“ द माइंडगेम ” (भाग २)

Submitted by रुद्रसेन on 15 April, 2016 - 06:24

“ द माइंडगेम ” (भाग २)

दुसऱ्या दिवशी मेरी लवकर उठली. कालचा प्रसंग अजून तिला आठवत होता, तिने रुबेलाला विच्रारल “ मॉम काळ तू किती वाजता आली होतीस गं”
“काल लवकरच आले गं “ काहीस तिरकसपणे मेरीकडे पाहत रुबेला म्हणाली.
“हो पण किती वाजता “ मेरीने अधिरतेने विचारलं.
“ साधारण अकरा साडेअकरा वाजले असतील” “पण का गं “ रुबेलाने साशंकतेने विचारलं.
तिची ती संशयी नजर मेरीला लगेच जाणवली, “ काही नाही तुझासाठी पेस्ट्री बनवणार होते पण तू उशिरा येशील म्हणून नाही बनवली त्यामुळे विचारलं.” मेरीने कशीबशी वेळ मारून नेली. पण मेरीचं विचारचक्र काही थांबेना रात्री तिला जी चाहूल जाणवली ती कोणा व्यक्तीची होती कि तिला झालेला भास होता. मेरीच मन आता शंका कुशंका नी भरून गेलं होता. घराबाहेर रात्री कोणीतरी सिगारेट ओढत थांबत की, आणि अशाच अपरात्री आपल्याला खोलीबाहेर कोणाचीतरी चाहूल जाणवते की सारच अगम्य होता. त्यात अजून रुबेलाच्या पिस्तुलाच गौडबंगाल अजून होतंच, त्याबाबतीत तिने मनाची समजूत घातली होती कि ते रुबेला स्वसंरक्षणसाठी ते बाळगत असेल पण आता तिचा काहीसं साशंक झालेलं होतं. त्या रात्री रुबेला लवकरच घरी आली, मेरी जागीच होती दोघींनी जेवण एकत्रच केलं. जेवण करून रुबेला लगेचंच झोपायला गेली ती झोपयला गेली कि नाही याची खात्री करूनच मग मेरी आपल्या खोलीत झोपायला आली. मध्यरात्री अचानक कडकड असा आवाज झाला हलकासाच पण त्या भयाण शांततेत त्याचा आवाज उमटलाच होता. मेरी अर्धवट जागी झाली, कोणीतरी खोलीच्या बाहेरून कि हॉलमध्ये चावी फिरवत असल्यासारखा आवाज होता तो. मेरी दार तर व्यवस्थित लॉक केलेल होतं. पण आवाजासरशी मेरी धडपडत जागी झाली. आपल्याला स्वप्न पडलं कि काय असं मेरीला क्षणभर वाटलं. पण कोणीतरी बाहेरून लॉक उघडतंय हे मेरीला समजायला काही क्षणच लागले. ती बिछान्यावर उठून अर्धवट उठून बसली होती, दिवे बंदच होते खोलीमध्ये जास्त प्रकाश न्हवता. चेहरा घामाने डबडबला होता. कोणीतरी निश्चितच होता जे आतमध्ये यायला पाहत होता तव स्वप्न न्हवत. मेरीला काय करावे ते सुचेना बाजूच्या टेबलावरचा फ्लॉवरपॉट तिने हातात धरला. बाहेर जे कोणी असेल ते आत येत क्षणी त्याचा डोक्यात घालायचा विचार तिने पक्का केला. कि होलमधली धडधड थांबली. त्या व्यक्तीला लॉक उघडण्यात यश मिळाल होतं. मेरीने फ्लॉवरपॉट वरची पकड घट्ट केली.
“मेरी घाबरू नकोस मी तुला कसलीही इजा करणार नाही, मला तुझा हितचिंतकच समज” आत येताक्षणी त्या व्यक्तीचा आवाज आला होता. आवाजावरून ती व्यक्ती पुरुष असावी असा वाटत होता. मेरी जागच्या जागी गोठली होती, रुबेला जागी असेल का? कि मोठ्याने किंचाळून तिला जागे करावं असा तिला वाटून गेलं. एवढ्यात त्या व्यक्तीने दिव्यचं बटन चाळू केलं आणि संपूर्ण खोली प्रकाशाने उजळून गेली. मेरी जराशी दचकली तिने फ्लॉवरपॉट उचलून धरला. अगदी मध्यम वयाचा दिसणारा माणूस तिच्यासमोर उभा होता, अंगात कोट खाली बूट, रुंद खांदे काळेभोर डोळे, जरासे पिंगट केस असा एकूण त्याचा वेश होता.
