सुर्यास झाकण्याचा त्यांचा प्रयास होता

Submitted by बाळ पाटील on 19 March, 2016 - 00:49

दिसणार ना कधी तो ऐसा कयास होता
सुर्यास झाकण्याचा त्यांचा प्रयास होता

जिंकून घेतलेले त्याने इथे स्वत:ला
आता न अर्थ कुठल्या दिग्वीजयास होता

येतात वादळे अन जातात वादळे ही
भीती न धाक त्यांचा हिम - आलयास होता

हा जो निगूढ आत्मा आहे स्वयंप्रकाशी
त्याला कुणी न येथे उजळावयास होता

तू का उगाच खातो मांडे अहंपणाचे
हर मस्तवाल येथे गेला लयास होता

-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह छान आहे. तांत्रिक बाबी काही कळत नाहीत, पण एका ओळीत बदल सुचवत आहे,
अर्थ आणि गेयता टिकून राहील असे वाटते.

>>आता न अर्थ कुठल्या दिग्वीजयास होता
आता न अर्थ कसला (त्या) दिग्वीजयास होता

सुंदर रचना बाळ पाटिल जी!

शक्य तोवर ऱ्हस्व-दीर्घाच्या सुटी टाळता आल्या तर उत्तम! शुभेच्छा! >>>>>
...... धन्यवाद सत्यजीतजी ! ऱ्हस्व-दीर्घाबाबत हीमालयास ऐवजी फार तर हिम - आलयास हा बदल करता येईल. परंतु दिग्वीजयासहा शब्द मात्र अपरिहार्य आहे असे वाटते..

वाह छान आहे. तांत्रिक बाबी काही कळत नाहीत, पण एका ओळीत बदल सुचवत आहे,
अर्थ आणि गेयता टिकून राहील असे वाटते.

>>आता न अर्थ कुठल्या दिग्वीजयास होता
आता न अर्थ कसला (त्या) दिग्वीजयास होता >>>>>>>
........ महेशजी धन्यवाद ! आपण सुचविलेला बदल देखील आवडला. पण मला वाटते त्याने एवढा फरक पडणार नाही.