कालसर्पयोग,नारायण नागबळी व नाडी ज्योतिष

Submitted by सह्याद्रीमित्र on 11 April, 2016 - 10:56

१.एखाद्या कुंडलीमध्ये जेव्हा सर्व ग्रह राहू व केतूच्या मध्ये येतात तेव्हा तो कालसर्पदोष मानला जातो असं काही ज्योतिषांचं मत आहे. आंतरजालावर बारा प्रकारचे कालसर्पयोग सांगितले आहेत ज्याचे त्या त्या योगाप्रमाणे माणसाच्या आयुष्यावर होणारे परिणामही नमूद केलेले आढळतील.

कालसर्पयोगाची शांती त्र्यंबकेश्वर येथे जाउन करावी असा सल्ला अनेक ज्योतिषी देतात. प्रश्न असा आहे कि नक्की कालसर्पयोग हा प्रकार अस्तित्वात आहे का ?? आणि असल्यास त्याची शांती करणे हा एकमेव उपाय आहे ?? कालसर्पदोष त्र्यंबकेश्वरला जाऊन निवारण केलास आयुष्यात अमुलाग्र बदल घडतो का ??

२.तसेच नारायण नागबळी म्हणजे नक्की काय ??

३.पुण्यामध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहसामोरील एका नाडी ज्योतिषाने माझ्या मित्राचे अत्यंत अचूक असे भविष्य वर्तवले आहे. त्याचा भूतकाळ व वर्तमानकाळ त्या त्या चांगल्यावाईट घटनांसाहित त्याने सांगितला व भविष्यही वर्णन केले. खात्रीसाठी त्याचे बोलणे रेकॉर्ड करून एक सीडीसुद्धा मित्राला दिली ज्याप्रमाणे सध्या घटना घडत आहेत.

नाडी ज्योतिषावर कृपया अधिक प्रकाश टाकावा.

नम्र विनंती : हे सर्व प्रकार सत्य किंवा असल्यास कृपया प्रत्यक्ष उदाहरण देऊन शंकेचे निरसन केल्यास वादाला तोंड फुटणार नाही याची कृपया काळजी घ्यावी. एक कुतूहल म्हणून हा धागा निर्माण करण्यात आला आहे/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाडी ज्योतिषा बद्दल मलाही माहिती हवी आहे. एक नातेवाईकत्याच्या अगदी आहारी गेलेले आहेत. (त्यांच नाडीभविष्य सेंटर निगडी की असच कुठेतरी आहे. इतर ठिकाणचे फ्रॉड आहेत असं त्यांच म्हणण! )

नाडीसाठी विंगकमांडर (नि.) श्री. शशिकांत ओक यांची पुस्तके वाचा. नाडीसाठी त्यांच्याशिवाय पर्याय नाही. आणि ते मनापासून मदत करतात हा अनुभव आहे.

कालसर्पयोग व नारायण नाग बली या दोन्हीवर माझा अजीबात विश्वास नाही. तुम्हाला कोणी हे करुन घ्यायला सांगीतले असेल तर अजीबात करु नका हाच सल्ला देईन, कारण फुकट पैसे वाया जातील.

त्यापेक्षा घरच्या कुलस्वामिनी ( कुलदेवता व कुलदेवी) ची भक्ती, उपासना करा. दर वर्षी नाही जायला जमले तरी निदान २-४ वर्षातुन एकदा तरी जाऊन खणा-नारळाने ओटी भरुन या. बाकी याच ज्योतिष्य विभागात बरीच माहिती आहे.

पैसे जास्त झाले असतील तर एखाद्या चांगल्या संस्थेला दान करा. एखाद्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करा. हे नागबली/कालसर्प सगळं थोतांड आहे.

नाडी ज्योतिष म्हणजे काय ते माहित नाही. पण एकंदरीत ज्योतिष देखिल थोतांड आहे हे मी तरी मानतोच.