“मेरी फ्लॉवर पॉट खाली ठेव , मी तुला काहीही करणार नाहीये.” तो शांतपणे म्हणाला. मेरीने हात खाली केला पण फ्लॉवर पॉट सोडला नाही.
“ कोण आहात आपण, अशा वेळी चोरासारखं दुसऱ्याचा घरात तुम्ही कसं काय घुसू शकता, याबद्दल मी तुम्हाला पोलिसांच्या स्वाधीन करू शकते.” मेरी न थांबता पटापट बोलली. बोलताना तिच्या छातीतील धडधड अजून वाढलेली होती.
“ तू असा काही करणार नाहीस, कारण तू अस केलंस तर त्यात तुझंच नुकसान असेलं” तो माणूस शांतपणे म्हणाला. तो अजून जागच्या जागीच उभा होता.
मेरीला समजेचना या माणसाला पोलिसांच्या हवाली करण्यात आपलं काय नुकसान होईल. पण तरीही मेरी पुढे बोलली “ कोण आहात आपण” इथे अपरात्री चोरासारखं घुसण्याच काय कारण आहे ?
“ माझा नाव सायमन क्रूक, मी तुझा वडिलांसोबत काम करत होतो, एका महत्वाचा गोष्टीबाबतीत मी तुला सावध करायला आलोय, असं बोलून त्या माणसाने कोटाच्या खिशातून एक फोटो काढून तो मेरीच्या पुढे फेकला. मेरीने तो घेतला, तो तिच्या वडिलांचा आणि स्वतःला सायमन क्रूक म्हणवणाऱ्या या माणसाचा एकत्रित फोटो होता.
“मेरी आपण दिवे घालवून अंधारात बोलू कारण रुबेला जागी होण्याची शक्यता आहे.” असं बोलून त्याने दिवे विझवले, अजूनही तो दाराजवळच उभं होता. अंधारात मेरीला तो अंधुकसा दिसत होता, मेरीने फ्लॉवरपॉट आपल्या बाजूला ठेवला. मेरी आता जराशी स्वस्थ झाली होती.
“कोणत्या कारणासाठी तुम्ही इथे आलाय” मेरीने प्रश्न केला.
सायमनने बोलायला सुरुवात केली
“ विल्यमच्या ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये मी त्याचा हाताखालीच काम करत होतो, युरोप मध्ये आम्ही एकत्रच काम केलं, खूप सारी कामे आम्हाला मिळाली होती. सिझन मधल्या फळांची देवाणघेवाण हे आमचं सर्वात बहुमूल्य काम असे. त्यातून विल्यमला बक्कळ पैसा मिळालेला होता. अर्थात आम्हालादेखील मिळाला. मागच्या सिझनमध्ये सगळ्या उत्पादनांची देवाणघेवाण आमच्या मार्फत झाली, खूप नफा कमावला. त्या रात्री मी आणि विल्यामने आनंदामध्ये खूप दारू ढोसली. दारूच्या नशेत विल्यम खूप हळवा झाला होता. आपली मुलगी मेरी किती गोड आहे आपण तीचापासून कसे दूर आहोत याबद्दल भरभरून बोलत होता. रुबेला हि कशी पैशाची बायको आहे हे देखील सांगत होता. याचाच फायदा घेत मी विल्यमला त्याचा एकूणच मिळकतीबद्दल विचारलं.तेव्हा तो म्हणाला कि त्याचा मागे त्याने कमावलेले जवळपास ९ मिलिअन डॉलर तो सोडून जाणार होता. मेरी शांतपणे त्याच बोलण ऐकत होती.
“ पुढे विल्यम मृत्यू झाला, त्याने आजपर्यंत मिळवलेली संपत्तीपैकी जवळपास आठमिलिअन डॉलर तुला मिळेल आणि राहिलेली एक मिलिअन डॉलर रुबेलाला, कारण अशीच व्यवस्था विल्यमने केली होती, तर माझी इच्छा अशी आहे कि त्या मिलिअन डॉलर मधले निम्मे म्हणजे चार मिलिअन डॉलर मला मिळावेत एवढंच.
काही क्षण शांततेत गेले. मेरी ऐकून सुन्नच झाली. “पण मी तुला का पैसे द्यावेत.” मेरीने विचारले.
