Submitted by mani_mani on 4 May, 2016 - 08:39
पुण्यामधे Ceylon Cinnamon कुठे मिळेल ? खुप किराणा आणि आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात विचारले, पण Cassia Cinnamon मिळते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Did you check on amazon? If
Did you check on amazon? If available, you will get home delivery.
गोदरेज नेचर बास्केट मधे
गोदरेज नेचर बास्केट मधे असायला हवे.
http://www.amazon.in/Keya-Sri
http://www.amazon.in/Keya-Sri-Lankan-Cinnamon-Powder/dp/B00LN8734E
अमेझॉन वर पावडर आहे उपलब्ध.
http://ceylonspicecompany.com
http://ceylonspicecompany.com/spice-list/gourmet-true-ceylon-cinnamon-gr...
इथे पण पहा.
हीच खरी दालचिनी बारापंधरा
हीच खरी दालचिनी बारापंधरा प्रजातींपैकी.मला वाटलं रोप हवंय.मुश्कील.
मनि मनि, सिलोनची दालचिनी आणि
मनि मनि, सिलोनची दालचिनी आणि भारतामधली दालचिनी ह्या दोन्हीमधे काय फरक आहे? काही खास फायदे आहेत का सिलोनच्या दालचिनीमधे?
बी, नेटवर चेक करा. खुप फरक
बी, नेटवर चेक करा. खुप फरक आहे.
आपण बहुदा वापरतो ते Cassia . Ceylon पटकन मिळतही नाही.
mani_mani, माझं आयुर्वेदिक औषधांचं दुकान अतिप्राचीन आहे. बरंच काही मिळतं. तुला घाई नसेल तर मी येत्या रविवारी विचारुन तुला इथे (माबोवर) लिहेन. माझ्याकडे त्यांचा नंबर नाही, म्हणुन रविवार पर्यंत थांबावं लागणार आहे. मला गुलकंद आणि मध आणायला जायचंच आहे.
सर्वांना माहिती बद्द्ल
सर्वांना माहिती बद्द्ल धन्यवाद.
इथे लिहिण्या आधी online check केले होते. मला पावडर नको आहे. आणी बरयाच online sites जेथे Cinnamon sticks आहेत त्या ईथे delivery देत नाहीत.
औषधासाठी हवी आहे.
@ Srd मला रोप नको आहे. मला
@ Srd
मला रोप नको आहे.
मला सिलोन दालचिनीचे तुकडे हवे आहेत.
@ मनिमाऊ
बरोबर आहे , आपण वापरतो ते Cassia. सिलोन दालचिनी हीच खरी दालचिनी.
Please, तुम्ही विचारुन सांगा.
धन्यवाद.
धन्यवाद दिनेश, गोदरेज नेचर
धन्यवाद दिनेश, गोदरेज नेचर बास्केट site वर True Cinnamon from Sri Lanka अश्या नावाने product आहे.
त्या दुकानात स्वःताहुन जावुन पाहते.
Cassia ला तर पिवळी फुले येतात
Cassia ला तर पिवळी फुले येतात ना आणि ते झाड आपल्या आजूबाजूला नेहमीच आढळते.
मी आजच सिलॉनची दालचिनी आणली. इथे लगेच मिळाली. सिलॉनची लवंग आणि वेलचीपण छान होती. त्यामुळे ह्या तिन्ही वस्तू एकत्रित आणल्यात फक्त छोटा पॅक नाही मिळाला म्हणून जरा मोठा पॅक घ्यावा लागला. माझा रोजच्या चहामधे मी आले, ओली हळद, गवती चहाची पाने हे सर्व घालतो. आता, चहामधे अजून तीन गोष्टी घालणार आहे. दालचिनीच्या चहाची सवय व्हायला जरा वेळ लागतो पण नंतर एकदा चव आवडली की तोच चहा आवडलायला लागतो.
हर्ट म्हणजे बी का?
हर्ट म्हणजे बी का?
आपल्याकडे जी दालचिनी म्हणून
आपल्याकडे जी दालचिनी म्हणून विकतात ती तमालपत्राची साल असते. खरी दालचिनी श्री लंकेचीच. तिचा स्वाद खुपच सौम्य असतो आणि गोडसरही. आईसक्रीम, कॉफी सारख्या पदार्थात वापरायला उत्तम. ती अगदी पातळ असते व तिची गुंडाळी असते. तिची लवकर पूड होत नाही. आपल्याकडच्या दालचिनीत जी तिखट चव असते, ती तिच्यात नसते.
दिनेशदा, दालचिनी म्हणजे
दिनेशदा, दालचिनी म्हणजे एखाद्या झाडाची साल असते का ?
हो, दोन्ही दालचिन्या तश्याच
हो, दोन्ही दालचिन्या तश्याच असतात.
हो.
हो.
आणि लंकेच्या दालचिनीला एक एक
आणि लंकेच्या दालचिनीला एक एक पातळ थर असतात त्यामुळे हातानी सहज चुरडून टाकता येते. आपल्याकडची दालचिनी जाड असते आणि तिला थर नसतात. शिवाय आपल्याकडच्या दालचिनीचा रंग जरा जास्त गडद असतो तर लंकेच्या दालचिनीचा रंग फिकत असतो. आत्ताच चहा करुन प्यायलो. लवंग, दालचिनी आणि वेलचीचा गंध मस्त दरवळत आहे. एक एक घोट चाखताना भारी मजा येते आहे.
मी असे वाचले की रोजच्या आहारात जर दालचिनी वापरली तर मधुमेहाचा त्रास होत नाही.
इथे नव्या उंबईत आता श्रीलंका
इथे नव्या उंबईत आता श्रीलंका दालचिनी डी मार्टात मिळायला लागलीय. एकदा ती वापरली कि ती दुसरी नेहमीची वापरावीशी वाटतही नाही.
पुण्यातील D mart मधे पाहते,
पुण्यातील D mart मधे पाहते, मिळते का?
काहि दिवासापुर्वी Cassia आणि Ceylon दालचिनी मधला फरक कळला. तो पर्यंत कॅसिकाला दालचिनी समजत होते आणि दुकानातही तेच देतात.
"दिनेश. | 5 May, 2016 - 18:01
"दिनेश. | 5 May, 2016 - 18:01 नवीन
आपल्याकडे जी दालचिनी म्हणून विकतात ती तमालपत्राची साल असते."
बरोबर .
हर्ट म्हणजे नक्कीच बी...
हर्ट म्हणजे नक्कीच बी...
@ मनिमाऊ, have you asked ?
@ मनिमाऊ, have you asked ? any updates ? please.