एसी कुठला चांगला आहे

Submitted by mansmi18 on 27 March, 2016 - 13:54

एसी कुठल्या कंपनीचा चांगला आहे?
स्प्लिट एसी आणि विंडो फिट एसी मधे वीजवापराबद्दल फरक पडतो का?
कृपया अनुभव लिहाल का?
(यावर आधी डिस्कशन ची लिंक दिल्यासही चालेल)

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्मि, एसी लावायला जर असलेल्या खिडक्यांत जागा असेल तर विंडो एसी सोपा मार्ग आहे, तोही स्वस्तात Happy
अडचण अशी काहीच नाही, थोडा आवाज असतो इतकच.
स्प्लिट ला आधी थोडी तयारी लागेल मात्र, जसे की बाहेर युनिट ठेवायची जागा (कारण नंतर त्या युनिटवर/मागे कबुतरं घर करतात); लागणारं डक्टिंग इ. तुलनेनी याचा आवाज कमी असतो.
कुलिंग क्षमता बहुतेक सारखीच.

हल्ली एसी मध्ये स्पिल्ट/विंडो , २/३ स्टार ( दोन्हीच्या किंमतीत फारसा फरक नाही), इनव्हर्टर एसी ( किंमत बर्‍यापैकी जास्त) असे बरेच पर्याय उप्लब्ध आहेत.
मी २ महिन्यापुर्वी वोल्टास चा १.५ टन इनव्हर्टर स्पिल्ट एसी घेतला. यामध्ये टेम्प. कंट्रोल चांगला असतो. बिल साध्या ३ स्टार स्पिल्ट एसी च्या तुलनेत कमी वाटतेय, कारण माझ्या आई कडे ( एसी १ टन ३स्टार ) तेवढाच वीज वापर असुनही बिल जास्त येत.
विंडो एसी चा आवाज बर्‍यापैकी जास्त येतो क्वचित काहींची झोप डिस्टर्ब होउ शकते. फक्त फिटींगचा त्रास/ वेळ खुप कमी असतो, स्पिल्ट एसी फिटींग साठी ५-६ तास सहज जातात, पण सगळं कंपनीची माणसं उत्तम प्रकारे करुन देतात.
माझं मत स्पिल्ट एसीलाचं.

थोडं अवांतरः- माझे दिर टाटा कन्स. मध्ये आहेत त्यामुळे त्यांना वोल्टास एसी वर २५% सुट मिळते, फक्त त्यांची आय कार्ड कॉपी दिली, बाकी एसी बिल वगैरे आपल्या नावावर येते. तसं काही जमत असेल तरी बघा.

विंडो एसी बदलून गेल्या वर्षी स्प्लिट घेतला.

घ्यायचा अस्ल्यास स्प्लिटच घ्या. कूलिंग खुप चांगले होते. आवाज कमी. मेंटेनन्स करताना विंडो एसी असेल तर पुर्ण रूम खराब होते. स्प्लिट चा तसा प्रोब्लेम नाही.

आमचा ब्लु स्टार चा आहे.
विंडो एसी कॅरीयर चा होता. त्याच्या आत जे पाईप्स असतात (त्याला कदाचित कंडेन्सर म्हणतात) ते उडाले. एकदा ३ हजार खर्च करुन बदलले. तर वर्षभराने परत उडाले. म्हणून बदलला. आमच्या कडे विण्डो एसी साठी डक्ट आहे. पण त्यावर प्रोटेक्टिव शेड नाही. त्यामुळे दिवसभर कावळे, कबुतरे त्यावर डिस्को करत. कदाचित त्यामुळे खराब झाला असावा.

एसी च्या आतली फिटींग कॉपरची असली पाहिजे. अ‍ॅल्युमिनियमची असेल तर ते लवकर खराब होतात. कॉपर असेल तर बर्‍याचदा फिचर्स मध्ये लिहिलेले असते प्लस पॉइंट म्हणुन.

Some system issue I guess.

गोदरेज चे नवे एसी आलेत त्याचा काय रिपोर्ट.

मी मागील आठवड्यात 'ब्लूस्टार' चा १.५ टन स्प्लीट इन्वर्टर AC घेतला. यात Heat Pump चे जास्तीचे फिचर आहे.

AC घेताना इन्वर्टरच घ्यायचा होता कारण वीजेची बचत. खालील लिंकवर छान माहिती दिली आहे. यात टॉप टेन AC मध्ये मी घेतलेलं मॉडेल 'अनरेटेड' वर्गात आहे.

१) https://www.bijlibachao.com/air-conditioners/air-conditioners-with-inver...

२) https://www.bijlibachao.com/top-ten-appliances/best-air-conditioner-ac-w...