Submitted by सुप्रिया जाधव. on 11 April, 2016 - 01:48
प्राणपणाने त्याच्यावरची निष्ठा जपते
नात्यामध्ये बहुधा माझे इथेच चुकते
किती भरभरून घालशिल तू झोळीमध्ये ?
समोरच्याची झोळी तितकी दणकट नसते
एकनिष्ठता सिध्द करावी लागत नाही
जवाहिऱ्याला खऱ्या हिऱ्याची ओळख पटते
फरक नेमका दोघांमधला हाच असावा
तो डोक्याचा वापर ती हृदयाचा करते
प्रेम प्रेम हे एक शहाणे खूळ नव्हे का
दुनिया अख्खी भजन मिरेचे का गुणगुणते ?
तोच घालतो फुंकर मोठ्या निर्दयतेने
ज्याला उजेड देण्यासाठी पणती जळते
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तोच घालतो फुंकर मोठ्या
तोच घालतो फुंकर मोठ्या निर्दयतेने
आवडल
ज्याला उजेड देण्यासाठी पणती जळते>>>
फरक नेमका दोघांमधला हाच
फरक नेमका दोघांमधला हाच असावा
तो डोक्याचा वापर ती हृदयाचा करते
फारच सुंदर
गजल आवडली! तोच घालतो फुंकर
गजल आवडली!
तोच घालतो फुंकर मोठ्या निर्दयतेने
ज्याला उजेड देण्यासाठी पणती जळते>> विशेष आवडले!