Submitted by vilasrao on 22 April, 2016 - 02:32
असे आज ओझे नभाचे मनाला
नको आठवांचा मला पावसाळा !
प्रतिक्षेत आहे उभा मी तुझ्या जर
उद्या येत नाही म्हणाली कशाला
नभाशी निखारा पुन्हा धूर झाला
अकस्मात गेला लखाकून तारा !
जगावे कशाला मरावे कशाला
उदाहरण त्याचे असावे जगाला !
पुन्हा होत आहे जुन्याचे नवे रे
नको वाद घालू नवा हा जमाना
विलास खाडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा