Submitted by जयदीप. on 9 May, 2016 - 11:14
किती खोल डोहात पोहून आलो, किती खोल आहे तरी जायचे
किती श्वास आहे असा राहिलेला, कितीदा निराशेत परतायचे
पुन्हा तेच झाले विषय काढल्यावर, पुन्हा फोल चर्चाच फोफावली
पुन्हा राहिला एक निर्णय उपाशी, पुन्हा का तुला सांग भेटायचे
ठरव कोणती वेळ निवडायची ते, ठरव दूर आहे किती जायचे
ठरव कोण सोबत तुला पाहिजे ते, ठरव कोणते मार्ग टाळायचे
कुठे खेळ होतास तू मांडलेला, कुठे खेळ सोडून आलास तू
कुठे कोण आहे तिथे राहिलेले, कुठे अन् कशाला परत जायचे
तुला काय होते हवे ते समजले, तुला खूप आनंद झाला तसा
तुला ते कधीही मिळालेच नाही, तुला दुःख याचे किती व्हायचे
जयदीप
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सध्यातरी तीन डोह दिसताहेत.
सध्यातरी तीन डोह दिसताहेत.
दोन डोह बुजवलेत
दोन डोह बुजवलेत
वा आवडली
वा
आवडली
वा!!! किती खोलवर अर्थ!!!
वा!!! किती खोलवर अर्थ!!!
सुंदर गजल ,,मतला दुसरा तीसरा
सुंदर गजल ,,मतला दुसरा तीसरा शेर विशेष आवडले !