महानगरी जागतिकीकरण आणि गावगाडा कुस्ती अर्थात देशीवादाच्या बाप्पाची जय !
(१)
जाडजुड काचेरी मग्ग्यातून सोनेरी बीअर कधी पाहून पित कधी पिऊन पाहत जानव्ही मावळणारा सूर्य पाहत होती . भल्या थोरल्या भिंतीवर , भिंतभरून असलेला चित्रातला मावळता सूर्य मावळता मावळत न्हवता .अगदी तशीच तिच्या मनातली वेडी आशा देखील ! (कार्तिकेय मात्र तिच्या आशेला खाज म्हणतो.)..कार्तिकेयच्या आठवणीने तिने उघड पुटपटते सन ऑफ द बिच हे बोल बोलत बीअरचा मोठ्ठा घोट घेतला . आणि रेशमी कबाबचा तुकडा अलगद तोंडात सारला . घास चावण्याच्या बत्तीसपैकी विसाव्या वेळेस कबाब तोंडात घुमत असताना , मागून येऊन अथर्वने तिचे दोन्ही खांदे दाबत , कानाशी ओठ न्हेत , हाय जानव्ही ..असे कानात म्हटले . तिने विसाव्या वळणावरच कबाबी घास गिळला. आणि ओsss हाय अथर्व ! कसा आहेस ? म्हणाली . तो म्हटला , एम फाईन . आप बोलो यार . व्हाटस गोइंग ऑन ? काय म्हणतोय मल्हार ? फक द्याट बास्टर्ड..नाव काढू नकोस त्याचे . हेय जानव्ही चिल्ल मार यार..नाव व्हाट ? नथिंगरे ही जस्ट चेक माय सेल एंड फाउंड सम मेसेजेस . अफकोर्स कार्तिकेयचे . झोपलीयेस का त्याच्याबरोबर विचारत होता . देन ?
दुमडून पुन्हा लिपस्टिक जशीच्या तशी नीट बसेल ही काळजी घेत ओठांचा माफक चंबू करत जान्हवीने विचारले, देन व्हाट ? म्हणजे ? यु नो तुला सांगते परवा एम सो टायर्ड..ऑल विक फुल्ली हेक्टिक रे ..एंड जस्ट रिल्याक्सेशन आयल आस्क हिम फर सेक्स ..यु नो व्हाट ही से.? वाशट डोळे आणि लघळ स्वर या संयोगात अथर्व म्हटला , रियली नॉट जानु हाव क्यान आय ? टेल मी टेल मी कमोन... अरे अथर्व उसने कहा ..जिंदगीमे और भी सुख है सेक्स के सिवा . आणि तो गाणे म्हणू लागला . मेरे मेहबूब तुझे मेरे डिक की कसम..मेरे मेहबूब ..फक ..हु इज बास्टर्ड.. (ड सोफ्ट) राजेंद्रकुमार..? चुतीया साला . ओ यार जानव्ही तुला खरेच त्याच्याकडून काही हवेय ? नो नॉट रियली अथर्व आय नो डीपली , नाव डेस ही युज्ड हिज डिक जस्ट फर लु... हा हा हा ..यु आर सच अ क्लेवर..नंतर बराच वेळ न मावळत्या सूर्याच्या साक्षीने क्यांडल लायटीत अथर्व आणि जानव्ही एकमेकांना चावत चाटत राहिली ..
अठरा वर्षाचा कोवळा रामाधीर वेटर न राहवून संडासात पळाला..
गाडीमध्ये गोंधळ घालून अथर्वने जानव्हीला जानव्हीच्या घरी सोडले . तेंव्हा मध्यरात्र चालू झाली होती . हेय टेक केअर ब बाय म्हणून शेवटचे गालाला गाल घासून मिठी मारून , माफक आवळा आवळ करून , अथर्व तिथून निघता झाला . फक यु बास्टर्ड या शिव्या खात मल्हारने दरवाजा उघडला . तुझ्याकडे ल्याच कि नाहीये का ? असे त्याने विचारले . आणि महानगरीय आधुनिक असली तरी ती स्त्री असल्याने स्त्री सुलभ गिल्ट दाखवत ओ डिअर रियली एम सॉरी म्हणत मल्हारला मिठी मारून ती चावू चाटू लागली . ती पुन्हा रोजच्यासारखे आय ह्याव सेक्स म्हणते की काय या भीतीने मल्हार गर्भगळीत झाला . पण तिच्यावरचा झोपेचा अंमल पाहून खुश होत्साता त्याने तिला आधार देत बेडवर निजवून टाकली . ग्यालरीत येऊन दोन सिगारेट भकभक ओढत मल्हार देखील मनातल्या मनात फकफक म्हणत राहिला . वाट् अ लाईफ , वाट् अ लाईफ असे मनाशी खंतून झाल्यावर तिच्या बाजूला येऊन , तिच्या बाजूला ढुंगण करून गडप झोपी गेला .
