....तसे सांगायचे होते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 14 May, 2016 - 12:08

मधोमध जर तुला थांबायचे होते
लगोलग तू तसे सांगायचे होते !

प्रतिक्षेने निखळला एक बस तारा
किती अन केवढे मागायचे होते !

कशाला एव्हढे जातो पुढे आपण ?
किती अवघड पुन्हा परतायचे होते !

ढगांनो वाजवा तालामधे ताशा
विजांना त्यावरी थिरकायचे होते

किती निर्व्याज्य असतेे प्रेम आईचे
तिच्या जाण्याअधी उमगायचे होते

भरारा वाहतो आहे खुळा वारा
कुठे घाईमधे पोचायचे होते ?

झड़प घालून नेले क्रूर नियतीने
तिचे होते तिला तर दयायचे होते !

त्वरेने सूर्य गेला आज अस्ताला
अश्यासाठीच की उगवायचे होते !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शैलीमध्ये थोडा बदल जाणवला ... निसर्गाचे अनेक शेरात संदर्भ दिसले जे सहसा नसतं तुझ्या गझलांमध्ये तै (विशेषतः संवादात्मक शेर असतात) ह बदलही आवडलाच

अरे वा !

मस्त निरिक्षण जयदीप !

आपण जवळ असतोच निसर्गाच्या....फ़क्त आपल्यातच गुंग असल्याने त्याला वाव देणे राहूनच जाते..
कधी मधी अशी दखल घ्यायला भाग पाडत असावा तो !

थेंक्स रे !

कशाला एव्हढे जातो पुढे आपण ?
किती अवघड पुन्हा परतायचे होते !

झड़प घालून नेले क्रूर नियतीने
तिचे होते तिला तर दयायचे होते !

व्वा…

मतला ही छान…

त्वरेने सूर्य गेला आज अस्ताला
अश्यासाठीच की उगवायचे होते !

हा ही आवडला.

शुभेच्छा.

मतला तारा आणि शेवटचा अधिक आवडले
इतरही छान
काही जागी रदीफ सांभाळली जाते आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झाले

सम्पादित

सुप्रियाताईन्नी वाचावे म्हणून प्रतिसाद दिले होते .हेतू सफल झाला म्हणून डिलीटत आहे

सम्पादित

सुप्रियाताईन्नी वाचावे म्हणून प्रतिसाद दिले होते .हेतू सफल झाला म्हणून डिलीटत आहे

सम्पादित

सुप्रियाताईन्नी वाचावे म्हणून प्रतिसाद दिले होते .हेतू सफल झाला म्हणून डिलीटत आहे

परतायचे अवघड होवून बसते... या अर्थी

उला मिसर्यात घडलेला वा घडत असलेला वृत्तांत कथन केलेला आहे आणि सानीत समारोप करताना मत मांडण्यात आलेले आहे .

ओके