प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत..........

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मराठीतून "ईश्श" म्हणून प्रेम करता येत,
उर्दूमध्ये "ईष्क" म्हणून प्रेम करता येत,
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येत,
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी, प्रेम करता येत!
"लव्ह" हे त्याचेच दुसर नेम असत,
कारण.....
प्रेम म्हणजे.... प्रेम म्हणजे... "प्रेम" असत! तुमच आमच अगदी "सेम" असत......
मंगेश पाडगावकरांच्या या ओळी एकताना मनात लगेचच विचार आला तो आजचा म्हणजेच १४ फेब्रुवारीचा. अरे असे काय करताय? गोड, गुलाबी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी हा एक हक्काचा दिवस!

शाळेचा गणवेश आणि दप्तरांची ओझी या सगळ्यांपासून मुक्त झाल्यानंतर आपण महाविद्यालयात एका मुक्त आणि धुंद वातावरणात प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांनाच कुणीतरी "आपल" असाव, अस वाटायला लागत. या हव्याहव्याशा वाटणार्या गोड शिरशिरीतूनच मग प्रेमात पडावस वाटण येत. एकदा का प्रेमात पडल, की प्यार का ईजहार करण ओघान आलच! हे प्रेम विझून जाता ते व्यक्त व्हाव, फुलत जाव, यासठीच दरवर्षी १४ फेब्रुवारीला साजरा होतो - व्हलेंटाईन्स डे! संपूर्ण जगातील समस्त प्रेमिकांचा हक्काचा वाटणारा गुलाबी स्वप्नांचा गोड दिवस!

हा दिवस का साजरा केला जातो, याविषयी अनेक दंतकथा आहेत. पण महाविद्यालयीन युवक्-युवतींमध्ये १४ फेब्रुवारी या दिवसाला विशेष महत्व दिल जात. जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षात पदार्पण केल, की जानेवारी महिन्याच्या मध्यावरच सर्व तरुणाईला वेध लागतात ते १४ फेब्रुवारीचे. मेत्रीच रुपांतर प्रेमात व्हाव, ह्यासाठी धडपडणार्यांसाठी आतापर्यंत मूक असलेल्या या अनोख्या तारुण्यसुलभ भावनेला व्यासपीठ मिळत ते ह्या दिवसाच्या रुपाने! ईतर वेळी मनातील भावना आवडत्या व्यक्तीशी मांडण्यास घाबरणार्या तरुण्-तरुणींसाठी हा दिवस म्हणजे सुवर्णसंधीच असते! शिवाय जे अगोदरच या प्रीतीच्या रेशीमगाठींनी बांधले गेलेले असतात, ते आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीला खुश करण्यासाठी याच दिवसाचा आधार घेतात. मग या दिवशी "युवर लव्ह पुट अ साँग ईन माय हार्ट - ईट गोज स्वीटर अज माय लव्ह फॉर यू गोज डीपर" अशा अनेक काव्यपंक्तीनी सुशोभित केलेली दहा रुपयांपासुन ते दोनशे रुपयांपर्यंत मिळणारी खास ग्रिटींग्ज. सुमारे २५ रुपयांपासुन ३०० रुपयांपर्यंतच्या किमतीचे बदामाच्या आकाराचे चॉकलेट बॉक्सेस, प्रेमविषयक पुस्तके, स्ट्फ्ड टॉईज अर्थात - "ओ डियर, बी माईन!" लिहिलेले गुबगुबीत टेडी बेअर्स. गुलाबाची फुल आणि ३०० ते १००० रुपए किमतीचे गुलाब आणि लिलीच्या फुलांनी सजवलेले लव्ह अण्ड डिव्होशन पुष्पगुच्छ, या सगळ्या गोष्टि ह्या दिवसाची वेशिष्ट्ये ठरतात.

आता तर या सगळ्यांच्या जोडिला आपल्या प्रीतीच्या फुलाला निरोप पाठविण्यासाठी निरनिराळ्या वाहिन्या, विविध वर्तमानपत्रे यांच्यावर जाहिराती देऊन लाखो रुपये खर्च केले जातात. आताच्या या आधुनिक काळात तर ईंटरनेट सारखी माध्यमही खुली आहेत. त्याचप्रमाणे विविध व्रुत्तपत्रात आपल्या प्रिय व्यक्तीला पाठविण्याच्या संदेशांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. त्यामुळे एकुणच मदनबाणांचे भाव हळूहळू वाढू लागले आहेत. एकापरीने हा दिवस म्हणजे "त्याला" किंवा "तिला" कापण्याचा दिवस होउ लागला आहे.