जान्हवी आणि मल्हार वयोगट अनुक्रमे चौतीस तीस . होय मल्हार तिच्यापेक्षा चार वर्षांनी नेणता ! अफकोर्स लवम्यारेज . ती जाहिरात क्षेत्रात काम करतेय आणि तो आयटी पंटर ..शहरातल्या पॉश भागात पॉश फ्ल्याट घेऊन पॉश लाईफ जगतात . अधेमध्ये चारचौघांत एकमेकांना मिठ्या मारत एकमेकांवर एकमेकांचे खूप प्रेम असल्याचे जाहीर करत असतात . आणि आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच , द्याटस व्हाय वुई डोंट वांट थर्ड पर्सन इन अवर लाईफ म्हणतात . म्हणजे प्रेमात वाटेकरी हिस्सेदार वगैरे म्हणून मुल होऊ देणे टाळतात . प्रचंड महानगरी तणावाने यांच्या बेडरूम हॉल आणि किचनमधल्या लाईफवर विपरीत परिणाम होत आहेत . खूप संवेदनशील असलेल्या जान्व्हीला ते अधिक जाणवत आहेत . आणि तिला यापासून मल्हारला घेऊन दूर कुठे तरी निघून जावेसे वाटत आहे . आणि तो एक दिवस नक्की तयार होईल ही वेडी आशा ती बाळगून आहे . कार्तिकेय जानव्हीचा वी आर जस्ट गुडफ्रेंड क्याट्यागरीतला अप्रत्यक्ष जगमान्य ठोक्या आहे .
तर उद्या शूट साठी जानव्ही आणि टीम विथ कार्तिकेय शहरालगतच्या दोनशे किमी वरील केळेवाडी गावात जाणार आहेत . तयारी करिता आदल्या दिवसाची सुट्टी आहे . आणि जानव्ही मल्हारला बरोबर चल म्हणून विनवते आहे . फर चेंज सोनू बबू पिलू वगैरे म्हणून..आणि मल्हार सेक्स मागणार नसशील तर येतो असे सांगून टाकायच्या बेतात यायला वा जायला तयार होतो आहे . नाही हो नाही हो करता तो तयार होतो . दुसऱ्या दिवशी हजार उंबरा गाव असलेल्या केळेवाडीत, संध्याकाळच्या सोनेरी उन्हाच्या तिरिपा झेलीत भली थोरली टीम गावात पोचते . गावाला खेटून असणारी नदी ओलांडून गाडीने दहाव्या मिनिटातच गाव सुरु होते . सोनेरी उन्हात नदीजवळ थांबण्याचा रुपेरी आग्रह करून , गाडी थांबवून जानव्ही , मैथिली , शलाका आणि स्यांडी , अथर्व , द्रोण , कौंतेय. मल्हार ही मंडळी उतरतात . आणि नदीकाठाने थोडेसे चालू या का म्हणत चालू लागतात . नदीतले मासे , खेकडे , गरवार धामण आणि चहाटळ इरुळे हे कोण नवे पाहुणे आलेत म्हणून एकमेकांना विचारत , बिचकत यांना पाहून पुन्हा तळाशी बुडी मारून सुखेनैव विहार करू लागतात . नदीकाठाचे उंच चिंचेचे झाड छोट्या लिंबाला , आजारी बाभळीला जि.के पुरविते . या भागात शूट आहे त्यासाठी शहराचे लोक येणार होते ते आलेत बहुतेक . थोडेसे लाडावलेले सीताफळीचे खुरटे झाड . तुला कसे माहित म्हणून चिंचेला विचारते . चिंच पोक्त हसू हसत सांगते , गणा मास्तर आणि साबू पैलवानची बायको माझ्या खोडाजवळच तर हगायला बसतात त्यावेळी त्यांच्यात झालेल्या गप्पा मी ऐकल्या . अजूनही बरेच काही त्या बोलत असतात . पण त्या गप्पा तुम्हा पोरा सोरांना सांगणे बरे नाही असे म्हणून सळसळून हसत चिंच गप्प राहते .
