मनास माझ्या

Submitted by vilasrao on 12 April, 2016 - 15:53

गजल : मनास माझ्या

संवेदनाच नाही म्हणते मनास माझ्या
हे बोलणे कसे मग छळते मनास माझ्या

जगतो अता कसा मी जाळून काळजाला
कोणी विचारणारे नसते मनास माझ्या

वेड्यात काढणारे असतील का शहाणे ?
कोडे म्हणाल खुळचट ,,,पडते मनास माझ्या !

अभिनय हसायचा मी वठवून छान आहे
पाहून वेदनाही फसते मनास माझ्या

चालायचे असेही ,,,, असते असेच आता !
कोणी कुणाच नसते,,,, कळते मनास माझ्या

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान मतला...'अभिनय'ही छान!

काही ठिकाणी रदीफ व्यवस्थित हाताळल्या गेली नाही,असे वाटले!(वै.म.)
उदा.
>>>वेड्यात काढणारे असतील का शहाणे
काहूर दाटलेले असते मनास माझ्या<<<येथे 'मनास' ऐवजी 'मनात' काहूर दाटले असावेसे वाटणे साहजिक वाटते!

वेड्यात काढणारे असतील का शहाणे?
कोडे म्हणाल खुळचट..पडते मनास माझ्या>>>असे सहज सुचले!
अर्थात,येथे 'काहूराची' तिव्रता मात्र जरा कमी होते!

धन्यवाद सत्यजित'जी !
रफिद व्यवस्थित हाताळल्या गेली नाही >>अगदी बरोवर पटले !
वेड्यात काढणारे असतील का शहाणे?
कोडे म्हणाल खुळचट..पडते मनास माझ्या>>> हा पर्याय छान सुचविल्याबद्दल धन्यवाद,काहूर इतकी
जरी तिव्रता नसली तरी तंत्र पाळण्यासाठी एवढी तडजोड मला करावी वाटते ,
मला "कोडे कशास वेडे पडते मनास माझ्या"ही ओळ सुचली होती पण खुळचट हा शब्द सुचविल्याबद्दल पुनश्च
धन्यवाद!
संपादित केले आहे !