जीवना केवढी मजा आहे ...

Submitted by बाळ पाटील on 29 April, 2016 - 01:59

गझल ... (वृत्त:- लज्जीता )

पावलो पावली सजा आहे
जीवना केवढी मजा आहे

भेटले खूपसे सुदैवाने
हासणे तेवढे वजा आहे

वेदना एवढी सखी व्हावी
कोणता रोग काळजा आहे

सोडले मोकळे जगानेही
मीच का तो बळी अजा आहे

पाहणे टाळतो मला मीही
आरशाला दिली रजा आहे
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझलेत तान्त्रिक बाबी फार असतात त्यामुळे कलकुसर बरेचदा करावीच लागते आणि गझलेवर कृत्रिमतेचा आरोप होतो

तरी शायराचे हे कसब आहे की त्याने हे तन्त्र असे सहजसुन्दर पाळावे की शेर अधिकाधिक नैसर्गिक वाटला पाहिजे

विलासरावोजी, महेशजी धन्यवाद !

लज्जीता असे वृत्त असते हे माहित नव्हते.>>>>>>
>>>> महेशजी , मला आपला उद्देश कळला नाही .

तरी शायराचे हे कसब आहे की त्याने हे तन्त्र असे सहजसुन्दर पाळावे की शेर अधिकाधिक नैसर्गिक वाटला पाहिजे
>>>>>>>>
.................... वैभवजी , यतीभंगासारखी क्षुल्लक चूकही प्रेमभंगासारखी पीडा देते .

अहो उद्देश काहीच नाही.
पुर्वी शाळेत अस्ताना काही वृत्तांची नावे ऐकली होती, पण हे नाव ऐकण्यात नव्हते.
असे पण काही वृत्त असते हे येथील उल्लेखामुळे समजले इतकेच.
तुमचे खासच कौतुक Happy

अहो उद्देश काहीच नाही.
पुर्वी शाळेत अस्ताना काही वृत्तांची नावे ऐकली होती, पण हे नाव ऐकण्यात नव्हते.
असे पण काही वृत्त असते हे येथील उल्लेखामुळे समजले इतकेच.
तुमचे खासच कौतुक >>>>>.

..... महेशजी, मला वाटले मी कुठे चुकलो का ? कारण हे वृत्त मी पहिल्याण्दाच हाताळतोय. अहो खूप नवनवीन वृत्त येवू लागली आहेत. मी कालच बारबाला नावाचे वृत्त पाहीले..... गा ल गा गा गा ल गा गा
........ असो धन्यवाद !