ह्या रागांवर आधीरित ३ मराठी गाणी सुचवा!!!

Submitted by हर्ट on 10 May, 2016 - 02:05

मला ह्यावेळी आमच्या मंडळाच्या मराठी ऑर्केस्ट्रामधे गायचे आहे. मला खालील दिलेले राग गाता येतात. आणि, म्हणून मला ह्या रागांवर आधीरितच ३ गाणी हवी आहेत. पण मराठी गाण्यांचा माझा अभ्यास फार कमी आहे म्हणून इथल्या संगीतप्रेमी मित्रांची आणि मैत्रीणींची मी इथे मदत मागत आहे.. घेत आहे. धन्यवाद. जर तू नळीवर असलेली लिंक दिली तर अजून उत्तम.

१) यमन
२) दुर्गा
३) वृंदावनी सारंग
४) विभास
५) मालगुंजी
६) भैरवी
७) वसंत/बसंत
८) तिलंग
९) केदार
१०) शंकरा
११) भिमपलाश

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सामी पण गुगल वगैरे करुन खरेच नको आहेत गाणी. आपल्यामधून आलेलीच हवी आहेत. तरीही पुन्हा एकवार धन्यवाद.

४) विभास - बहुतेक नाहीच्चेत मराठी गाणी... एक भजन भीमसेन जोशींनी गायलेले आहे. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा.. पण हे कानडी आहे.. आणि किशोरीताईंचं एक भजन आहे.. "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल." (ह्यावर भरपूर सर्च करुन झालाय मुलाच्या बारश्यात लावायची होती विभास रागातली गाणी.)

धागा धागा अखंड विणूया
विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणूया

राग: विभास (अंतर्‍या मधे भटियार चा वापर पण केला आहे)

नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरा
रागः केदार

अभि, मस्त! पण सत्यम शिवम सुंदरा पुरुष गायकाच्याकडून तुम्ही ऐकले आहे का? कुणी गायले आहे?

केदार.. आळविते केदार असे एक जूने गाणे आहे, मधुबाला चावलांनी. ( पण चाल खुप कठीण आहे. तयारी हवी. पण तू करशीलच )

तिलंग.. गगन सदन तेजोमय.. पण खात्री नाही. गायला छानच आहे.

वसंत - इये मराठीचीये नगरी मधे, आशाचे गायलेले वसंत ऋतू आला असे सुंदर गाणे आहे. समूहाने गायला छानच आहे. सुभद्राहरण चित्रपटातही, आला वसंत ऋतू आला असे गाणे आहे. हे पण समूह गायनासाठी छान आहे.

भीमपलास मधे.. जिवलगा राहिले दूर घर माझे आहे ना ?
सौभद्र मधे पण रमला तरी कुठे ? असे एक पद आहे.

भीमपलास मधे.. जिवलगा राहिले दूर घर माझे आहे ना ?>>

नाही हे गाणे पुरिया धनश्री ह्या रागात बसवलेले आहे.

धन्यवाद दिनेशदा.
अभि धन्यवाद.

दूर्गा मधे केशवा माधवा तूझ्या नामात रे गोडवा हे सदाबहार गीत आहे.

वृंदावनी सारंग मधे, संथ वाहते कृष्णामाई आहे.. सारंगची दुपार, त्यात मस्तच जाणवते. भातुकलीच्या खेळामधली पण आहे.

शंकरा मधे, विश्वनाट्य सूत्रधार हि सुंदर नांदी आहे. दोघे तिघे गायक कलाकार हवेत.

मी जाया धर्ममया.. हा अस्सल शंकरा आहे. धाडीला राम तिने का वनी, मधले कैकयीचे पद आहे. ( रजनी जोशी )
शंकराची तयारी असेल, तर हंसध्वनि पण जमेल. त्यात काही सुंदर गाणी आहेत.

शंकरा मधे लताचे जूने तूजसाठी शंकरा भिल्लीण मी झाले, हे पण असावे. संगीत स्नेहल भाटकरांचे आहे. छान आहे ते गाणे.

जिवलगा बद्दल आठवणीने दगा दिला ( मी स्वरांवरून नाही रे आठवणींवरुनच राग लक्षात ठेवतो. )

भीमपलासी मधे, तुझ्या गळा माझ्या गळा, हे सुंदर गाणे आहे. एक पुरुष आणि एक स्त्री कलाकार हवी.

