अशांना एकटे पाडू

Submitted by vilasrao on 29 April, 2016 - 05:06

कुणी तलवार भाला अन कुणी जर दावतो चाकू
चला मग आज तळहातावरी शिर घेवुनी चालू

न मिळतो हक्क जर मागून ,,घ्यावा हिसकावून मित्रा तू
नको याची करू चिंता म्हणाले ते तुला डाकू!

कुणाला सिध्दि ना काबू,,चलाखी ही तुझी जादू
चमत्कारी महापुरुषा असा नसतो खरा साधू !

फुलेंच्या तत्वज्ञानाला मनाशी उजळणी घालू
न बेईमान होऊ अन खरे स्वातंत्र्यही राखू

मिटेना भेद आता जर पुन्हा कागद नको जाळू
मनू कोळून प्याले जे ,,अशांना एकटे पाडू !

Group content visibility: 
Public - accessible to all site users