पेट्रोल

Submitted by जव्हेरगंज on 26 March, 2016 - 14:07

काळीज अजूनही धडधडत होतं. रक्त चिंधड्या उडवत शरीरभर पळत होतं. डाव्या डोळ्यावरची जखम मीठ टाकल्यासारखी चुरचुरत होती. हातापायाला कंप सुटला होता. गल्लीबोळात कुत्र्यांनी भुंकून काव आणला होती. लक्ष्मण पेठ आता डोक्याभोवती फिरत होती.

धडपडत जाऊन मी एका दुकानासमोरचा कोपरा पकडला. मग सरकत सरकत पायरीवर जाऊन बसलो. अंगरख्यातून दारुची बाटली काढली. अन घटाघटा पिऊन रिकामी केली. मग तसाच बराच वेळ बसून राहिलो. हळूहळू सगळं मूळपदावर येत चाललं. मी डोळे मिटून एखाद्या मंतरलेल्या ऋषीसारखा शुन्यात पोहोचलो. बायपासवर वसलेल्या लक्ष्मण पेठेत आता वाऱ्याचा घोंघारव सोडल्यास बाकी सामसूम होती. रात्र गडत होत झिंगरी झाली होती.

लक्ष्मण पेठेच्या बाजूस भलेमोठे कचऱ्याचे डंपिंग ग्राउंड होते. शहराचा हा भाग ओसाड, मागास, वैरान राहिला होता. याच कचऱ्याच्या डंपिंग ग्राउंडात मी माझे घर बनवले होते. समोरच्या पुलावरुन खाली उतरुन ओढ्याच्या काठाकाठानं पुढं चालत गेल्यास एका दलदलीत पत्र्याचं शेड होतं. प्लास्टिकच्या बाटल्यांचा तिथे खच पडला होता. जो महिनों महिने उचलला जाणार नव्हता. त्यातच थोडी जागा करुन मी घर तयार केलं होतं. पूर्वी तेथे म्हणे कत्तलखाना होता. दिवसभर शहरात भटकून मी झोपायला मात्र इकडेच यायचो. तसा आजही चाललो होतो. पण मध्येच मला ती बाई दिसली.

वारा सुसाट सुटला होता. पाऊस यायचा संभव होता. आतून शहरातून सायरनचे आवाज घुमत होते. पोलिस गल्लीबोळातून गस्त घालत फिरत होते. ते का घालत होते हे मला समजलं नाही. पण गेल्या महिनाभरापासून त्यांचा हा सुळसुळाट सुरुच होता. माणूस नावाचा प्राणी आता अपरात्री बाहेर पडत नव्हता.

गुडघ्यावर हात ठेवून मी सावकाश उठलो. कुत्र्यांचा कानोसा घेत घेत मग रस्ता तुडवायला लागलो. ती बाई कुठे दिसेना. मग मात्र गोंधळ उडाला. पळतच पुलावर आलो. कठड्यावर चढून पुढचामागचा रस्ता डोळ्याखालून घातला. कुठेच मागमूस लागेना. मग सरळ पुलाखाली उडी घतली. मधल्या झाडीतून रस्ता काढला. चालत चालत पुढे जाऊन निळकंठ फाट्याजवळच्या हायवेला लागलो. माझा अंदाज बरोबर ठरला. ती बाई उड्डाणपुलाखालून चालत पुढे जात होती. हातात सुटकेस घेऊन कशीबशी चालत होती. रस्त्यावर कितीही दिवे असले तरी उड्डाणपुलाखाली मात्र अंधार होता. आणि ती अबला नारी तिथूनच तर जात होती. परिस्थिती आटोक्यात होती. तिला तिथे बघितलं आणि रक्त पुन्हा चिंधड्या उडवत शरीरभर पळत सुटलं. रातीचा चिरुटा सणकत काळजात घुसत गेला. मस्तकातल्या धमन्या तडातड उडत गेल्या. मी पायजम्यात लपवलेला सत्तूर बाहेर काढला अन राक्षसासारखा त्या पुलाखाली धावत सुटलो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जव्हेरगंज छान लिहिता तुम्ही.. तुमचे लेख वाचले कि दोन मिनिट तरी सुन्न व्ह्यायला होत ..
पु.ले.शु Happy

काय कथा हाय का ही? ..... काय तरी जस आठवल तस लिहलय, वाक्यं घावतील तशी इस्काटून टाकल्यात . उगा आपलं काया तरी....

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

मला नक्की अंदाज लागत नव्हता की कशी झालीय म्हणून. कथा ठिकठाक वाटत नसेल किंवा आक्षेपार्ह वाटत असेल तर तसे क्लिअर केल्यास फार बरे होईल. म्हणजे मग संपादन करून उडवून लावता येईल.

तो कोणी मानसिक रुग्ण वगैरे होता का? एक व्हिलन मधल्या रितेश सारखा?

पण मग पेट्रोल चा काय संबंध ?

ईथल्या सगल्या लोकांना आपल्या कथा हाॅलीवुड टाईप कुणाला न कळणार्या आसाव्यात अस वाटत. त्यामुळे हे आस , चांगल्या होणार्या कथेचं वाटोळ होत .

सत्तुर नावाचे वाद्य असते ना?
ते पायजम्यात कसं काय लपवता आल?
वाद्य घेऊन राक्षसासारखे का पळाला? बँडवाल्यासारखे तरी चालायचे होते ना. वन टू वन टू करीत.
पेट्रोल अजुन महाग झालय म्हणे. अजुनी कंट्री स्वस्त आहे.
मोसंबी नारंगी सारखे मोगरा चमेली का असत नाही? आहे काही कल्पना?