यावर मात्र सायमनने स्मितहास्य केले आणि म्हणाला. “ चांगला प्रश्न विचारलास, त्याचं असं आहे कि मेरी, तुझा सावत्र आईच्या वाट्याला फक्त एक मिलिअन डॉलर आले आहेत, त्या अधाशी महिलेला पैशाची किती चटक आहे हे तुला माहितच आहे. आणि तुला मिळणार ८ मिलिअन, हे समजल्यामुळे तिने तुला ठार मारण्याचा डाव रचला आहे, म्हणजे तुला मारल्यानंतर बाकीचे पैसे सुद्धा तिलाच मिळतील आलं लक्षात. तुझा जीव धोक्यात आहे आणि तू तुझं रक्षण करण्याइतकी सक्षम नाहीयेस, पण फक्त मी तुला वाचवू शकतो, रुबेला तुझ्या केसालासुद्धा धक्का लावू शकणार नाही. फक्त मला तू चार मिलिअन द्यावेस. रुबेलाच काय करायचं ते मी पाहीन ती तुला काहीही त्रास देऊ शकणार नाही उलट तिचे एक मिलिअन सुद्धा आपल्याला म्हणजे तुलाच मिळतील मग बोल काय वाटतंय तुला.”
एवढ बोलून सायमन परत शांत बसला. मेरीला काय खरा काय खोटं हेच समजेना. खरंच रुबेला आपल्याला मारू शकते यावर तिला काहीच सुचेना, तिच्या पर्स मधील पिस्तूल याच कारणासाठी तर ती ठेवत नसेल ना कि कधीतरी आपला काटा तिला काढता येईल. मेरी ला भणभणल्यासारख झालं. तरीपण हा कोण कुठला सायमन रुबेलाला किंवा आपल्याला खरंच मारू शकतो काय. “रुबेलाला तू कसा हाताळणार “ मेरीने विचारले.
“वेल ..तू त्याची काळजी करू नकोस मी तिची व्यवस्थित विल्हेवाट लावीन.” सायमन अगदी सहजंच बोलला.
“जर मी तुला पैसे द्यायला नकार दिला आणि पोलिसांकडे गेले तर? “ मेरीने विचारलं.
“हे दोन्हीही पर्याय तुलाच घातक ठरतील कारण जर माझी ऑफर जर स्वीकारली नाहीस तर हीच ऑफर मी रुबेलाला देईन. ती हावरट बाई माझी ऑफर लगेचंच स्वीकारेल यात शंका नाही. नाहक तू मारली जाशील आणि राहिला पोलोसांचा प्रश्न.मी सध्या या देशात एका वेगळ्याच नावाने वावरत आहे, एक वेगळीच ओळख, आणि ते सिद्ध करणारी भरपूर कागदपत्रे माझाकडे आहेत. त्यामुळे सायमन क्रूक या व्यक्तीला ते ओळखेपर्यंत तुझा थडग बांधल सुद्धा जाईल. मला पैसेही मिळालेले असतील आणि पोलिसांना कळेपर्यंत मी जगाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असेन. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती मध्ये माझा तोटा काहीच नाहीये. त्यामुळे एकतर माझी ऑफर स्वीकार कर अन्यथा मी हि ऑफर रुबेलाला देईन ज्यात तुझं थडगे बांधण्याची व्यवस्था देखील असेल.”सायमन दाराजवळ उभं राहून मेरीच्या उत्तराची वाट पाहत होता. “ मला विचार करायला वेळ हवाय” मेरी म्हणाली.
“ ओके काही हरकत नाही तुला परवा पर्यंतचा वेळ देतो तोपर्यंत ठराव काय ते,परवा रात्री साडेबाराला तुझा खिडकीतुन टॉर्चचा प्रकाश समोरच्या झाडीमध्ये दाखव तो मी समोरच्या झाडीमधून पाहीन आणि प्रतिसाद म्हणून तुलादेखील टॉर्चचा इशारा दाखवीन. आणि समजून जाईन कि तुला ऑफर मान्य आहे म्हणून.
सायमन च्या बोलण्यावरून तो पूर्ण तयारीत असल्यासारखा वाटत होता. त्या रात्री सायमनच सिगारेट ओढत झाडीत उभं असणार, आता मेरीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला होता , सायमनच घरावर पाळत ठेवून होता तर. त्या रात्री अचानक खोलीबाहेर जाणवलेली ती चाहूल म्हणजे सायमनच असणार. दुसऱ्याचा घरामध्ये विनासायास तो घुसू शकत होता, आणि पैशासाठी तर कोणाचाही मुडदा पडण्याची तयारी होतीच.
“ठीक आहे मी परवा रात्रीपर्यंत आपलं निर्णय कळवीन” मेरी म्हणाली.
“ओके, चालेल परवा रात्री. आता मी निघतो “ अस म्हणून सायमन सावकाशपणे बाहेर पडला.
सायमन निघून गेलं पण मेरी अजून तशीच बसून होती....
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users