जसा जसा आतून फाटला आहे ...

Submitted by बाळ पाटील on 6 April, 2016 - 09:44

जसा जसा आतून फाटला आहे
तसा तसा तो देव वाटला आहे

जया न दिसतो देव माणसामधला
खरा मनाने तोच बाटला आहे

नसा खुबीने वाम सव्य पकडोनी
इथे ठगांनी देव लाटला आहे

मिळेल मुक्ती भाव ठरवुनी आता
जिथे तिथे बाजार थाटला आहे

नकोस दावू हास्य कोरडे देवा
घसा तुझा आतून दाटला आहे

-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नसा खुबीने वाम सव्य पकडोनी
इथे ठगांनी देव लाटला आहे >>आवडले

मिळेल मुक्ती भाव ठरवुनी आता
जिथे तिथे बाजार थाटला आहे >>व्वा

गजल आवडली!

महेश | 7 April, 2016 - 06:21
>>नसा खुबीने वाम सव्य पकडोनी
म्हणजे काय ? >>>>>>
>>>>> देवाला भांडवल म्हणून वापरून घेण्यासाठी देवाच्या / भक्ताच्या उजव्या डाव्या नाड्या मोठ्या कसबीने पकडून स्वार्थ साधणे ........ त्या अर्थाने असे काहीतरी सांगायचे होते !!