प्रत्येक मंत्रात शक्ती असते, आपल्याला चांगला अनुभव नाही आला याचा अर्थ ते सगळे थोतांड आहे असे नाही होत

पुजा करणारा आणी सांगणारा
तेव्हढाच सात्विक , श्रध्दाळु लागेल Happy

शेवटी आप आपले विचार

घरच्या कुलस्वामिनी ( कुलदेवता व कुलदेवी) ची भक्ती, उपासना या दोन्हीवर माझा अजीबात विश्वास नाही. तुम्हाला कोणी हे करुन घ्यायला सांगीतले असेल तर अजीबात करु नका हाच सल्ला देईन, कारण फुकट पैसे आणि वेळ वाया जातील.

त्यापेक्षा घरच्या लोकांच्या मदतीने प्रतिकूल परीस्थितीवर मात करायचा संपुर्ण प्रयत्न करा.

पुजा करणारा आणी सांगणारा
तेव्हढाच सात्विक , श्रध्दाळु लागेल >> सात्विक आणि श्रद्धाळु म्हणजे?

स्वानुभव :

नारायण नागबळी केल्यावर बरीच चिडचिड कमी झाली, घरातली भांडणे कमी झाली. सकारात्मक विचार वाढले. काही उत्तम अनुभवही आलेत. धरसोडपणा सुटुन हाती घेतलेली कामे पुर्ण होउ लागली.

अर्थात हे सगळे कोण्या मानसोपचार तज्ञाकडुनही होउ शकेल.

पण कावळा बसायला न फांदी तुटायला एकच वेळ आल्याने, माझातरी विश्वास बसलाय.

माझ्या ऑफीसमधील २ जणांनी केलाय तो अघोरी नारायण नागबळीचा प्रकार .........
त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणताही फरक पडलेला नाही, ह्या सगळ्या भाकडकथा आहेत.उगाच आहारी जावू नये ..........
केवळ माझा विश्वास नाही म्हणून लिहीत नाही, पण हे सत्य आहे.

स्वानुभव :

नारायण नागबळी १७-१८ वर्षापूर्वी अतिशय संकटात केला होता.. का आहारी गेलो असे वाटते आता. त्या वेळी आता ज्ये.ना. ते ही काना च्या मुळे नाही म्हणू शकले नाही. अर्थात त्या संकटाचे जे काय परिणाम भोगावे लागले ते लागलेच. पन आता मागे वळून पहाताना असे आपण का बरे केले असे वाटते. Sad

माझ्या सख्खा बहीणीला अनुभव आहे. तिच्या सासर्च्या घरातील काही नातेवाइक परागन्दा झालेले, आजुन पत्ता नाही, कुलदैवत माहीती नाही. घरची परिस्थीत डबघाइला आलेली, नवरा ३ वर्श नोकरी शोधत होता, पण हाताला यश नाही. मग तिच्या मावस दिरानी हा उपाय सन्गितला, हा विधी केल्यावर ३-४ महीन्यात तिच्या नवर्याला infosys कडुन बोलावणे आले, लहान दिराला नोकरी मिळाली, कुणाचा विश्वास असो, नसो, मात्र अनुभवले आहे.

मला असे वाट्ते की पितराना सदगती मिळावी आणि जिव हत्येचे पातक दुर व्हावे म्हणुन हा विधी करतात.

हो. बरोबर आहे असेच सांगतात. पण नाशिकला ज्या रितीने हे चालते ना... बाहुल्या करून अंत्यविधी इ.इ. भयंकर वाटले होते ते सगळेच. अन सोन्याचा साप, अंगावरचे कपडे पाण्यात सोडणे.. इ.इ. काहीच न पटन्यासारखे.

मी पाचवीत असताना माझ्या आई बाबानी त्र्यंबकेश्वरला जाऊन हा विधी ( ना. ना. बळी) केला. नंतर ना परीस्थितीत सुधार झाला ना वडलांच्या तब्येतीत. सदैव मनस्ताप पाठी लागला. माझ्या लग्नाच्या ३ वर्षे आधी मला एक गुरु भेटले ( परमेश्वराचीच कृपा) त्यानी मला श्री महादेवाची उपासना सांगीतली. मी केली. श्री गुरुंचा ह्या कर्म कांडावर विश्वास नव्हता. काही असो, आज मी सुखात आहे. दुदैवाने माझे श्री गुरु हयात नाहीत.

