Submitted by vilasrao on 16 April, 2016 - 06:09
कोणता आधार या शहरात आहे
वाढले बेकार या शहरात आहे
आर्त किंकाळ्या हवेशी विरतात येथे
कान बहिरे फार या शहरात आहे
चेहऱ्याला रोज असते हासण्याचे
मुखवटे बेजार या शहरात आहे !
या दिशेचा त्या दिशेशी वाद होतो
अन दिशाही चार या शहरात आहे
कायद्याने रोज अत्याचार होतो
कोणते सरकार या शहरात आहे
ह्या चकाचौंधीत दडलेला कसा हा
वाटतो अंधार या शहरात आहे !
रोग कैफाचा कशाला तो असावा
वाढता आजार या शहरात आहे !
चांगला सांगू असा शेजार नाही
नेमके घरदार या शहरात आहे !
विलास खाडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा