Submitted by अनघड on 15 May, 2016 - 23:42
आकाश,चंद्र,तारे रडताना पाहिले मी
गझलेस काल रात्री रडताना पाहिले मी
पाहून आटलेल्या सार्या नाले,नद्यांना
सूर्यास भर दुपारी रडताना पाहिले मी
चिंधी,गवत मिळेना प्लास्टिकचे हे ढिगारे!
चिंतेत पाखरांना रडताना पाहिले मी
ते ठोकती खिळ्यांनी खोडावर जाहिराती
विवळून त्या वृक्षाना रडताना पाहिले मी
क्रौर्यास माणसाच्या देवाने पाहिले अन
गहिवरुन त्यास स्वप्नी रडताना पाहिले मी
-नाहिद नालबंद 'इस्रो'
[९९२१ १०४ ६३०]
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा