येथेच कैकवेळा जन्मून वारलो मी ...

Submitted by बाळ पाटील on 20 May, 2016 - 10:23

चिरकाल वेदनेच्या चिखलात आरलो मी
या वेदनेमुळे तर येथे फुलारलो मी

भवताल माणसांचा लावून वेड गेला
अन पाखरात आलो तेव्हा सुधारलो मी

नाविण्य आज नाही आता इथे कशाचे
येथेच कैकवेळा जन्मून वारलो मी

सांगू नकोस वेडे पुढची तुझी कहाणी
पाहिल्याच पावसाने पुरता थरारलो मी

रडणार ना कधी मी निर्धार ठाम होता
आई तुझ्यापुढे बघ सपशेल हारलो मी
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव. खूप सुन्दर.
आवडली.

विद्या.

भवताल माणसांचा लावून वेड गेला
अन पाखरात आलो तेव्हा सुधारलो मी

रडणार ना कधी मी निर्धार ठाम होता
आई तुझ्यापुढे बघ सपशेल हारलो मी<<<

मस्त शेर

भवताल माणसांचा लावून वेड गेला
अन पाखरात आलो तेव्हा सुधारलो मी

सांगू नकोस वेडे पुढची तुझी कहाणी
पाहिल्याच पावसाने पुरता थरारलो मी

रडणार ना कधी मी निर्धार ठाम होता
आई तुझ्यापुढे बघ सपशेल हारलो मी

वरील शेर आवडले.

आरलो म्हणजे काय ते कळाले नाही. ......... >>..>
..... kapoche | जी धन्यवाद ! आरणे म्हणजे चिखल वाळल्यावर घट्ट होणे. बोली भाषेत तो श्ब्द रुतून बसणे या अर्थाने वापरला जातो, लहाण्पणी जेव्हा आम्ही बैलगाडीने शेतात जायचो तेव्हा चिखलात गाडी फसली की गडी म्हणायचा .... गाडीचे चाक आरले. अगदि अजुनही स्पष्ट आठवते . म्हणूनच बिनदिक्कत्पणे तो शब्द वापरला.

उत्तम