असे दोन कलाकार मिळाले तर कशी केलीस माझी दैना, हे स्वरसम्राज्ञी नाटकातले पद आहे, यमन रागातले.

( रेकॉर्ड जरी किर्तीच्या एकटीच्या आवाजात असली, तरी नाटकात ती व शरद गोखले मिळून गात असत. )

गगन सदन हे तिलक कामोद मधे आहे ना ?

@हर्ट : ही लिन्क पहा. खुप राग आणि त्यावर आधारित खुप गीते. रागाच्या नावावर क्लीक करा.
http://www.aathavanitli-gani.com/Raag_Sarita2
(उप्स, सामी यांनी आधीच ही लिन्क दिलेली आहे. पुनःप्रक्षेपणाबद्दल दिलगीर आहोत.) Happy

पण गुगल वगैरे करुन खरेच नको आहेत गाणी. आपल्यामधून आलेलीच हवी आहेत.
म्हणजे परीक्षाच म्हणा ना इथल्या लोकांची. किती वेळ आहे १ तास, की ३ तास.
की तुम्ही अश्या देशात रहाता जिथे गूगल ला बंदी आहे? चीनमधे वगैरे बर्‍याचश्या गोष्टींना बंदी आहे म्हणे,
तसे नसेल तर सामी यांनी दिलेली पहिलीच लिंक बघा. बरीच छान छान गाणी आहेत.
भीमपलासः
काटा रुते कुणाला - जितेंद्र अभिषेकी
दशरथा घे हे पायसदान - सुधीर फडके, गीतरामायण
इंद्रायणी काठी, देवाची आळंदी - पं भीमसेन जोशी

केदारः
ही कुणि छेडिली तार - चित्रपट - गुळाचा गणपती
आज मी आळविते केदार - मधुबाला झव्हेरी - चित्रपट - अवघाची संसार.
गा रे कोकीळा गा - आशा भोसले, चित्रपट- बायकोचा भाऊ

पूरियाधनाश्री:
या चिमण्यांनो परत फिरा रे - लता मंगेशकर

इ. इ. सर्व त्यात आहे.

पडछाया चित्रपटातले कृष्णा कल्लेने गायलेले, उठ शंकरा, सोड समाधी पण शंकरा रागावर आधारीत आहे का ?
( आठवणीतील गाणी मधे तसा उल्लेख नाही. ) चित्रपटात वर्षा नाचलीय या गाण्यावर. सुंदर गाणे आहे.

यमन.

पराधीन आहे जगती
कानडा हो विठ्ठलु
जिथे सागरा धरणी.
समाआधेअ‍ॅ साधन

भिमपलास

घे हे पायसदान
इंद्रायणी काठी
तुला पाहते रे

भैरवी

गा बाळानो
कशी गवळण राधा बावरली
आजि सोनियाचा दिनु

महेश,

उठ शंकरा सोड समाधी, वनात आला मदन पारधी.. पडछाया, कृष्णा कल्ले, वर्षा... इथे आहे

http://www.aathavanitli-gani.com/Song/Utha_Shankara_Sod

तूजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले, धुंडीत तूज आले , चिमुकला पाहुणा, लता, शुभा खोटे.. इथे आहे

https://www.youtube.com/watch?v=IXaRUhmgCc8

दोन्ही सुंदर आहेत गाणी.

हर्ट, गाणी निवडताना पुरुष गायकांनीच गायलेली गाणी असा निकष नाही ठेवला तर ..
नाहीतर कुणातरी गायिकेला हि गाणी सुचव.

हर्ट,

मला वाटतं, तुम्हाला रागदारी शी इमान राखायचं असेल तर कुणातरी योग्य शास्त्रीय गायकाला १:१ विचारा. इथे दहा जण, एकच गाणे पंधरा रागात आहे असे सांगून गोंधळ फक्त वाढवत आहेत. हे माझे वैयक्तिक मत!

भैरवी
अवघा रंग एक झाला (किशोरी आमोणकर)
सजल नयन नित धार बरसती (अजित कडकडे)
आजी सोनियाचा दिनु (लता)
प्रभु आजी गमला (कुमार गंधर्व)

<<तूजसाठी शंकरा, भिल्लीण मी झाले, धुंडीत तूज आले>> : राग मारूबिहाग
<<जिवलगा राहिले दूर घर माझे>> : राग श्री - गौरी

राग बिभास :
शंभो शंकरा करुणाकरा :चित्रपट : माहेरची माणसं ; गायिका अनुराधा पौड्वाल