Submitted by नानुभाऊ on 18 April, 2016 - 03:38
गडबड होते!
तिला पाहतो, गडबड होते
उगाच जगणे अवघड होते!
तिचा अबोला किती बोलका!
न बोलताही बडबड होते!
मैफलीत ती येते, अन् मी
शोधत बसतो, धडपड होते!
पावसात तिज मिठीत माझ्या
बघुन ढगांची गडगड होते!
मनात ही मी तिच्याच मागे
मनामधेही परवड होते!
मला म्हणाली "लय हो तू, मी
हृदयामधली धडधड होते!"
तिला मांडणे गझलेमध्ये
किती लाघवी तडफड होते!
- केतन पटवर्धन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुड
गुड
>>>तिचा अबोला किती बोलका! न
>>>तिचा अबोला किती बोलका!
न बोलताही बडबड होते!>>>छान!
'धडधड' ही छानंच!
तिचा अबोला किती बोलका! न
तिचा अबोला किती बोलका!
न बोलताही बडबड होते!
>>>
मस्तच!
खुप दिवसांनी दिसलात सेलेब्रिटीजी
Thanks Everyone!
Thanks Everyone!
मला म्हणाली 'लय हो तू मी
मला म्हणाली 'लय हो तू
मी हृदयामधली धडधड होते!'
... ही द्विपदी आवडली.