एखाद्याच्या बोलीमुळे मायबोली धोक्यात येऊ शकेल का ?

Submitted by घायल on 21 April, 2016 - 11:46

मराठी प्रमाण भाषा म्हणजे काय ? ही किती लोकांकडे बोलली जाते ?

वेगवेगळ्या गावचं पाणी वेगळं म्हणतात. दर दहा कोसावर बदलत जाणा-या . मराठी भाषेत / बोलीत बोलणा-याने प्रमाण भाषेत व्यक्त व्हावे, मूठभरांनी लादलेले सभ्यतेचे संकेत पाळत लिखाण करावे अशी बंधने लादल्यास लहानपणापासून कानावर पडलेल्या बोलीला टाळून जी आपली नाही त्या संस्कृतोद्भव मराठीतून सकस आत्मलक्षी साहीत्य निर्मिती होऊ शकते का ? ज्याचे त्याचे अनुभवविश्व, अनुभूती हे परक्या भाषेत व्यक्त करणे प्रत्येकाला जमू शकते का ? अपवाद असतील. पण असा नियम होऊ शकेल का ?

ग्राम्य भाषेत लिहीणा-या सदस्याचे याबद्दलचे म्हणणे ऐकायची उत्सुकता आहे. त्यावर सर्वांची सर्वंकष मते जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रति-प्रतिसादावरून आयडी ची ओळख पटली >> मानसिकता कळाली. असे विकृत आयडीज का आहेत देव जाणे. .

त्या धाग्याची लिंक देखील देता येईल. जेणेकरून लोकांनाही कळेल की हा आयडी का शाबूत आहे ते .

धागा क्र. १
http://www.maayboli.com/node/55141

Pages