला किंवा आधुनिक चकाचक साधनांपुढे त्याला उघड उघड तु.क. मिळत असले तरीही त्याच्याविषयी 'कसलाही बोभाटा न करता जनसेवेला वाहून घेतलेला एक प्रामाणिक कर्मयोगी.' अशाच भावना मनात येतात. नाजूकपणाचे चोचले नाहीत की उन्हा-पावसाची तमा नाही . Happy

मस्त टिपली आहेत सगळी साधनं. प्रवरा-एक्सप्रेससारखा प्रवास ढगाळ वातावरणात करायला खूप मजा येते.

मस्त!!!

पहिला फोटो एकदम स्वप्नातला किंवा चित्रातला भासला! एकदम फिदा!!

दुसरा भॉ फोटोपण छान आहे! बहुतेक त्या एसटीने खरोखरच तुला भॉ केलेले ना??
फोटो आणि बरोबरीची टिप्पणी दोन्ही मस्त!

लाल डबा कितीही जुना झालेला दिसला किंवा आधुनिक चकाचक साधनांपुढे त्याला उघड उघड तु.क. मिळत असले तरीही त्याच्याविषयी 'कसलाही बोभाटा न करता जनसेवेला वाहून घेतलेला एक प्रामाणिक कर्मयोगी.' अशाच भावना मनात येतात. नाजूकपणाचे चोचले नाहीत की उन्हा-पावसाची तमा नाही . स्मित >>>

म्हणुनच जेव्हा एसटी तोट्यात चाललीय आणि असेच चालू राहाणे शक्य नाही असे म्हटले की फार दु:ख होते... Sad

Agree to Riya. Please watermark the photos appropriately. In first photo you can put water mark on the horizontal wood of the cart.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासुन आभार आणि ललिता प्रितीला खास धन्यवाद!!! Happy

एकाही फोटोवरचा तुझा वॉमा स्पष्ट दिसत नाहीये. अक्षरशः शोधावा लागतोय कुठे आहे ते.
अर्थात तुला नावासाठी फोटोतलं सौंदर्य खराब करणं पटणार नाही हे माहीत आहे >>>>>रिया, अगदी हेच कारण आहे. पण काळजीबद्दल धन्यवाद. Happy

तो लालडबा भॉ करुन राह्लाय जनू >>>>>हे सह्हीए, माधव Happy

लाल डबा कितीही जुना झालेला दिसला किंवा आधुनिक चकाचक साधनांपुढे त्याला उघड उघड तु.क. मिळत असले तरीही त्याच्याविषयी 'कसलाही बोभाटा न करता जनसेवेला वाहून घेतलेला एक प्रामाणिक कर्मयोगी.' अशाच भावना मनात येतात.>>>>>>गजा, +१००० Happy

पहिला फोटो एकदम स्वप्नातला किंवा चित्रातला भासला! एकदम फिदा!! >>>>>>माझ्याही आवडत्या फोटोंपैकी एक. Happy

बहुतेक त्या एसटीने खरोखरच तुला भॉ केलेले ना?? >>>>>:फिदी:

Pages