एक तारका आहे मी ही स्वयंप्रकाशी

Submitted by सुप्रिया जाधव. on 26 April, 2016 - 12:31

भांडत बसले वरकरणी होते त्याच्याशी
वाद विकोपाला गेले माझे माझ्याशी

पूर्ण मान्य आहे की तू धगधगता गोळा
एक तारका आहे मी ही स्वयंप्रकाशी

तुकडे झालेल्या तुकड्यांचे तुकडे झाले
स्वप्न नवे बाळगले होते एक उराशी

हरवुन जाइल माझे मी पण या भीतीने
तुला विसरणे विसरतेच ठरवून मनाशी

घोंघवणारे वादळ आहे खरे मनस्वी
घेणे देणे त्याचे ना कोणाकोणाशी

डाव सोडुनी अर्धा कोणी निघून जातो
खेळ खेळते नियती मागे उरलेल्याशी

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वतःखेरीज मनातले बोलू कोणाशी ?
वाद विकोपाला गेले माझे माझ्याशी

पूर्ण मान्य आहे की तू धगधगता गोळा
एक तारका आहे मी ही स्वयंप्रकाशी

तुकडे झालेल्या तुकड्यांचे तुकडे झाले
स्वप्न नवे बाळगले होते एक उराशी

हरवुन जाइल माझे मी पण या भीतीने
तुला विसरणे विसरतेच ठरवून मनाशी

घोंघवणारे वादळ आहे खरे मनस्वी
घेणे देणे त्याचे ना कोणाकोणाशी

डाव सोडुनी अर्धा कोणी निघून जातो
खेळ खेळते नियती मागे उरलेल्याशी

सुप्रियाजी अप्रतिम... सर्व च ...