पुण्यामधे Ceylon Cinnamon कुठे मिळेल ?

Submitted by mani_mani on 4 May, 2016 - 08:39

पुण्यामधे Ceylon Cinnamon कुठे मिळेल ? खुप किराणा आणि आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात विचारले, पण Cassia Cinnamon मिळते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनि मनि, सिलोनची दालचिनी आणि भारतामधली दालचिनी ह्या दोन्हीमधे काय फरक आहे? काही खास फायदे आहेत का सिलोनच्या दालचिनीमधे?

बी, नेटवर चेक करा. खुप फरक आहे.
आपण बहुदा वापरतो ते Cassia . Ceylon पटकन मिळतही नाही.

mani_mani, माझं आयुर्वेदिक औषधांचं दुकान अतिप्राचीन Happy आहे. बरंच काही मिळतं. तुला घाई नसेल तर मी येत्या रविवारी विचारुन तुला इथे (माबोवर) लिहेन. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही, म्हणुन रविवार पर्यंत थांबावं लागणार आहे. मला गुलकंद आणि मध आणायला जायचंच आहे.

सर्वांना माहिती बद्द्ल धन्यवाद.
इथे लिहिण्या आधी online check केले होते. मला पावडर नको आहे. आणी बरयाच online sites जेथे Cinnamon sticks आहेत त्या ईथे delivery देत नाहीत. Sad

औषधासाठी हवी आहे.

@ Srd
मला रोप नको आहे.
मला सिलोन दालचिनीचे तुकडे हवे आहेत.

@ मनिमाऊ
बरोबर आहे , आपण वापरतो ते Cassia. सिलोन दालचिनी हीच खरी दालचिनी.
Please, तुम्ही विचारुन सांगा.
धन्यवाद.

धन्यवाद दिनेश, गोदरेज नेचर बास्केट site वर True Cinnamon from Sri Lanka अश्या नावाने product आहे.
त्या दुकानात स्वःताहुन जावुन पाहते.

Cassia ला तर पिवळी फुले येतात ना आणि ते झाड आपल्या आजूबाजूला नेहमीच आढळते.

मी आजच सिलॉनची दालचिनी आणली. इथे लगेच मिळाली. सिलॉनची लवंग आणि वेलचीपण छान होती. त्यामुळे ह्या तिन्ही वस्तू एकत्रित आणल्यात फक्त छोटा पॅक नाही मिळाला म्हणून जरा मोठा पॅक घ्यावा लागला. माझा रोजच्या चहामधे मी आले, ओली हळद, गवती चहाची पाने हे सर्व घालतो. आता, चहामधे अजून तीन गोष्टी घालणार आहे. दालचिनीच्या चहाची सवय व्हायला जरा वेळ लागतो पण नंतर एकदा चव आवडली की तोच चहा आवडलायला लागतो.

आपल्याकडे जी दालचिनी म्हणून विकतात ती तमालपत्राची साल असते. खरी दालचिनी श्री लंकेचीच. तिचा स्वाद खुपच सौम्य असतो आणि गोडसरही. आईसक्रीम, कॉफी सारख्या पदार्थात वापरायला उत्तम. ती अगदी पातळ असते व तिची गुंडाळी असते. तिची लवकर पूड होत नाही. आपल्याकडच्या दालचिनीत जी तिखट चव असते, ती तिच्यात नसते.

हो.

आणि लंकेच्या दालचिनीला एक एक पातळ थर असतात त्यामुळे हातानी सहज चुरडून टाकता येते. आपल्याकडची दालचिनी जाड असते आणि तिला थर नसतात. शिवाय आपल्याकडच्या दालचिनीचा रंग जरा जास्त गडद असतो तर लंकेच्या दालचिनीचा रंग फिकत असतो. आत्ताच चहा करुन प्यायलो. लवंग, दालचिनी आणि वेलचीचा गंध मस्त दरवळत आहे. एक एक घोट चाखताना भारी मजा येते आहे.

मी असे वाचले की रोजच्या आहारात जर दालचिनी वापरली तर मधुमेहाचा त्रास होत नाही.

इथे नव्या उंबईत आता श्रीलंका दालचिनी डी मार्टात मिळायला लागलीय. एकदा ती वापरली कि ती दुसरी नेहमीची वापरावीशी वाटतही नाही.

पुण्यातील D mart मधे पाहते, मिळते का?
काहि दिवासापुर्वी Cassia आणि Ceylon दालचिनी मधला फरक कळला. तो पर्यंत कॅसिकाला दालचिनी समजत होते आणि दुकानातही तेच देतात.

"दिनेश. | 5 May, 2016 - 18:01 नवीन
आपल्याकडे जी दालचिनी म्हणून विकतात ती तमालपत्राची साल असते."
बरोबर .