स्फुट ४ - घरट्यात एकटी राहा

Submitted by बेफ़िकीर on 7 April, 2016 - 23:28

तू एक शरीर आहेस
हे तू विसरशील तेव्हा
मला समजेल
की
ती आता तिला
एक शरीर समजत नाही

तुला एक मन आहे
हे तू विसरशील तेव्हा
मला समजेल
की
तिला मनच नसते

आपण एक नैसर्गीक अस्तित्त्व आहोत
हे तू विसरशील तेव्हा
तुला दिवस जाणे बंद होईल

त्यानंतर मला काय वाटते
ह्याचा प्रश्नच उरणार नाही

फक्त काही वर्षे
लग्न, संबंध, मुले
ह्यापासून वेगळी हो

आम्ही निर्माणच झालो नाहीत
तर जग तुझेच असेल की

मातृत्त्वाची ओढ
ही तुझ्या मनात निर्माण केलेली गरज आहे
कुटुंबाची ऊब
ही तुझ्या मनात निर्माण केलेली गरज आहे

तुझ्याकडे स्वतंत्र पंख आहेत
खास तुझी अशी पिसे आहेत
जग पागल होईल असे रंग आहेत
घरटे बनवण्याची क्षमता आहे

घरट्यात एकटी राहा की?

=========

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

Mast

वा !