मला ज्योतिष्य थोडेसे कळते. पण मी पत्रिका अजीबात पहात नाही. तो टप्पा यायला अजून बराच काळ आहे. मात्र ज्यांच्या पत्रिकेत राहु खराब आहे, त्यानी कुलदेवतेची उपासना जरुर करावी. मला नाही वाटत याला काही खर्च येतो.:स्मित: संध्याकाळी देवाला दिवा जरुर लावावा. घरात काही तोडफोड करुन बदल करु नका. मात्र दक्षिण दिशेला ओटा ( किचन ओटा ) अजीबात करु नका. बाकी बदल अजीबात नकोत. आणी कोणाचे तळतळाट घेऊ नका. राहु हा अतृप्त मानला जातो.

काही वर्षांपुर्वी कै. धुंडीराज दाते ( दाते पंचांग ) यांनी काल सर्प योग नावाचा योग अस्तीत्वात नाही असे लेख लिहुन पंचांगात प्रसिध्द केला आहे.

प्रत्येक माणसाला काहीतरी व्यावसायिक किंवा कौटुंबिक अडचणी असतात. याचा अर्थ कालसर्प योगानेच या येतात हे मानणे चुक आहे असे कै. धुंडीराज दाते यांनी लिहले होते याच मुळ कारण सुयोग आणि कुयोग ह्यांचे नियम काही जुन्या ग्रंथातुन आलेले आहेत. यात कालसर्प योग नाही.

पुण्यात एक ज्योतिषी १२८ प्रकाराने कालसर्प योग होतो असे प्रतिपादन करतात. या प्रकाराने पाहिल्यास प्रत्येक व्यक्तीच ह्या त्रासाने पिडीत आहे असे म्हणावे लागेल. हा सगळा बनाव आहे.

नाडी ज्योतिषाचा मी अनुभव घेतलाय. यातला उपाय हा भाग खर्चीक आहे . या ऐवजी काही सोपे व खर्च नसलेले उपाय करावेत.

विठ्ठल पोस्ट निट वाचा , मी असे म्हणाले नाही बहिणीच्या यजमानानी जिव्हत्या केली. हा विधी का करत असावेत या बद्द्ल मत दिले. अत्यन्त खाजगी आहे, पण सान्गते, तिच्या यजमानाचे काका पराग्नदा झालेले आहेत. अनेक वर्शेपुर्वी मग कळ्ले की एका आड्गावी त्याचा खुन झाला होता. तिचे आजुनही काही नातेवाइक आहेत ज्याचे असेच झाले (इथे तपशील देत नाही). तिच्या कुटूंबाला याने फरक पड्ला. प्रत्येकाचा अनुभव शेवटी निराळा, क्रुपया मत देताना ज्याच्या विशयी माहीती नाही त्याच्यावर टिप्पणी करु नये ही विन्न्ती.जीवहत्या कोणाची केली होती त्यांनी?

पण नाडी ज्योतिषी इतके अचूक निदान कसे काय करू शकतात ?? कारण मी वर उल्लेख केलेला नाडी ज्योतिषी हा फक्त तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायला लावतो व स्वत:च सगळी माहिती पुरवतो. तो तुम्हाला तुमच्या बाबतीत कोणतेही प्रश्न विचारत नाही. त्याने सांगितलेले मित्राचे भविष्यही अगदी तारखेसकट अचूक निघाले आहे. हा काय प्रकार आहे ??

नाडी भविष्याबाबत मलाही उत्सुकता आहे. नेमका पत्ता संपर्कातून मेल करू शकाल काय?

धन्यवाद!

ओह, बरेच यशस्वी कलाकार इकडे आहेत तर Happy
अत्यंत विश्वास असेल तरच कोणताही धार्मिक विधी करावा, अन्यथा करू नये. सिंपल ! Happy

धन्यवाद घाटपांडे काका. आपण दिलेल्या लिंक्स वाचल्या. एकुणात बरेचशे प्रश्न विचारुन नंतर कॉटेक्स्ट बनवुन भविष्य सांगण्याचा प्रकार दिसतोय Proud

अत्यंत विश्वास असेल तरच कोणताही धार्मिक विधी करावा >> धार्मिक विधीच्या फलाचा (??) विश्वासाशी संबध अस्तो कां?? विश्वास नसला तर फल का बरं मिळणार नाही?

Pages