पाय मोकळे करून सिगारेटचे झुरके मारून टीम गाडीत बसते . आणि थेट पारावर बसलेल्या गणा मास्तरला , गणामास्तरचा पत्ता विचारते . गणामास्तर लावण्यवती अर्ध उघड्या बायांना पाहून स्वतःला विसरून चावडी खाल्ले आंग का वरले आंग हे बोलू पुसू लागतो . इतक्यात आधी गावाला भेट दिलेला अर्जुन खाली उतरतो आणि म्हणतो अरे काय मास्तर आपण भेटलोय कि , अरे हेच की गणा मास्तर ! मास्तर काय चेष्टा करताय का पाहुण्यांची ? सगळे शहरी हास्य असतात , गणा मास्तर ग्रामीण हास्य हसतो . शाळेत समदी सोय केल्याचे सांगतो . सगळी टीम शाळेत पोचते . शाळेच्या आवारात तात्पुरत्या पण मजबूत अडोशाच्या न्हाणी तयार होत असतात . त्यामुळे संध्याकाळचा वॉश जानव्ही धोंडे पाटलांच्या वाड्यावर घ्यायचे ठरवते . आणि तिच्यासोबत सर्व अर्धउघड्या देखण्या ललना वाड्यावर जातात . वॉश घेतात . पाटलीन बाई आणि त्यांची सुनबाई , सर्व ललनांना जोवर तुम्ही गावात आहात तोवर न लाजता हागायला आणि आंघोळीला इथेच येत जावा हे जिव्हाळ्याचे आवतन देतात . त्या आवतणाने भारावलेल्या , पोट हलके झालेल्या ललना जायला निघताच , धोंडेपाटलांचा कारभारी त्यांना संध्याकाळचे जेवणाचे आमंत्रण देतो . आमच्या बरोबर पुरुष मंडळीही येतील म्हटल्यावर येव द्याकी . लय जेवण हाय हिथ येव द्या , म्हणतो . त्या रात्री वाड्यावर बोकड पडते , शंकर मुलाणी उत्साहात बोकड सोलतो . ढणाढणा जाळाच्या मोठ्या चुलीवर मोठ्या हंड्यात मटन रटरट शिजते . ठेवणीतले इंग्रजी ठरणारे म्यागडोलचे तुंबे बाहेर काढले जातात . शहरी गड्यांनी आणलेली वोडका , व्हिस्की , जीन .ब्लेंडर , त्या रात्री बाजूला पडते . उक्क्डच्या परातीवर पराती फस्त होऊ लागतात . झणझणीत रस्सा , , गुबगुबीत बोट्या , रश्याची हाडे , हाडाचा चोथा , यांचा ढीग बाजूला पडत जातो . सगळे टल्ली होतात आणि खात पीत ओकत ओरपत टप्पोऱ्या चांदण्यात रात्र साजरी होते .
