उदासी एक नश्वर व्हायची

Submitted by जयदीप. on 3 April, 2016 - 11:25

उदासी एक नश्वर व्हायची
तुझ्या माझ्यात अंतर व्हायची

कसा होशील तू मालक उद्या
तुझी स्वप्नेच नोकर व्हायची

नको स्वप्ने उद्याची रंगवू
तुझी इच्छा गरोदर व्हायची

तुझी वाईट आहे ही सवय
'व्यसन' कळण्या अगोदर व्हायची

धरण बांधून झाले पूर्ण की
नदी आहे सरोवर व्हायची

मला अजिबात नव्हती कल्पना
'गुन्हा' ती चूक नंतर व्हायची

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users