वी आर गोईंग आराउण्ड...... त्यांची कोर्टशिप चालु आहे... म्हणजेच अफेअर आहे... आणि एकदम टपोरी भाषेत बोले तो लफड.... तर ते प्रेमात आहेत. भेटण.... भटकण चालु आहे. कॉलेजला बंक मारुन मल्टिप्लेक्सला कोपर्यातल्या सीटच तिकीट काढून सिनेमा बघण्याची गंमत दुसर्या कुणालाच समजू शकणार नाही. तिचा अश्वासक हात हातात असतो तेव्हा जग जिंकल्याची भावना त्याच्या मनात असते आणि त्यान समजून घेत तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतल की प्रेमाखातर सगळ्या जगाशी लढण्याच बळ तिच्यात संचारत.

स्पर्शातली खरी जादू प्रेमात पडलेल्यांना माहीत असते. बाकीच्यांसाठी असतात अनेक निरर्थक स्पर्श जे कळत नकळत होत असतात. पण प्रेमात पडलेल्यांसाठी स्पर्श असतो एक भाषा... एक संवाद... एक अश्वासन... एक आनंद... आणि एक समाधान.

मग त्याचा आणि तिचा एकही दिवस एकमेकांना भेटल्याशिवाय जात नाही. रात्री झोपताना एसेमेस केल्याशिवाय डोळ्याला डोळा लागत नाही. हजारदा "आय लव्ह यू" म्हटल तरी पुन्हा एकदा म्हणावस वाटतच रहात. शहरापासून कुठेतरी दूर भटकायला जाव, मग धो धो पाऊस कोसळावा, त्या पावसात चिंब भिजाव. ओलेत्यानेच एकमेकांना बिलगून बाईकवर बसून अंगाला झोंबणार वार सोसत सुसाट वेगान शहराबाहेरच्या घाटाला तुडवाव..... रुप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना, भूल कोई हमसे ना हो जाए... म्हणत आपलाही पाय घसरावा अस आतून कितीही वाटत असल तरी कोसळणार्या धबधब्याखाली एकमेकांचा हात धरत धडपडत धडधडत्या मनान शरीराचा तोल सांभाळून उभ राहाव. मनाचा आवेग बेकाबू झालाच तर ओठंनी ओठांशी संवाद साधून मोकळ व्हाव. प्रेमात पडल्यानंतरचा हा काळ खूप धुंद असतो. आयुष्यात घडणार्या लहान-सहान गोष्टीही शेअर कराव्याश्या वाटतात. एक कट चहा सुद्धा अर्धा अर्धा पिण्याचे ते दिवस असतात. आपल्या जगण्याला एक अर्थ मिळालेला असतो. आता प्रवास एकट्याने करावा लागेल ही भीती नसते. पाणीपुरी खाताना त्याच्याशी बोलण्याचा तिचा अट्टाहास त्याला आतल्या आत सुखवून जातो; पण तेच काही करणाने तिच्या डोळा पाणी आल तर तो कमालीचा अस्वस्थ होतो आणि त्याच्या नजरेतल प्रेम, तिच्याबद्दलची काळजी बघितली की आपण योग्य माणसाची निवड केली याची तिला खात्री पटते.

प्रेम ही खरतर मनातील हळुवार भावना. प्रेम म्हणजे शेवटी काय असत हो ? आपुलकीच ना ? आपण केवळ तरुण वयातच प्रेम करतो अस नाही. प्रेम ही भावना निसर्गदत्त आहे. प्रेम केवळ भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांवर कराव, अस मुळीच नाही. माणूस आपल्या जीवनात अनेक व्यक्तींवर प्रेम करतो. आपल आपल्या आईवर प्रेम असत, वडिलांवर आपण प्रेम करतो, भावंडांवर करतो... काही काही वेळा आपल्याला त्यांचा रागही येतो. त्यांच्याशी आपली कडाक्याची भांडणे होतात. पण याचा अर्थ आपल त्यांच्यावरच प्रेम कमी झाल अस होत नाही. आपण त्यांच्याशी भांडलो तरी कायमच वेर धरत नाही किंवा त्यांच बरवाईट व्हाव किंवा आपण कराव, अस आपल्याला वाटत नाही. तस वाटायला लागल, तर त्याला विक्रुती म्हणतात. हीच विक्रुती आज काही तरुणांमध्ये यायला लागली आहे अस दिसत. किरकोळ भांडणातून आपल्या कुटुंबियांचा खून केल्याच्या घटना वाढायला लागल्या आहेत.

