Submitted by जयदीप. on 22 May, 2016 - 08:14
बसून सावलीत एक डोह वाचला
उन्हात राहिल्यामुळे समुद्र आटला
थवा अजून वर्तुळेच गिरवतो किती
कुठे असेल नेमका उडून चालला
कशी मिळायची मुभा स्वतंत्र व्हायची
सजा स्वतःस आपली, तुरूंग आपला
जुनाट शिल्प, आजही सजीव केवढे
कुणी बरेे असेल त्यात जीव ओतला
किती सुरेख काढलीस रेष रेष तू
तुझा नसेल का कधीच हात कापला
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कशी मिळायची मुभा स्वतंत्र
कशी मिळायची मुभा स्वतंत्र व्हायची
सजा स्वतःस आपली, तुरूंग आपला
जुनाट शिल्प, आजही सजीव केवढे
कुणी बरेे असेल त्यात जीव ओतला
किती सुरेख काढलीस रेष रेष तू
तुझा नसेल का कधीच हात कापला
चढत्या भाजणीचे शेर !
अप्रतिम गझल
कशी मिळायची मुभा स्वतंत्र
कशी मिळायची मुभा स्वतंत्र व्हायची
सजा स्वतःस आपली, तुरूंग आपला
जुनाट शिल्प, आजही सजीव केवढे
कुणी बरेे असेल त्यात जीव ओतला
व्वा….
अतिशय सुरेख
अतिशय सुरेख
सुरेखच
सुरेखच
थवा अजून वर्तुळेच गिरवतो
थवा अजून वर्तुळेच गिरवतो किती
कुठे असेल नेमका उडून चालला
कशी मिळायची मुभा स्वतंत्र व्हायची
सजा स्वतःस आपली, तुरूंग आपला
जुनाट शिल्प, आजही सजीव केवढे
कुणी बरेे असेल त्यात जीव ओतला<<< उत्तम शेर! वा वा!
क्या बात है ...
क्या बात है ...
व्वा
व्वा
सगळ्यांचे मनपासून आभार
सगळ्यांचे मनपासून आभार