Submitted by सुप्रिया जाधव. on 3 April, 2016 - 07:06
हृदयाला भळभळता येते
रक्त पुन्हा गोठवता येते
कवटीमध्ये मेंदू तरिही
चिंतेला पोखरता येते !
सर्वांगाची चाळण होते
नजरांना आवरता येते ?
सांगुन गेली तुझी आठवण
ऋतूविना मोहरता येते
चल मिटवूया दरी मनातिल
ठरवलेच तर करता येते !
विस्कटले आवरता येते
होय मला सावरता येते !
असे दुःख तू दिलेस मित्रा..
प्राणपणाने जपता येते !
सुप्रिया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
सर्वांगाची चाळण होते नजरांना
सर्वांगाची चाळण होते
नजरांना आवरता येते ?>>छान
सांगुन गेली तुझी आठवण
ऋतूविना मोहरता येते >>व्वा
असे दु;ख तु दिलेस
असे दु;ख तु दिलेस मित्रा..
प्राण पणाने जपता येते
.......छान
शेर क्र.२,३,४,५ आवडले!
शेर क्र.२,३,४,५ आवडले!
छान आहे
छान आहे
सर्वांगाची चाळण होते नजरांना
सर्वांगाची चाळण होते
नजरांना आवरता येते ?
सांगुन गेली तुझी आठवण
ऋतूविना मोहरता येते
सुरेख...
धन्यवाद !
धन्यवाद !
चाळण....... _/\_
चाळण.......
_/\_