आणि आता तर आपल्या प्रेमाचा स्विकार न करणार्या मुलीचा निर्घुण अंत करायची विक्रुती बळावली आहे. गेल्या काही वर्षात आपल्या आजुबाजुला घडलेल्या ह्या घटनांनी अवघ्या समाजाला हादरवून सोडल आहे. रिंकू पाटील, अम्रुता देशपांडे, रुपाली या आणि आशा अनेक दुर्देवी त्यांच्या तथाकथित प्रियकरांच्या विक्रुतीला बळी पडल्या आहेत. प्रेमभावनांच्या य अतिरेकाचा सर्वच थरातून निषेध झाला..... पण फक्त निषेधच. प्रेमासारख्या हळुवार विषयावरुन एवढी भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा विचारही कोणाच्या मनात पूर्वी आला नसेल. आपण ज्या व्यक्तीवर मनापासुन प्रेम करतो, तिने भले आपल्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, तरी तिच जीवनच संपविण्याचा विचार आपण कसा काय शकतो? सगळ्यांनी याचा गांभीर्याने विचार करायला हवा. केवळ अशी विक्रुती मनात न बाळगण्याची शपथच घ्यायला हवी अस नव्हे, तर अशा चुकीच्या मार्गाने जाणार्याला योग्य दिशाही दाखवायला हवी.

व्हलेन्टाईन्स डे हा केवळ प्रेमिकांचा दिवस न राहता निखळ मेत्री व्यक्त करण्याचा दिवस व्हावा अस अनेकांच मत आहे. तर बरेच जण ह्या दिवसातील तोचतोचपणा टाळून जरा वेगळ्या पध्दतीन हा दिवस साजरा करतात. नुसतच "लव्ह यू" म्हणून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा स्वत:ची प्रतिभा ज्यातून दिसून येईल अस एखाद प्रेमपत्र किंवा प्रेमकविता लिहूनही हा दिवस साजरा करता येतो. त्यातून मग प्रेमपत्र लेखन स्पर्धा घेतली जाते आणि त्याला उदंड प्रतिसाद लाभतो. पण हे झाल १७ ते ३५ वयोगटातील तरुणांच मत! मात्र याआधिच्या पिढीतील बहुतेकांच्यामते किंवा आत्ताच्या पिढीतील स्वतःला संस्क्रतीरक्षक म्हणवरांच्या मते हा व्हलेन्टाईन्स डे म्हणजे स्वसंस्क्रुती, अस्मिता विसरत चाललेल्या आम्ही केलेल पाश्चात्त्यांच अंधानुकरण आहे.

पण कुणीही काहीही म्हणाल तरी हा गुलाबी दिवस साजरा होणारच! तेव्हा या दिवसाच्या सदुपयोगासाठी अन मनातील प्रीतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना मनापासुन प्रेमपूर्वक शुभेच्छा! कारण.....

प्रेम म्हण्जे.... प्रेम म्हणजे... प्रेम असत, तुमच आणि आमच अगदी "सेम" असत.

प्रकार: 

पण प्रेमात पडलेल्यांसाठी स्पर्श असतो एक भाषा... एक संवाद... एक अश्वासन... एक आनंद... आणि एक समाधान. >> अगदी अगदी लवगुरू
आनंद एकदम मस्त... Happy

प्रेमाला उपमा नाही>>>>>>>>>>>हे खरे आहे>>>>झक्कास आहे...आवड्ले

आपण केवळ तरुण वयातच प्रेम करतो अस नाही. >> Wink
प्रेम केवळ भिन्नलिंगी व्यक्तींनी परस्परांवर कराव, अस मुळीच नाही.>>;)
प्रेम = आपुलकीच >> Happy हो का?
आता ह्या तीन वाक्यांवर आता गदारोळ माजणार! Biggrin
आनंदभाऊ, बाकी प्रेमबिम ठीक आहे हो पण त्यांचा धंदा होतो अन् आमचा जीव जातो Sad

अरे पण त्याचा धंदा आपणच केला ना रे??

आपणच केला ना रे>>> नाही!!! अरे किती प्रेम आहे हे काय भेटवस्तू देऊन दाखवायच असत का? Wink

प्रेमाला मर्यादा घालणे चुकीचे आहे. बंधने घातल्यावर प्रेमाची नाव भरकटते . त्यामुळे ती नाव जशी चालली आहे तशीच चालु द्यावी .