हे गाणे कुठल्या रागातील आहे?

Submitted by हर्ट on 18 May, 2016 - 02:54

आज राणी पुर्वीची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको

हे गाणे राजकवी वा. रा. कांत ह्यांनी लिहिले आहे. संगीत दिले आहे यशवंत देव ह्यांनी आणि गायिले आहे सुधिर फडके ह्यांची. मला हे गाणे नक्की कुठल्या रागात आहे हे कळत नाही. जर कुणाला ह्या गीताच्या रागाबद्दल माहिती असेल तर माहिती द्या. धन्यवाद.

गीत इथे ऐकता येईलः https://www.youtube.com/watch?v=HtH_9btLjgI

शब्द इथे आहेतः http://geetmanjusha.com/lyrics/2182-aaj-rani-purvichi-ti-preet-%E0%A4%86...

हे गाणे इथेही आहे. हा आवाज कुणाचा आहे कळेल का? https://www.youtube.com/watch?v=gz2KKhKNuCc&feature=youtu.be

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज राणी पुर्वीची ...

ऐकले.

चांदणे शिंपीत जाशी .... याच्यासारखे आहे.

बहुतेक शंकरा राग आहे असे वाटते

मुग्धा, 'चांदणे शिंपित जाशी' हे शंकरा रागातील गाणे आहे का? मलाही हे गाणे वारंवार गाताना मधेच आपण चांदणे शिंपित गाणे ऐकत आहोत/ गात आहोत असाच भास झाला आहे.

वरचा अपरिचित आवाज बरासचा सुधिर फडकेंसारखा वाटतो पण गाणे कुठेकुठे सुरातालात कमी पडते. पण ही कमेन्ट देणारा मी तरी कोण!! मला ह्याच्या १/१० ही येत नाही Happy

मुग्धा, आज सकाळी थोडे गुगल केले तर कळले 'चांदणे शिंपित जाशी' हे गाणे हंसध्वनी ह्या रागातील आहे. तर, 'मै तो दिवानी हुयी' ये गाणे मालाश्री ह्या रागातील आहे. मालाश्री राग कर्नाटकी संगीतातील अमृतवर्षिनी असा आहे.

हिम्सकुल, धन्यवाद. छानच माहिती दिलीस. अजून येऊ दे.

अजून एक प्रश्न : पट्टी ही कायम सारखीच राहते का गायकाची? ती बदलत नसते का गाण्यानुसार?

>>मुग्धा, आज सकाळी थोडे गुगल केले तर कळले 'चांदणे शिंपित जाशी' हे गाणे हंसध्वनी ह्या रागातील आहे<< मी तेच लिहायला आलो होतो...One of my favrts...गाणे ही आणि राग ही

हर्ट,

आज राणी हे हंसध्वनी मधील नाही वाटत्...जरी त्याचा आभास होत असला तरी ही.
मला तर हे कलावती रागातले वाटते आहे. मी तज्ञ नाही पण कलावती आणि हंसध्वनी बर्या पैकी जवळचे असल्याने साधर्म्य वाटत असेल.

प्रसन्न, आत्ताच कलावती ऐकला सितारवर पण तोही वेगळा वाटत आहे. सही राग आहे कलावती. एकदम गार गार वाटत ऐकल्यानंतर..

पट्टी ही कायम सारखीच राहते का गायकाची? ती बदलत नसते का गाण्यानुसार? >>>> साधारणतः नाही बदलत, पण जिथे गायकाच्या मूळ पट्टीत गायल्याने एखाद्या गाण्याचा रसभंग होतोय अस वाटत असेल तर तिथे पट्टी बदलून गायल जात.