दारु
मे महिन्याची तापलेली रणरणती दुपार, उकाड्यामुळे हैराण होऊन लोक घराबाहेर पडायला टाळतायत रस्त्यावरुन झळा ऊठत होत्या. गरम वार्याचे झोत जीव नकोसा करत होते. अश्या या ऊन्हात भर दुपारी श्रेया बिअर बार च्या बाहेर तापलेल्या डांबरी रस्त्यावर मी नशेत दुंध होऊन पडलो होतो, बारच्या बाजुनेच एक मोठा सांडपाण्याचा मोठा ओढा त्याच्या पूर्ण क्षमतेने सार्या गावाची घाण आणि दुर्गंध घेऊन वाहत होता. बाजुलाच एक नगरपालिकेने ठेवलेली कचराकुंडी होती, ती भरुन बाहेर कचर्याचा डोंगर वाढत चालला होता, त्यातच डुकरांचा एक परिवार किंवा टोळी असावी बहुतेक आनंदाने बागडत आपले पोट भरत होती.
अश्या या घाणीत पूर्वाश्रमीचा नामंकित प्रसिद्ध डॉक्टर अर्जुन पाटिल म्हणजे खुद्द मीच लोळत पड्लो होतो, नाका तोंडाभोवती घोंघावणार्या माश्यांचे मला काहीच वाटत नव्हते, मळकटलेल्या आणि जागोजागी फाटलेल्या कपड्यांचे मला काहिच वाटत नव्हते, वयाची चाळिसी गाठलेला मी उन्हाच्या तडाक्यात, अश्या गलीच्छ घाणीत खितपत पडलो होतो. खरच दारू ईतक सगळ सहन करण्याची शक्ती देते का? एका साध्या कार्बन आणि हायड्रोजन च्या मिश्रणामध्ये एवढी ताकद असते एव्हढे सगळ पचवण्याची, सहन करण्याची ?
डॉक्टर अर्जुन पाटिल अत्यंत कष्टातून वैद्यकिय शास्त्रातील पदवी मिळवली आणि शहरातल्या एका मोठया हॉस्पीटल मध्ये नोकरी लागली, दहा- पंधरा वर्ष नोकरी केली. नोकरी करताना मित्रांच्या संगतीत राहून दारु प्यायची सवय लागली. हळूहळू कधीतरी होणारी पार्टी दिवसेंदिवस वाढत चालली, रात्री झोपताना थोडीशी घेतो असे ठरवून ठेवलेले मनाशी, पण सकाळ संध्याकाळ रतीप चालू झाला, व्यसनाधीनते मुळे नोकरी वरूनही काढुन टाकण्यात आले. तसा मी दारुच्या पुर्ण आहारि गेलो आणि आता माझी ही अवस्था आहे.
खरच दारुमध्ये इतकी शक्ती आहे की अश्याही परिस्थीत मला स्वर्गात असल्यासारखे वाटते आहे. खरच पण ही नशा ऊतरल्यावर मात्र अतीव यातना देऊन जाते. मी प्यायच म्हणून पीत नाही ओ पण या पैशांच्या दुनीयेला आणि सततचे टोमण्यांना सहन करण्याची शक्ति फक्त आणि फक्त दारूच मला देऊ शकते. खरतर मला लेखक व्हायचे होते पण या घरातल्या हालाखीच्या अत्यंत गरीब परिस्थीला, पैशाने श्रीमंत आणि मनाने व माणुसकीने भिकारी असलेल्या समाज्याच्या कानाखाली एक सणसणीत थोबाडीत मारता यावी म्हणून मी डॉक्टर झालो, तेव्हा असे वाटायचे की पैशानेच सर्व काही विकत घेता येऊ शकते का? यशाचे एक प्रमाण म्हणून आपला समाज पैशांकडेच का बघतो पण आता ऊत्तर मिळाले पैशाने दारू विकत घेता येऊ शकते पैशाने स्वर्ग विकत घेता येऊ शकतो. किती वेळ मी ईथे पडून आहे काय माहिती, पण मला आता कशाचेच वाईट वाटत नाही, लहान पोरं, बायका, माणसं माझ्याकडे बघत चालले आहेत, माझ्यावर हसतायत याच मला काहिच वाटत नाही. कारण हा समाज माझ्या लायकीचाच नाही.
वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे दारुचे मेकॅनीझम ऑफ अॅक्शन मला माहिती आहे पण हे अमृत मनाच्या असह्य वेदनांना कसे काय शमवत असावे अजुन मला आश्चर्य वाटते. आता जशी नशा ऊतरेल तसे मला या माणसांच्या वेष घेतलेल्या श्वापदांच्या दुनियेत परताव लागेल याचीच खंत आहे. मलापण वाटते शुद्धीत रहावे, निटनेटके रहावे, प्रतीष्टेचे आयुष्य जगावे पण माझ्या दुनियेत आणि या दुनियेत खूप फरक आहे. माझ्या नशेच्या दुनियेत कोणी मला जज करु शकत नाही, माझ्या कपड्या वरून, माझ्या शिक्षणावरुन, माझ्या स्वभावावरून कोणी माझी किमत ठरवू शकत नाही आणि ठरवली तरिही मला फरक पडत नाही.
मी माझ्या बेधुंद आयुष्यात खूप खूप सुखी आहे.
दारू
Submitted by Abhishek Sawant on 16 May, 2016 - 02:36
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हेवा वाटेल असं आयुष्य आहे
हेवा वाटेल असं आयुष्य आहे तुमचं!
कच्चकून शुभेच्छा!!
हममम, चांगला प्रयत्न आहे पण
हममम, चांगला प्रयत्न आहे पण शुद्धलेखन थोडे तपासणार का
मद्यम कुलविनाशकम.
मद्यम कुलविनाशकम.
सावतानु, पयल्याच लेखात स्वर्ग
सावतानु, पयल्याच लेखात स्वर्ग फिरवलास.
चांगला प्रयत्न आहे पण शुद्धलेखन थोडे तपासणार का>>> +१
चांगला प्रयत्न आहे पण
चांगला प्रयत्न आहे पण शुद्धलेखन थोडे तपासणार का
>> काय गरज आहे
लेखन फुल्ल टाईट असतांनाच केले आहे ना 
चांगला प्रयत्न आहे पण
चांगला प्रयत्न आहे पण शुद्धलेखन थोडे तपासणार का
>> काय गरज आहे
लेखन फुल्ल टाईट असतांनाच केले आहे ना :)>>>>>>>

धन्यवादस्.....शुध्दलेखनाकडे
धन्यवादस्.....शुध्दलेखनाकडे नक्कीच लक्ष देईन
प्रफुल्ल मी घेत नाही
प्रफुल्ल मी घेत नाही ओ...जेवायला हॉटेलात गेलो होतो...तेव्हा एक इसम असाच पिऊन पडला होता...ऑर्डर येईपर्यंत विचार केला आणि नंतर मग लिहिला
सावतानु ताकाला जाऊन भांडे
सावतानु ताकाला जाऊन भांडे लपवू नये आणि बारमध्ये जाऊन जेवण मागवू नये
फुलवलंय छान पण पीत नसल्याने नक्की कल्पना नाही काय होते ते.. बाकी पिऊन ईतरांना त्रास न देता गपगुमान पडून राहणार्या जमातीबद्दल आदर आहे.
प्रफुल्ल मी घेत नाही ओ. हाय
प्रफुल्ल मी घेत नाही ओ.
हाय कम्बख्त!
