चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो - भाग १

Submitted by अस्मि_ता on 14 May, 2016 - 06:18

नमस्कार मंडळी .. हा माझा लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे . कृपया आपल्या प्रतिक्रिया आणि टिपण्णी जरूर द्या ..

"चलो एक बार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो" ... FM वर गाणं चालू होत..

मनु अगं मनु !!! कुठे आहेस ? जरा इकडे ये ना.. मनु.. ए मनु !!! एवढ्या हाक मारून पण मनूचा काही प्रतिसाद आला नाही हे बघून आई तिच्या खोलीत आली ...
मनु तिथेच होती पण विचारात एवढी मग्न होती कि आई जवळ येउन उभी राहिलेली पण तिच्या लक्षात आलं नाही. मनु, बेटा काय झालं? कसला विचार करतीयेस ? आई ने तिच्या पाठीवर हात ठेवून तिला विचारलं तेव्हा दचकुन एकदम भानावर आली ती .. काही नाही ग आपलं ते ... ते .. उद्याच्या interview चा विचार करत होते.. खूप महत्वाचा आहे ना.. तिथे जर माझं selection झालं ना आई, तर खूप मोठी achievement असेल बघ माझी ...
हो गं .. देव करो आणि तुझं selection व्हाव बघ तिथे .. तू काही कमी मेहनत घेतली नाहीस हे मला माहित आहे.. लहान वयात नोकरी करायची वेळ आली तुझ्यावर .. तू हुशार होतीस पण परिस्तिथी मुळे तुला पुढचं शिक्षण नाही देऊ शकलो आम्ही.. तुझ्यामागे एक बहिण आणि भाऊ होता .. त्याचं शिक्षण पण महत्वाचं होत ना.. पण तू अगदी समजुतदारपणे म्हणालीस मी नोकरी करेन आणि job करता करता पुढचं शिक्षण घेईन .. खरच किती समंजस आहे माझी लेक ..
मानसी देशपांडे!!! अर्थात मनु.. वय वर्ष २७. सालस, समंजस, हुशार मुलगी.. दिसायला अगदी छान, गोरीपान, नाकी डोळी नीटस, कुरळे केस, मध्यम बांधा.. सगळ्यांशी गोड बोलायची, मदतीला सदैव तत्पर.. त्यामुळे सगळ्यांची लाडकी होती ..
उद्या तिचा interview होता... खूप मोठी automobile कंपनी.. आणि मनु ला manager च्या post ची ऑफर आली होती.. तिच्या घरचे खूप खूष होते..
पण मनु, मनुच कुठेही लक्ष लागत नव्हत आज.. कारणही तसंच होत म्हणा... अनिकेत प्रधान... मनूचा कॉलेज मधला मित्र?? काल त्याचा फोन आला होता.. सहज चौकशी करायला फोन केला म्हणाला आणि बराच वेळ गप्पा मारल्या.. अगदी कॉलेज च्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत.. मनुलाही खूप आनंद झाला .. शेवटी फोन ठेवताना तो म्हणाला.. मनु, मला माफ कर. मी अस वागायला नको होत तुझ्याशी.. मनु ला काय बोलाव काही सुचतच नव्हत.. तोच म्हणाला, आपण परत friends नाही का होऊ शकत मनु? Please .. मनु थोडा वेळ गप्पच होती.. तिने उत्तर दिले..

मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे अनि..

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users