सकाळी अत्यंत गाढ झोपेतून फ्रेश तनामनाने जानव्ही मल्हार उठतात . शाळेला सुट्ट्या असल्याने विद्यार्थी वगैरे काही गडबड नसते . गावात असलेल्या शिन्ग्रोबाच्या देवळात लोक जाऊ लागलेले पाहतात . ब्रश करत जानव्ही आणि मल्हार देवळाजवळ जातात . आत शिरू पाहतात . लक्ष्मण गुरव आत जायला त्यांना अटकाव करतो . हेय व्हाट ह्यापंड ? व्हाटस द प्रोब्लेम ? गुरव म्हणतो , रास्सारी नवऱ्याला खेटून झोपलं अस्चाल . डोक्याऊन आंघुळ करा आणि दर्शन घ्या बाई . असलं येनं देवा शिवाला चालत नाही .इटाळ चंडाळ होतो . ग्रामीण व शहरी चकमक झडते . धिस इज कॉलड (ड सोफ्ट) कल्चर म्हणून आंघोळीचे वचन देऊन जानव्ही मल्हार परत निघतात . प्रत्यक्ष काम अकरा नंतर चालू होत असल्याने सकाळचे गाव न्याहाळावे म्हणून अथर्व , जानव्ही आणि मल्हार गावात फेरफटका मारायला बाहेर पडतात . सुरुवात गावाबाहेर जाऊन आत आत येत गाव पाहू , जाणून घेऊ अशा प्ल्यानने ते सुरुवात करतात . गावाबाहेरून आत येताना गावाबाहेर नदीच्या आणि मसणवाट्याच्या अगदी जवळ महारवाडा असतो . आणि महारवाड्याच्या थोड्या वरल्या बाजूला गाय फाडत काही मंडळी बसलेली असतात . स्तब्ध गायीच्या बॉडीभोवती चाराठ लोक सुऱ्या कोयत्याच्या कारागीरीत रंगून गेलेले असतात . भोवतालच्या कोंडाळ्यात बसलेली पोरे आपल्या हातातल्या मोठमोठाल्या पराती पाट्या कधी वाजवीत कधी फिरवीत आपापल्या बापांचे चिराचिरी फाडाफाडीच्या खेळातले कसबी कौशल्य कौतुकाने न्याहाळत असतात . फाडाफाडी स्पॉटपासून थोड्या आडअंगाला लिंब बाभळीच्या आयचानात काही एकोनोमिकली निर्धन व सामाजिक दर्जात सधन असलेल्या बाया डारडूर करीत हलके होत असतात . व फाडाफाडी करणारी महार मंडळी त्याकडे आपसात किंचित हसून लक्षपूर्वक दुर्लक्ष करीत असतात . मल्हारच्या कानावर हळुवार नमस्ते सदा वत्सले मातृभूमेचा घोगरा आणि विवळनारा सूर येतो आणि तो जानव्हीला म्हणतो , अगं इकडे शाखा भरते वाटतेय . चल जाऊन पाहू या . जानव्ही म्हणते आयच्या गावात...इकडे पण ?
क्रमशः
प्रा. सतीश वाघमारे .
पुढिल भागच्या प्रतिक्षेत.
पुढिल भागच्या प्रतिक्षेत.
पु.भा.प्र..
पु.भा.प्र..
वाघमारे यांच्या कथा नेहमीच
वाघमारे यांच्या कथा नेहमीच वाचतो. पण आजची वेगळीच आहे. नावं वेगळी आहेत.
विबासं आणि सगळाच मसाला दिसला यात.
पुढचे भाग पटापट येऊद्या ..
अफलातून लिहलेय. स्पेशली ते
अफलातून लिहलेय. स्पेशली ते झाडांचे व प्राण्यांचे डिस्कशन.
भयाण खत्राय राव हे!! येऊंदे
भयाण खत्राय राव हे!!
येऊंदे येऊंदे !!!
वाच्तोय !!
धन्यवाद जव्हेरगंज , आणि
धन्यवाद जव्हेरगंज , आणि कापोचे ! या कथेतल्या नावांबद्दलचे निरीक्षण आवडले . विबासं आणि आदर्श भारतीय नारीची प्रातिनिधिक रूपे यातला जांगडगुत्ता लक्षात येतोय म्हटल्यावर मला पुढील भाग टाकायला उत्साह आलेला आहे .
खतरनाक मिश्रण आहे. आवडतेय
खतरनाक मिश्रण आहे. आवडतेय वाचायला.
मला पुढील भाग टाकायला उत्साह
मला पुढील भाग टाकायला उत्साह आलेला आहे .>>>> येउ दे लवकर
म्होरला भाग कधी ? !
म्होरला भाग कधी ?
!
छान
छान
वाघमारे साहेब ,येक लंबर लिवलय
वाघमारे साहेब ,येक लंबर लिवलय .त्या पड्याल ऐसिवर लिहिने बंद केले काय.
म्होरला भाग कधी ?
म्होरला भाग कधी ?