लेख फक्कड़ लिहिलाय पण लोळणारे बेवड़े खरेच इतका विचार करत असतील का ही शंका आली , ते हलके होणे मूड फ्रेश करणे वगैरे आपल्या सारखे महिन्यात ५ बियर किंवा एखाद हाफसाइज़ वाले करतात. पट्टीचे बेवड़े फ़क्त प्यायची म्हणूनच पितात ! लिवर टॅप करायला अंदाजे पंधरा सेंटीमीटरची सुई पोटात खुपसलेली असताना सुद्धा सायकोटिक ब्रेकडाउन होऊ घातलेल्या पेशेंट न दारू साठी दंगा केलेला पाहिला आहे स्वतः एक डॉक्टर मित्रासोबत त्याच्या वॉर्ड राउंड च्या वेळी
प्रफुल्ल मी घेत नाही
प्रफुल्ल मी घेत नाही ओ...जेवायला हॉटेलात गेलो होतो...तेव्हा एक इसम असाच पिऊन पडला होता...
>>
बारमध्ये जेवण मिळत नाही का? की तो इसम फक्त प्यायला बारमध्ये गेला आणि जेवायला हॉटेलात आला होता? अवघडच आहे ब्वा
माझ्या प्रोफाईल वर जावा आणि
माझ्या प्रोफाईल वर जावा आणि प्रतिमा पहा ..आणि सांगा कोणाला वाटेल का मी दूध सोडून काही पीत असेन म्हणून..सुपारीच्या खांडेच व्यसन नाही राव
राहुल त्या माणसाचा प्लॅन काय
राहुल त्या माणसाचा प्लॅन काय होता माहिती नाही...मी हॉटेल मध्ये एंटर करताना तो कडेला उन्हात पडला होता...तेव्हडे मी पाहिले...तो जेऊन पिला का पिऊन जेवला याची माहिती त्यालाच विचारायला पाहीजे
सोन्याबापू खर आहे तुमचे...पण
सोन्याबापू खर आहे तुमचे...पण शुद्धीवर आल्यावर अश्या लोकांकडून असले खूप ऐकलं आहे..आता ती पण आपल्यासारखी माणसच आहेत...त्यांनाही काहीतरी भावना असतीलच की
अरे इतके खोल डिटेल्स कशाला
अरे इतके खोल डिटेल्स कशाला हवेत तुम्हाला? लेखकाने प्यायची की नाही हा त्याचा स्वतःचा प्राय्व्हेट पर्सनल प्रश्न नाही का? लेख वाचा की राव फक्त
...धन्यवाद रीया
...धन्यवाद रीया
माबोवर पहिल्यांदाच कोणीतरी
माबोवर पहिल्यांदाच कोणीतरी बाजू घेतली बरं वाटलं जीवाला
धन्यवाद ..ऋन्मेऽऽष..ताक पण
धन्यवाद ..ऋन्मेऽऽष..ताक पण नाही आणि भांड पण नाही काय लपवू ?
धन्यवाद ..ऋन्मेऽऽष..ताक पण
धन्यवाद ..ऋन्मेऽऽष..ताक पण नाही आणि भांड पण नाही काय लपवू ?
बाकी पिऊन ईतरांना त्रास न
बाकी पिऊन ईतरांना त्रास न देता गपगुमान पडून राहणार्या जमातीबद्दल आदर आहे.>>>+१
एका प्रतिसादात सगळ्यांना
एका प्रतिसादात सगळ्यांना उत्तर देता येतं
कोई बुरा नही मानेगा
अहो सावंत लोड घेऊ नका.
अहो सावंत लोड घेऊ नका. दारूबाबत फार दुटप्पी समाज आहे आपला. मी प्यालो तरी मला काही चढत नाही. चढली तरी मी काही पडत नाही. पडलो तरी माझ्याच घरात. शेजारच्याच्या अंगावर माझ्या ओकारीचे शिंतोडे उडत नाहीत. उडले तरी पुसून देतो. गाडीखाली कोणाला चिरडला तरी भरून देतो.... असे टप्प्याटप्प्याने समर्थन होते आपल्या पिण्याचे..
तुम्हाला कसलेच व्यसन नाही तर गर्व बाळगा
रीया मोबाईल वरून type करत आहे
रीया मोबाईल वरून type करत आहे त्यामुळे झाले....ऋण्मेश दारू आणि तळीराम यांच्या बद्दल तुमचा पण सखोल अभ्यास आहे की...