नाव ओठांवर तुझे आहे

Submitted by जयदीप. on 19 March, 2016 - 13:33

शोधले तर सापडत नाही
प्रेम सगळ्यांना मिळत नाही

नेहमी नंतर बघू म्हणतो
तो मला नाही म्हणत नाही

आंधळ्या पाऊलवाटांनो...
एकही रस्ता दिसत नाही?

फार सुंदर गात होती ती
यार... गाणे आठवत नाही !

ओळ एखादी अशी सुचते
ओळ साजेशी मिळत नाही

नाव ओठांवर तुझे आहे
पाहिल्याचे आठवत नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा